Thursday, February 14, 2013

"तो आणि त्याची ती..!" १.२१


                  "हाय फ्रेंड्स, मीट माय बेस्ट फ्रेंड स्वराली, आमच्या मातोश्रींच्या जीवलग मैत्रीणीची राजकुमारी," असं स्वच्छिलने स्वरालीची ओळख सगळ्यांना करुन दिली. स्वच्छिल कॉलेजचा जी.एस. होता त्यामुळे त्याच्यासोबत नेहमी मुला-मुलींचा गराडा असायचा, सगळ्यांमध्ये त्याची वट बघुन स्वरालीला बरं वाटलं. स्वच्छिल आपल्या मित्र-मैत्रिणींसह तिला सगळं कॉलेज दाखवत होता, त्यांचा वर्ग, त्यांची लॅब, लायब्ररी, त्यांचा कट्टा, कॅंटीन, कॉलेजच्या मागे असलेया गार्डनला ते लव्हर स्पॉट म्हणायचे तिथे पोहचल्यावर स्वच्छिल तिला बोलला, "स्वराली, मी जेव्हा फस्ट इयरला होतो ना तेव्हा मला माहित नव्हतं बरं का हा लव्हर स्पॉट आहे ते, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मी आणि माझी वेदाली नावाची मैत्रिण इथे बसलो होतो, आणि त्यावेळी आमच्या सिनियर्सनी आम्हा दोघांना "पहेला नशा" हे गाणं म्हणुन खुप चिडवलं होतं. हे प्रकरण खुप गाजलं होतं कॉलेजमध्ये," असं स्वच्छिल तिला बोलला. "अरे व्वा, म्हणजे तु कॉलेजचा चॉकलेट बॉय आहेस तर? हे मला दाखव ना तुझी गर्लफ्रेंड?" असं स्वराली खुप आनंदाने त्याला बोलली. "छे गं, या कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड असायला नशीब लागतं, आणि मी आणि वेदाली आम्ही दोघं फ्रेंड्स आहोत, खरंतर जिच्यावर प्रेम करावं अशी कोणी मिळाली नाहिये मला..!" असं स्वच्छिल जरा लाजत बोलला. "कशी मुलगी हवीऐ, जी.एस.? जरा आम्हालापण कळु द्या?" असं त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याला चिडवलं. "वेळ आली की नुसतच सांगणार नाही तर दाखवेल मला कशी प्रेयसी हवीये," असं म्हणतांना समोर असलेल्या स्वरालीकडे त्याने नकळत इशारा केला. बराच वेळ झाला तरी अर्जुन कसा पोहचला नाही म्हणुन स्वराली अर्जुनबद्दल स्वच्छिलला विचारु लागली. "हे स्वराली, अर्जुन कोण गं? बॉयफ्रेंड आहे का तुझा?" असं स्वच्छिलच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं. तशी स्वराली जरा लाजली हे सगळ्यांना जाणवलं, "माझा बेस्ट बेस्ट बेस्ट फ्रेंड आहे तो..!" असं स्वराली त्यांना बोलली. "अगं माझा फ्रेंड गेला होता त्याला घ्यायला, तर त्याने यायला नकार दिला." असं स्वच्छिलने तिला सांगितलं. हे सगळं  स्वरालीला खुप वेगळंच वाटलं होतं. "हे फ्रेंड्स, आपण लॉंग राईड वर जाऊ या का अप टु थंब हिल पर्यंत?" असं स्वच्छिल सगळ्यांना बोलला. सगळ्यांनी होकार दिला, पण स्वरालीची घरी जायची ईच्छा होत होती. हे लक्षात येताच स्वच्छिलने आपल्या एका मैत्रिणीला खुणवलं, "हे स्वराली, अगं इकदम मस्त स्पॉट आहे तो, अग अंगठ्याच्या आकाराची टेकडी बघायला आवडेल तुला..!" असं शुभदाने स्वरालीला सांगितलं, आणि मग ते सगळे त्या थंब हिल कडे बाईकवरुन रवाना झाले.
                        थंब हिल कडे जाणारा रस्ता मोकळाच असल्याने सगळ्यांच्या बाईक्स फुल स्पिडवर धावत होत्या. "हे स्वराली, तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, गाडी हळु चालवायला लावतो सगळ्यांना," असं स्वच्छिल तिला बोलला. आपल्यामुळे यांचा हिरमुड नको व्हायला म्हणुन स्वरालीने नकार दिला, पण गाडीवर ती जणु जीव मुठीत घेऊन बसली होती. थंब हिलचा परिसर खुप सुंदर होता, चहुकडे हिरवळ पसरलेली, मार्च महिना होता, वसंताची चाहुल असल्याने तरी तिथे असलेल्या रानफुलांची झाडे फुलांमुळे बहरली होती, आजु-बाजुला वाहणारे छोटे छोटे झरे बघणार्‍याचं मन मोहुन घेत होते. टेकडीवर गेल्यानंतर तर आजुबाजुचा परिसर खुप सुंदर दिसत होता. "खरंच स्वच्छिल, आमच्या गावापेक्षाही खुप सुंदर जागा आहे ही, किती प्रसन्न वाटतयं, थॅक्स इथे आणल्याबद्दल..!" असं स्वराली त्याच्याकडे बघुन बोलली. "चला, आजचा दिवस सार्थकी लागला तरं, तु खुष आहेस ना बस्स, हेच पाहिजे मला. अर्जुनने खुप मिस केलं हे सगळं, का आला नाही तो? कदाचित त्याला आमचं घर आवडलं नसणार, बोर होतोयं तो इथे असं वाटतयं मला..!" असं स्वच्छिल तिला बोलला, आणि खाली उतरु लागला. समोर दुरवर जाईल इतकी नजरेनं जणु स्वराली अर्जुनला शोधत होती असं वाटु लागलं, "काय रे अर्जुन का आला नाहिस तु रागावलायं का माझ्यावर?" असं ती मनातुनच जणु त्याच्याशी बोलु लागली.  थोड्यावेळाने ती खाली उतरली तशी उदास वाटु लागली. "स्वच्छिल घरी जाऊया रे आता आपण, आई-अर्जुन वाट बघत असतील," असं स्वराली त्याला बोलली, मग ते घराकडे परतु लागले.
                             इकडे अर्जुन स्वच्छिलच्या घराबाहेर बसला होता, त्याला समोरच्या अपार्टमेंट मध्ये छोट्या मुलांमध्ये होणारं भांडण दिसलं, तसा तो तिथे पोहचला. त्याने त्यांच भांडण मिटवलं आणि त्यांच्यासोबत तो क्रिकेट खेळु लागला. त्या लहान मुलांसोबत खेळतांना त्याला सकाळी जे घडलं त्याचा विसर पडला. एक अनोळखी मुलगा आपल्या छोट्या भावासोबत खेळतोयं, असं वेदाली नावाच्या एका मुलीने आपल्या गॅलरीतुन बघितलं, आणि घाईने ती खाली आली, आणि अर्जुनची चौकशी केली. "स्ट्रेंज, स्वच्छिलच्या घरी पाहुणा आहेस तु? अरे स्वच्छिल तर इतका खोडकर आहे ना की बस्स, तो आणि त्याचे मित्र ही मुलं खेळतं असली, आणि यांच लक्ष नसलं की या लहान मुलांचा बॉल घेऊन पळुन जातो तो, खुप त्रास देतो यांना, पण तु तर यांच्यासोबत चक्क लहानमुलांसारखा क्रिकेट खेळतोयं हे बघुन बरं वाटलं, बाय दि वे, मी वेदाली, मी आणि स्वच्छिल दोघं क्लासमेट्स आहोत..!" असं ती त्याला बोलली. "अर्जुन भैय्या, स्वच्छिलदादाला मी मोठा झालो की चांगला धडा शिकवणार आहे, इथुन सचिन सारखा अस्सा सिक्सर मारेल ना की त्याच्या रुमची काचच फोडुन टाकेल, असं सात वर्षांचा छोटा चिंटु बोलल्यावर अर्जुनला आणि वेदालीला हसु आवरणं कठीण झालं. "अरे चिंटु, असं नाही बोलायचं, अरे सचिन कधी कोणाला असा त्रास देतो का? चला खेळा तुम्ही आता, मी जातो घरी, आणि भांडण करु नका बरं का..!" असं अर्जुन त्याला बोलला. "अरे अर्जुन, काही काम आहे का रे तुला कारण मी सकाळीच पाहिलं तर स्वच्छिल कोणा मुलीला घेऊन कॉलेजला जातांना दिसला?" असं वेदालीने त्याला विचारलं, तसं अर्जुनने तिच्याकडे बघुन हसला, "अगं काही काम नाही, आणि ती मुलगी स्वराली होती, माझी बेस्ट फ्रेंड, खरंतर तिची आई आणि स्वच्छिलची आई बालमैत्रिण आहेत, मागे दोन महिन्यापुर्वी अलकाकाकु स्वरालीच्या घरी आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी बोलावलं होतं आम्हाला. आणि अनायसे स्वरालीची बोर्डाची परिक्षा संपली, मलाही तीन दिवस सुट्टी होती म्हणुन आम्ही इकडे आलोत..!" असं अर्जुन बोलला. "ओह्ह, असं आहे तर, अरे पण मग तु का नाही गेला त्याच्याबरोबर कॉलेजला? आमचं कॉलेज एकदम जबरदस्त आहे यार..! कसलंच टेंशन घ्यायची गरज नसते..! तु जायला हवं होतं त्या दोघांसोबत..!" असं वेदाली बोलली. "जाणार होतो, पण उशीरा जाग आली, रात्री खुप वेळ जागरणं झालं होतं ना? पण तु नाही गेलीस कॉलेजला?" असं अर्जुनने तिला उत्तर दिलं. "अरे जाणार होते पण कंटाळा आला, आणि बरं झालं नाही गेले ते, या निमित्ताने तुझी भेट झाली," असं म्हणुन वेदाळी निखळपणे हसली, आणि मग ती अर्जुनला, "फ्रेंड्स" असं म्हणत फ्रेंडशिप साठी हात समोर केला, अर्जुननही हलकेच हसला आणि  बोलला, "फ्रेंड्स फॉरऐव्हर, चल बाय वेदाली..!" आणि तो तिथुन घरी गेला. दुपारी तीनच्या सुमारास स्वच्छिल आणि स्वराली दोघं थंबहिल वरुन परत आले.
                           घरात येताच स्वरालीने तिच्या आईला विचारलं की अर्जुन कुठे आहे, "अगं कशी रे तुम्ही दोघं, त्या बिचार्‍याला इथे एकट्याला ठेवलं, तो वर गच्चीवर बसलायं स्वच्छिलच्या बाबांसोबत चेस खेळतं.!" असं अलकाकाकु स्वरालीला बोलला. स्वराली घाईने गच्चीवर गेली, अर्जुन आणि स्वच्छिलचे बाबा चेस खेळण्यात एकदम गुंग झाले होते, त्यामुळे स्वरालीने काहीच आवाज दिला नाही, आणि ती गुपचुप त्यांचा खेळ बघत बसली. इकडे स्वच्छिल त्याच्या खोलीत आला, अर्जुनची चांगली जिरवली म्हणुन तो खुष होता, सायंकाळी पण काहीतरी बहाणा करुन स्वरालीला घेऊन जाऊ बाहेर, आणि अर्जुन परत ठेऊ एकट्याला घरी असं तो ठरवु लागला, दरम्यान त्याला वेदालीने फोन केला, "हाय स्वच्छिल, आलास का कॉलेजवरुन? काय रे भामट्या, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कोणी असा त्रास देतं का? अर्जुनला घेऊन जायचं ना आपल्या कॉलेजला? चल बाय, सी यु लेटर..!" असं म्हणुन वेदालीने फोन कट केला, आणि स्वच्छिलला जाम टेंशन आलं. "आयला हा बांगडु तर जेम्स बॉंड निघाला, वेदालीची आणि याची भेट झालीच कशी काय? ती वेदाली तर एकदम इमोशनल फुल आहे, माझ्याबद्दल सगळं ओकुन मोकळी झाली असेल कदाचित, शिट, याला घेऊन गेलो असतो कॉलेजला तर बरं झालं असतं, निदान ग्रुपच्या मुलांनी याला गुंतवुन ठेवला असता, होप या वेदालीने या माकडाच्या हातात तलवार दिली नसेल..!" असं म्हणुन स्वच्छिल कॉटवर डोकं पकडुन बसला.

Sunday, February 3, 2013

"तो आणि त्याची ती..!" १.२०


            स्वरालीची बोर्डाची परिक्षा संपली होती, त्यामुळे ती दिवसभर चित्रकलेचा सराव करायची, "आत्मकथन सोडुन ज्याला इतरही सगळं लिहिता येतं तो खरा लेखक, याप्रमाणे निसर्गचित्रांखेरीज बाकीची चित्र काढता येतात तो खरा चित्रकार..!" या वाक्याने स्वराली एकदम प्रभावित झाली होती, त्यामुळे ती निसर्गचित्रांखेरीज बाकीच्या चित्र प्रकारांचा अभ्यास करु लागली. असाच एक दिवस तीला अलका काकुंनी फोन केला, "हे स्वराली, बेटा आपलं ठरलं होतं ना की सुट्टी लागली की येशील तु माझ्या घरी अर्जुनला घेऊन आहे ना लक्षात तुझ्या?" असं अलका काकु बोलल्या होत्या. अलकाकाकुंचा फोन आला होता हे स्वरालीने तिच्या आईला सांगितलं, आणि मग अर्जुनच्या घरी आली. "हे अर्जुन, तुला दोन-चार दिवस सुट्टी घेता येईल का रे माझ्यासाठी आपल्याला अलकाकाकुंनी बोलवलंय रे, मी, आई आणि तु आपण तिघेजण जाऊया का त्यांच्याघरी?" असं तीने त्याला विचारलं, "चालेल, पुढच्या आठवड्यात जाऊ आपण," असं अर्जुन तिला बोलला. अर्जुनकडुन होकार मिळाल्यानंतर स्वराली खुष होऊन घरी परतली, आणि केव्हा आपण अलकाकाकुंच्या घरी जाऊ असं तिला वाटायला लागलं.सकाळी लवकर स्वराली, तिची आई आणि अर्जुन तिघंही अलकाकाकुंच्या घराकडे बसने रवाना झाले, बसस्टॅंडवर अलकाकाकुंच्या सोबत होता त्यांचा एकुलता एक मुलगा स्वच्छिल..!
                  स्वच्छिल हा स्वरालीपेक्षा वयाने तीनवर्ष मोठा, पण अर्जुनपेक्षा एकवर्षाने लहान होता. स्वच्छिल या शब्दाचा अर्थ ज्याचं चरित्र स्वच्छ आहे, पण स्वच्छिलची वागणुक त्याच्या नावाच्या अर्थाच्या एकदम विरुद्ध होती, घर सोडलं की बाकी सर्वत्र बॅडबॉयच्या इमेजमध्ये त्याला वावरायला आवडायचं..! "मला फक्त प्रेमात असणारी मजा लुटायचीऎ, पण "प्रेमाचं" लेबल, मला नकोयं." असं तो नेहमी म्हणायचा. स्वच्छिल एकदम जिद्दी होता, त्याला कशातच पराभव स्विकारायला आवडायचं नाही, बॅडबॉय असला तरी तो कॉलेजमध्ये सगळ्या परिक्षांत अव्वल असायचा, त्यामुळे त्यांच्या कॉलेजचा तो जी.एस. होता, त्यामुळे सगळीकडे त्याला मान असायचा. अलकाकाकु जेव्हा स्वरालीच्या घरुन आल्या, त्यांनी स्वच्छिलला स्वराली आणि अर्जुनबद्दल सांगितलं, अर्जुनच्या त्या कौतुक करतांना थकत नसत, त्यामुळे स्वच्छिलला अर्जुन नावाचा मुलगा आहे तरी कोण ज्याचं आपली आई इतकं कौतुक करते म्हणुन त्याला अर्जुनला एकदा भेटायचंच होतं.
                     बसस्टॅंडवर स्वरालीला बघताच स्वच्छिलला जणु लव्ह ऍट फस्ट साईट असंच वाटलं, त्याच्या कॉलेजमधल्या कित्येक मुलींबरोबर त्याने डेटिंग केलेलं होतं, पण स्वरालीला बघताच जणु त्याची विकेटच गेली असं त्याल वाटलं. पण स्वराली बरोबर असलेल्या अर्जुनकडे जेव्हा त्याचं लक्ष गेलं, तेव्हा सहाजिकच त्याच्यातला बॅडबॉय जागा झाला होता. घरी आल्यावर तो त्याचं घर स्वरालीला दाखवु लागला, त्याच्याबद्दल तो भरभरुन बोलत होता, अशातच स्वरालीचं लक्ष एका ट्रॉफीवर गेलं, "हे स्वच्छिल, ही ट्रॉफी कशाबद्दल मिळाली रे तुला?" असं तीने त्याला विचारलं, आपल्या टि-शर्टच्या बाह्या सावरत स्वच्छिल बोलला, "अगं इंटरकॉलेज बॉडीबिल्डींग मध्ये पहिला आलो तेव्हा मिळाली ती..!" स्वरालीने त्याला तसा प्रश्न विचारला म्हणुन तो फार सुखावला पण क्षणातच स्वरालीने त्याला बोलली, "अरे अर्जुन, या ट्रॉफीसारखीच तुझ्याक्डे पण ट्रॉफी आहे ना, यापेक्षा थोडीशी मोठी आहे ना, हे स्वच्छिल तु आणि अर्जुन पंजा लढवा ना एकदा..!" अर्जुनची तब्येत आपल्यासमोर काहीच नाही हे बघताच स्वच्छिलला जोश आला, आणि तो अर्जुनला आग्रह करु लागला, शेवटी अर्जुनही तयार झाला, पण अवघ्या काही सेकंदातच अर्जुनने स्वच्छिलला हरवलं, स्वरालीसमोर हरलो, यामुळे स्वच्छिलला खुप वाईट वाटलं, यामुळे अर्जुन तर पक्का त्याच्या मनात बसला. सायंकाळी स्वच्छिल अर्जुनला घेऊन त्याच्या मित्रांकडे घेऊन गेला, "हे बॉईज, हा अर्जुन आहे बरं का, एकदम हॉट डुड, हे हा आर्मसेसलर आहे बरं का..!" असं अर्जुनची ओळख त्याने त्याच्या मित्रांना करुन दिली, "भाई, आमच्याशी लावता का पंजा,?" असा प्रश्न उर्जित नावाच्या मित्राने अर्जुनला विचारला, अर्जुनने गम्मत म्हणुन त्याच्याशी पंजा लावुन त्यालाही हरवलं हे बघुन संजय नावाच्या स्वच्छिलचा मित्र त्याला बोलला, "व्वा, यार आमच्या कॉलेजच्या अनबिटेबल आर्म रेसलरला हरवलं, पंजा झाला आता पंच-पंच खेळायचा एक गेम,?" स्वच्छिलचे मित्रांच्या चेहर्‍यावरचे हावभावाचा अंदाज घेत अर्जुनने साफ नकार दिला.
                           घरी परतत असतांना, स्वच्छिल अर्जुनला बोलला, "हे अर्जुन, स्वराली आणि तुझ्यात काही रिलेशन आहे का रे? डाव आहे का ती तुझी? आयला, अरे लाजु नको सांग ना खरं खरं तुमच्याबद्दल? आपल्याला तर जाम आवडलीयं रे, साला आमच्या कॉलेजमध्ये अशा आयटम आहे, तु बघशील तर कुणाशी रिलेशन ठेऊ आणि कुणाशी नको असं होईल. पण स्वरालीला पाहिल आणि मला तर..., आईशप्पथ तुझं आणि तिचं अफेअर नसेल तर आपली सेटींग करुन देशील का यार तिच्याशी..!" स्वरालीबद्दल स्वच्छिल असं बोलला हे बघुन अर्जुनला प्रचंड राग आला, त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली, "अरे स्वच्छिल मला वाटलं तु चांगला मुलगा असशील, अरे तुला तर आपण काय बोलतोयं त्याचंही भान नाहिये, अरे असा विचारच कसा आला तुझ्या मनात? तुझ्या जागी आज कोणी दुसरा असता आणि स्वरालीबद्दल माझ्यासमोर असं बोलला असता ना, तर त्याच्या तोंडात हात टाकुन त्याची जीभ खेचली असती, एकदा बोललास, बसं झालं, परत स्वरालीबद्दल असं काही बोललास तर बघं," असं अर्जुन स्वच्छिलच्या डोळ्यांकडे एकदम खुन्नसने बघुन बोलला, "ओय, पहातोय काय रागाने, काय करशील रे? मारशील मला, चल मार एक पंच मारुन दाखव, मग मानेल..!" असं स्वच्छिल अर्जुनला बोलला, आणि खरंच अर्जुनने त्याला खुप जोरात पंच मारला त्यामुळे तो भररस्त्यात खाली पडला, चांगली पाच मिनिटं त्याच्या तोंडुन एक अवाक्षर निघालं नाही, पण त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, "चिल चिल.. मर्दाची औलाद आहेस तु पटलं मला, माझ्यावर हात टाकलास कोई बात नही, पण स्वरालीचा हात हातात धरुन तुझ्यासमोरुन निघुन जाईल आणि  हेच तुझे हात माझ्यासमोर झुकवील मी..! वाटु दे तुला माझा कितीही राग, पण शेवटी बाजी मारेल हा स्वच्छिल वाघ, लक्षात ठेव स्वराली सारख्या चांगल्या मुली नेहमी माझ्यासारख्या वाईट मुलांना सुधारण्यासाठीच  असतात रे मजनु, अर्जुन भले ती तुझ्यावर या क्षणाला प्रेम करत असु दे, पण एकदिवस ती माझ्या प्रेमात पडल्याशिवाय रहाणार नाही, कारण स्वरालीला प्रेम करण्यासाठी यापुढे हा स्वच्छिल अर्जुनचा पर्यायच ठेवणार नाही..!" असं स्वच्छिल त्याला बोलला. घरी आल्यावर मात्र काही घडलंच नाही असं तो दाखवत होता. 
                         रात्री सर्वांची जेवणं झाल्यानंतर ते सगळे मिळुन अंताक्षरी खेळु लागले, पण अर्जुनचं मन त्यात रमत नव्हतं, आपल्या आईच्या मैत्रिणीच्या मुलीबद्दल कोणी असं कसं काय बोलु शकतो, ह्या विचारात त्याच मन बुडुन गेलं, स्वच्छिल इतरांना जे दाखवतो, आणि आपल्याला जो स्वच्छिल दिसला यात खरं काय तेच कळत नाही. अंताक्षरीचा खेळ चांगलाच रंगात आला होता, पण अर्जुनचं लक्ष नव्हतं, तितक्यात स्वच्छिलचं, "तु चिज बडी है मस्त, मस्त..!" या गाण्याने अर्जुन संतापला होता हे त्याच्या चेहर्‍यावरुन कळत होतं, आपल्याला झोप येतीयं असं दाखवुन तो तिथुन जाऊ लागला, त्याचबरोवर स्वच्छिलही उठला. त्याच्या खोलीत आल्यावर अर्जुनसमोर तेच गाणं गुणगुणतं होता, थोड्यावेळाने त्याला त्याच्या मित्राचा फोन आला, "कुणाला तरी आपणं इंम्प्रेस करतोयं कारण आपलं हार्ट तिच्यामुळे फडफडतयं हे पाहुन समोरच्याचं रक्त उकळतयं, उद्या कॉलेजला आल्यावर सांगतो." असं म्हणुन स्वच्छिलने फोन ठेवला. अर्जुनला काही केल्या झोप लागत नव्हती, म्हणुन तो उठला आणि खिडकी उघडुन आकाशातल्या त्यार्‍यांकडे बघु लागला. स्वच्छिलचं लक्ष त्याच्याकडे गेलं, "काय अर्जुनराव, झोप उडाली का? की निद्रानाश झालायं? झोप येत नसेल तर यौवनाचे चमत्कार बघत बसं, आपल्याकडे बरंच कलेक्शन आहे, शांत झोप लागेल तुला..!" असं म्हणुन स्वच्छिल एकदम कुस्तितपणे हसला. अर्जुनने त्याच्याबोलण्याकडे दुर्लक्ष केलं, थोड्यावेळाने त्याला तिथेच झोप लागुन गेली.
                          सकाळी स्वच्छिल नेहमीपेक्षा खुप लवकर उठला होता, "हे स्वराली, तु आज येशील का माझ्यासोबत कॉलेजला? माझ्या सगळ्या फ्रेंड्सला भेटवील मी?" असं त्याने तिला विचारलं. "अरे येईल ना, पण अर्जुन?" असं स्वरालीने त्याला विचारलं. "अगं टेंशन नको घेऊ, त्यालापण घेऊ ना सोबत, पण तो अजुनही खुप गाढ झोपेत आहे, माझा एक मित्र आहे तो पिक करेल त्याला, काल रात्री अर्जुनला तसं मी सांगितलयं, अर्जुनच बोलला की त्याला काही हरकत नाहीऎ, तर मग निघुया का आपण?" असं स्वच्छिल स्वरालीला बोलला. क्षणभर थांबुन स्वराली त्याच्याबरोबर जायला तयार झाली, आणि स्वच्छिल तिला बाईकवरुन त्याच्या कॉलेजला घेऊन गेला. सुमारे नऊ वाजता अर्जुनला जाग आली, घड्याळाकडे बघताच तो हैराण झाला, "बापरे, रोज पहाटेच उठणारा मी, आज इतकी झोप कशी लागली?" असं स्वगत बोलत त्याने रुममध्ये नजर फिरवली तर तिथे स्वच्छिल नव्हता. मग त्याने अलकाकाकुंना स्वच्छिल कुठे गेलायं ते विचारलं, "अरे अर्जुन, तो आणि स्वराली दोघं त्याच्या कॉलेजला गेली आहेत, तु तयार हो पटकन, त्याचा मित्र येणार आहे तुला घ्यायला," असं अलकाकाकु त्याला बोलल्या. अर्जुन तयारी करुन स्वच्छिलच्या मित्राची वाट पहात बसला, थोड्यावेळाने फोन आला की स्वच्छिलच्या मित्राची तब्येत अचानक बिघडलीयं, म्हणुन  तो येऊ शकत नाही, हे ऐकताच अर्जुन उदास झाला.