Monday, April 30, 2012
Sunday, April 29, 2012
Saturday, April 28, 2012
Friday, April 27, 2012
Thursday, April 26, 2012
Wednesday, April 25, 2012
एक खास प्रेरणादायी चारोळी..!
नमस्कार रसिक मित्र-मैत्रिणींनो, लवकरच "शिंपल्यातले मोती...!" या कथासंग्रहातील १० कथा "छाटलेल्या पंखांची भरारी..!" ही कथा तुमच्या भेटीस घेऊन येणार आहे, त्या कथेतील एक प्रेरणादायी चारोळी खास तुमच्यासाठी..! आशा करतो तुम्हाला नक्की आव़डेल..!
Tuesday, April 24, 2012
Monday, April 23, 2012
Sunday, April 22, 2012
तो आणि त्याची ती..! १.७
डायरी लिहिल्यानंतर अर्जुन थोडावेळ तसाच पडुन राहिला, नंतर उद्या असणार्या बॉक्सिंगच्या मॅचची त्याला आठवण झाली. सुमारे तीन आठवड्यांपासुन त्याची जिम आणि बॉक्सिंगची प्रॅक्टिस रखडली होती, आणि अशातच उद्या डायरेक्ट त्याला मॅचला उतरायचं होतं, तरी कसलचं टेंशन त्याला नव्हतं. त्याच्या गळ्यात असलेल्या बजरंगबलीच्या लॉकेट कडे त्यानं बघितलं. "महाभारतातल्या अर्जुनाच्या रथावर तुमचा झेंडा होता, म्हणुन अर्जुनाला हरवणं कुणाला जमलं नाही, माझ्या तर ह्रदयाच्या जवळ तुम्ही असल्यावर मला उद्याची चिंता नाही..!" असं स्वगत बोलत अर्जुन झोपी गेला. सुर्योदय होण्यापुर्वीच आज अर्जुन उठला होता, अंघोळ झाल्यानंतर त्यानं बजरंगबलीची पुजा केली. आपल्या दोन हातांकडे बघत तो बोलला, "आज जितक्या मॅचेस होतील, त्यावेळी प्रतिस्पर्धी हा माझा एकतर मित्रच असेल, किंवा माझा ज्युनियर, म्हणुन एकवेळ जिंकता आलं नाही तरी चालेल, पण ह्या हातांनी त्यांना कायमची इजा व्हायला नको."
अर्जुन एक अव्वल दर्जाचा बॉक्सर होता. त्याने पहिल्यांदा जेव्हा इंटरकॉलेज बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी तो सर्वांत तरुण स्पर्धक होता, त्याच्याकडे बघुन इतर स्पर्धक त्याला चिडवायला लागले, त्यानं पहिल्याच मॅच मध्ये प्रतिस्पर्ध्याला पहिल्याच राउंड मध्ये क्नॉक आऊट केलं होतं, त्यानं मारलेला ठोसा इतका जोरदार होता की प्रतिस्पर्धकाच्या उजव्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं होतं. त्या दोघांची ति मॅच त्याच्या ग्रुपमधल्या ज्यांनी बघितली त्यातिल तीन जणांनी त्याच्याशी मॅच आल्यावर त्याला बाय देणं पसंत केलं. अंतिम सामन्यातही त्याला अवघ्या दिड मिनिटांच विजयी घोषित केलं होतं..! त्याची मॅच झाल्यानंतर त्याचे कोच असलेले श्री. खान सर त्याच्यावर जाम खुष होते. त्यांनी त्याला बाहेरील स्पर्धा खेळण्याला सांगितलं, पण अर्जुन तयार नव्हता. त्याच्या पहिल्या प्रतिस्पर्धकाचा वेदनेनं भरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळायचा. "करियर किलर" असा टॅग त्या मॅचमुळे त्याला बाकीचे कॉलेजच्या मुलांनी दिला, तेव्हा अर्जुनला खुप वाईट वाटलं होतं. त्यामुळे नंतर फक्त्त हौस म्हणुन तो बॉक्सिंग शिकतच राहिला, पुढच्या वर्षी तो रिंग मध्ये उतरलाच नाही.
पण यंदा त्याला बॉक्सिंग मध्ये त्याच्या कोचच्या आग्रहामुळे उतरावं लागलं, ज्या वर्षी तो खेळला नाही, त्यावर्षी त्याच्या कॉलेजच्या प्रत्येक बॉक्सरला बाकीच्या बॉक्सरांनी पछाडलं होतं. अखिलाडुवृत्तीनं त्यावेळी कळसच गाठला होता. अशा ताकदीच्या गुर्मीत भरकटलेल्यांना खिलाडुवृत्तीनं खेळ कसा करायचा ते दाखवण्यासाठी अर्जुनला रिंग मध्ये उतरणं गरजेचं होतं. प्रचंड स्टॅमिना, कमालीची ताकद, आणि तंत्रशुद्ध बॉक्सिंग करण्यात अर्जुनला खान सरांनी पटाईत केलं होतं. त्यामुळे त्यांना अर्जुनकडुन एकच अपेक्षा होती, नुसत्या विजयाचीच नाही तर खिलाडुवृत्तीनं मिळवलेल्या विजयाची..! आपला विजयचं आज आपल्या गुरुसाठी गुरुदक्षिणा ठरावी, म्हणुन अर्जुन तयार झाला.
सोहम अर्जुनला घेण्यासाठी त्याच्या घरी आला. नंतर कॉलेजमध्ये आल्यावर अर्जुनने आपला मॅचचा लॉट बघितला. त्यानं पहिल्यावर्षी अंतिम सामन्यात ज्याला हरवलं, त्याच्याबरोबरच त्याची पहिली फाईट होती. "आज मजा येईल," असं आपले बॉक्सिंग ग्लोव्ह्ज हातात पकडतं अर्जुन बोलला. तितक्यात त्याचे कोच आले, त्यांना त्याने मनोभावे वंदन केलं. "काश अल्लाने मुझे तेरा अब्बाजान बनाया होता. बेटा शानसे खेलना. आज कोई भी मॅच मत हारना, गो फॉर विन माय "करियर किलर". असं खान सर त्याच्या पाठीवर हात ठेवतं बोलले. तोपर्यंत त्याचा सगळा ग्रुप आला होता. "वेलकम टु दि रिंग अर्जुन", "जस्ट कॉन्क इट.", "स्मॅक देम अप अर्जुन", "करियर किलर इज बॅक." "दि अनडिस्प्युटेड चॅंम्प इज हियर" "अर्जुन-दि अल्टिमेट राजपुत वॉरियर इज बॅक" "स्टुडंट्स चॅंम्प गो फॉर विन" असे रात्रभर जागुन त्याच्या मित्रांनी बॅनर्स बनवले होते. अर्जुनचा उत्साह त्यामुळे वाढला.
रिंग कडे जातांना त्याच्या कॉलेजची प्रत्येक मुलं त्याला चिअर करत होती. त्याच्या कॉलेजचा प्रत्येक जण आवर्जुन उपस्थित होता. बाकीच्या कॉलेजचे स्पर्धकही ती मॅच बघण्यासाठी जातीनं उपस्थित होते. रिंग मध्ये आल्यावर दोघ्या स्पर्धकांनी एकमेकांकडे एकदम खुन्नसने बघितलं. मागच्या वेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्याचा प्रतिस्पर्धी प्रताप काटकर खुप उतावीळ होता. त्याच्या डोळ्यांत जणु रक्त उतरलं इतका तो भयानक वाटत होता. त्यामाने अर्जुन थोडा शांत दिसत होता, अगदी झोपलेल्या सिंहासारखा. मॅचचा पहिला राऊंड सुरु झाला, प्रतापनं त्वेषानं एका-वर-एक पंचेस मारायला सुरुवात केली. त्यानं एक पंच अर्जुनच्या पोटात इतका जोरात मारला, त्यामुळे अर्जुन खाली कोसळला, अंपायरनं काऊंट करायला सुरुवात केली, सातव्या काउंटला अर्जुन पुन्हा अर्जुन उभा राहिला. "करियर किलर यु आर फिनिश." असं म्हणतं चवताळलेल्या प्रतापने पुन्हा जोरदार आक्रमण केलं. पहिला राऊंड अर्जुनने ५-० असा गमावला.
रिंगच्या बाजुला उपस्थित सगळं वातावरणं शांत होतं, खान सर अर्जुनला बोलले, "बेटा, क्या हो गया तेरे हाथोंको? ये वही छोकरा है जिसको तुने देड मिनिट मे आस्मान दिखा दिया था..!" "आजही तसंच होईलं" असं अर्जुन बोलला. दुसरा राऊंड सुरु झाला, अर्जुन उजव्या हाताचा बॉक्सर होता, पन अचानक त्याने डाव्या हातानं पंचेस सुरु केले. प्रताप त्यामुळे गोंधळला. त्याचा आक्रमक पवित्रा एकदम बचावात्मक झाला. अर्जुनने दोन मिनिटातच १२ पॉईंट्स मिळवले, पहिला राउंडला एकही गुण न मिळवता येणार्या अर्जुनने जणु सगळी बाजी फिरवुन टाकली. सगळं स्टेडियम पुन्हा अर्जुनला चिअर करु लागलं. "मेरा शेर जाग गया, अब तो ये गया.." असं नजरेनंच अर्जुनच्या कोचनं प्रतापच्या कोचला खुणवलं. दुसरा राउंडमध्ये अर्जुनला सात गुणांची मोठी आघाडी मिळाली. प्रतापनं मनातुन तिथंच नांगी टाकली, पण शेवटचा राऊंड खेळुयाचं असं त्यानं ठरवलं. तिसरा आणि शेवटचा राउंड सुरु झाला, प्रताप एक पॉईंट मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करु लागला. अर्जुनने त्याला अडिच मिनिटं नुसतं रिंगमध्ये दमवलं. आणि शेवटचे काही सेकंद बाकीच असतांना एक जोरदार पंच त्याला लगावला. प्रतापच्या डोळ्यांसमोर काजवंच चमकली. तो तिथंच पडला, आणि अर्जुने सामना जिंकला. "अरे आवाज कुणाचा, आमच्या करियर किलरचा.." "अरे बघतोस काय रागाने, बाजी मारली ढाण्या वाघाने..!" अशा आनंदाने मुलं आरोळ्या ठोकायला लागली. खान सर एकदम खुष झाले. पुढच्या दोन मॅचला अर्जुनला बाय मिळाला, आणि तो सरळ फायनल मध्ये पोहचला. एकाच दिवसात सगळ्या मॅचेस पार पडायच्या त्यामुळे प्रत्येक बॉक्सर थकलेला असायचा, खुद्द अर्जुनही. शेवटची फायनल मॅच पाच राउंड्सची ठेवण्यात आली.
खान सर अर्जुनला मॅचसाठी टिप्स देत होते, तितक्यात सोहम तिथं आला, त्याच्याबरोबर स्वरालीपण होती. तेजाली तिला घेऊन आली होती. स्वरालीला बघताच अर्जुन खुप खुष झाला. "खान सर, ये अपने अर्जुन की अच्छी दोस्त है.." असं सोहमने खान सरांना सांगितलं.. "बेटा, इधर बैठ जाओ, देखो कितना कमालका बॉक्सर है अपना अर्जुन." असं खान सरांनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत स्वरालीला सांगितलं. "तुझ्यासाठी तुझं लेडीलक पण सोबत आहे अर्जुन, बॉस आजची फायनल एकदम जबरदस्त झाली पाहिजे." असं सोहम अर्जुनला बोलला. "अर्जुनला करियर किलर असं का गं म्हणतात?" असं स्वरालीनं शेजारी बसलेल्या तेजालीला विचारलं. "अग बघ तु त्याची फाईट एकदा, कळेलच की तुला..!"असं तेजाली एकदम एक्साइट होऊन बोलली. फायनल मॅच सुरु झाली. अर्जुन आणि त्याचा प्रतिस्पर्धी गॅंथर डिसुजा समोरासमोर आले. गॅंथर यावेळी पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये उतरला होता. पण या खेळातला मुरलेला खेळाडु वाटतं होता. त्यानं त्याच्या सगळ्या फाईट्स पहिल्याच राऊंडमध्ये प्रतिस्पर्ध्याला क्नॉक आऊट करुन जिंकल्या होत्या. अर्जुन आणि त्याची नजर एकमेकांना भिडली, आपल्या छातीवर पंच मारत गॅंथर त्याच्याकडे बघुन बोलला, "अर्जुन राजपुत होप बेस्ट मॅन विन्स" अर्जुननेही त्याच्याकडे बघत सकारात्मक मान हलवली.
मॅच सुरु होण्याची बेल वाजताच गॅंथर चित्त्यासारख्या वेगानं अर्जुनवर झपटला. त्यानं त्याच्यावर धडा-धड पंचेसची बरसातच केली. अर्जुनेही आपला भक्कम बचाव केला आणि त्याला एकही पॉईंट मिळणार नाही याची खात्री घेतली. पहिल्या राउंडमध्ये एकाही बॉक्सरला एकसुद्धा गुण मिळाला नाही, आणि राउंड टाय झाला. गॅंथरने अर्जुनवर केलेल्या आक्रमक चालीमुळे अर्जुनला मार तर बसला होता, पण त्यानादात गॅंथरपण बराच दमला होता. ते दोघंही आता एकसारख्याच ताकदीचे वाटत होते. त्यादोघांना जोरदार चिअरिंग चालु होतं. "अर्जुनला किती मार बसतोय, तो का बरं त्याला मारत नाहीए?" असं स्वरालीच्या चेहर्यावर हावभाव होते. दुसरा राउंड सुरु होण्याआधी अर्जुनने तिच्याकडे बघितलं, "काळजी करु नकोस, मला काहीचं झालेलं नाही," असं त्याने डोळ्यानचं तिला खुणवलं. दुसरा राउंड सुरु होताच अर्जुने प्रतापच्या फाईटसारखीच डाव्या हातानं आक्रमन करण्यास सुरुवात केली. अर्जुनची ती फाईट बघितली असल्याने गॅंथर सावध होताच, पण अर्जुनला पॉईंट्स घेण्यापासुन रोखायचं कसं हेच त्याला उमजत नव्हतं. अर्जुनने तो राउंड ४-० असा जिंकला. तिसरा राउंडही अर्जुनने ५-४ असा जिंकला, चौथा राउंड जिंकल्यावर तो मॅचही जिंकणार होता, अपस्थित सर्व त्या दोघांची मॅच बघुन दंग झाले होते.
"इस राउंड के साथ अर्जुन मॅच भी जितले, उसे पंच उठाने का भी वक्त नही मिलना चाहिए.." असं म्हणतं खान सरांनी अर्जुनला प्रोस्ताहित करण्यासाठी म्हंटलं. चौथा राउंड सुरु झाला, बेल वाजताच गॅंथरने जोरदार आक्रमण करत अर्ध्या मिनिटांत तीन पॉईंट्स वसुल करुन मॅच मध्ये रंगत आणली. अर्जुनेही त्याच्या आक्रमणाला चोख उत्तर दिलं, पण चौथा राउंड संपायला थोडाच वेळ असतांना गॅंथरचा एक पंच अर्जुनच्या नाकाच्या एकदम जवळ बसला, त्याचा वार इतका जोरदार होता की, बसलेले सगळे उभे राहिले. अर्जुनला काही उमजायाच्या आत गॅथरने अजुन दोन पॉंईंट्स वसुल केले. चौथा राउंड संपला त्यावेळी दोघांचेही ९-९ असे समान गुण झाले होते. दोघेही बॉक्सर कमालीचे थकले होते, पण त्यांच्यातला कोणीच हार मानायला तयार नव्हता. सगळे जण फायनल मॅच च्या फायनल राउंडची श्वास रोखुन वाट बघु लागले, आणि तितक्यात शेवटचा राउंड सुरु झाल्याची बेल वाजली, पहिल्या राउंड पासुन आक्रमक खेळ करणार्या गॅंथरने बचावात्मक खेळ करायला सुरुवात केली.
एक छोटीशी चुक खुप महाग पडेल, म्हणुन ते दोघं खुप खबरदारी घेतं होते, दोन मिनिटं झाली, दोघांपैकी कुणीच चाल केली नाही, शेवटचा एक मिनिट बाकी असतांना शेवटी गॅंथरचा संयम सुटला. अर्जुनला अप्परकट करण्याच्या प्रयत्नात असतांनाच अर्जुनने त्याला जोरदार स्ट्रेट पंच केलं, गॅंथर खाली कोसळला. सगळे अर्जुनला चिअरअप करु लागले. अंपायरने काउंट सुरु केलं, त्याच्याबरोबर सगळे काउंट करु लागले. वन, टु, थ्रि, फोर, फाईव्ह, सिक्स, सेव्हन, एट, नाईन, टेन, असा काऊंट पुर्ण होताच सगळे जण धावत रिंगजवळ आले. अर्जुन फायनल मॅच जिंकला होता. हर्षितनं त्याला आपल्या खांद्यावर उचलुन घेतलं, खान सरांच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले, अर्जुन हर्षितच्या खांद्यावरुन उतरला, आणि स्वराली जवळ गेला. ती त्याच्याकडे बघुन हसली. तिचा हात पकडुन तो तिला रिंग मध्ये घेऊन गेला. गॅंथर तोपर्यंत तिथचं पडला होता. "थॅंक्स फॉर दि बेस्ट फाईट, यु डिझर्व दिस" असं गॅंथर अर्जुनला बोलला. अर्जुनेही त्याच्याशी हात मिळवला, आणि आपल्या खिलाडुवृत्तीचं दर्शन दिलं. त्यानं जिंकलेली ट्रॉफी त्यानं खान सरांच्या पायावर ठेवली. त्यांची छाती अभिमानानं फुलुन गेली. प्रत्येक जण त्याला विजयाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत होता. स्वराली अर्जुनचे ते कौतुक डोळे भरुन बघतं होती. कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर "पार्टी...पार्टी.." असं त्याचा ग्रुप त्याला म्हणु लागला. त्यानही आनंदाने पार्टी दिली.

Saturday, April 21, 2012
Friday, April 20, 2012
Thursday, April 19, 2012
Wednesday, April 18, 2012
प्रमादाची कथा..!
काय सांगु, तुम्हाला त्यांचा संसार कसा होत?
सरस्वतीच्या जोडीला लक्ष्मीचा त्यांच्या घरात वास होता !
सर्व सुखं त्याला मिळाली होती,
कष्टाच्या अन विश्वासाच्या चाकांवर संसारगाडी सुखानं नांदत होती.
पण नियतीलाही त्यांच सुख बघवत नव्हतं,
मित्रांना त्याच्या यशाचं गुढच उलगडत नव्हतं,
मित्रांनी मग त्याला आता त्यांच्यात ओढला..
मैत्रीच्या खातरं त्याला दारुचा नाद लावला..
कधी देशी तर कधी विदेशी एकत्र त्यानं मिक्स केली,
जुगारात आपली कष्टाची कमाई नकळ्त ओतायला सुरु केली.
टाळ-मॄदुंगाचा जेथे नाद घुमायचा,
तिथं आता शिव्या अनं भांडणाची जागा होती..!
ज्या पत्नीला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं,
आज तिलाच त्यानं बडवलं होतं.
आपल्या पतीला तीनं समजवण्याचा फार प्रयत्न केला होता,
पण दिवसेंदिवस तो दारुच्याच आहारी गेला होता.
कर्ज वाढतं चाललं , वसुल करणारे सारखी चकरा मारायची,
त्यांना उत्तर देतांना त्याची बायको-पोरं रडायची.
त्याला अन त्याच्या दारुला ती कंटाळली होती,
लेकरांना घेऊन तीनं त्याच्या घराची पायरी ओलांडली होती.
बायकॊ गेल्याच्या दुखाःन तो आणखी दारुच्या जवळ गेला,
परिस्थितीशी लढायला तो आता एकटाच राहिला.
सकाळी मंदिर तर रात्री मस्जीदचा त्यानं आसरा घेतला,
होत्याच नव्हतं केलं पण दारुचा नाद नाही सोडला.
वेगवेगळ्या आजारांची त्याची आता मैत्री झाली होती,
शेवटच्या क्षणी त्याला अस्तित्वाची जाणीव झाली होती...
खुप रडला...स्वतःवरच चिडलां...
पश्चाताप करत त्यानं जुणे दिवस आठवतच जीव सोडला...
अशी होती ही प्रमादाची कथा....
दारुच्या दुष्परिणामांची कित्येक घर सांगतायं अशीच व्यथा....!

कोल्हाट्याचं पोरं..!
नमस्कार मित्रांनो, मनात आपण कधी कधी वास्तवाशी निगडीत असलेले शब्द लपवुन ठेवतो, आणि असेच काही वास्तव दर्शवणारे शब्द मी "कोल्हाट्याचं पोरं..!" या कवितेतुन मांडायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला ठाऊकच आहे की "कोल्हाट्याचं पोरं" हे आत्मवृत्त श्री. किशोर काळे यांची अजरामर अशी साहित्यकृती आहे, आपल्यापैकी कित्येकांनी ती वाचली असेलच, ज्यांनी ती वाचली नाही त्यांच्यासाठी ही कविता म्हणजे त्या पुस्तकाचं सार आहे असं मला वाटतं..! आशा करतो तुम्हाला कविता नक्की आवडेल..!
लावायला बापाचं नाव नव्हतं,
म्हणुन त्याने आईचं नाव लावलं होतं,
जन्मला नाही तोच नियतीनं,
अन्यायाचं गाठोडं त्याच्या डोक्यावर ठेवलं होतं..!
आईच्या दुधालाही त्याला मुकावं लागलं होतं;
जीवनाच्या तमाशानं त्याला आई पासुन दुर केलं होतं,
पतीच्या मर्जीखातरं तीनं तमाशाशी नातं तोडलं होतं,
"बाई..बाई..!" म्हणनारं तिचं लेकरु मागेच राहिलं होतं ..!
खाव्या लागल्या होत्या शिव्या, अंगावरही बसले फटके,
रक्ताच्याच नात्यानं का द्यावे त्या बालमनावर चटके?
दुसरा कोणी असता तर तो प्राणालाच असता मुकला,
अन्यायाच ओझ घेऊनच किशोर काळे जगला..
शिक्षणाचा त्याला मोठा आधार वाटत होता,
कारण शिक्षणच त्याच्या मुक्तीचा एकमेव मार्ग होता,
पण त्या मार्गावर चालतांना लागायची दरवेळी ठेच,
कारण शिक्षणासाठी सोडवायला लागायचा पैशांचा पेच..
जमलं असतं तर भडवेगिरीही करु शकत होता,
पण शिक्षणासाठी अन्याय सहन करायचा त्याचा मार्ग होता,
परिस्थितीवर मातं करुन तो चार बुक शिकला होता,
ज्या समाजानं दरदिवस जीवघेणा दिला,
त्याच समाजाला वाचवणारा तो डॉक्टर झाला होता..!
तरी त्याच्या प्राणावर ऊठणारा हा समाज आहे किती कठोर.?
अन्यायाचा सुमेरु ऊचलुन नियतीशी लढणारं ते होतं कोल्हाट्याचं पोरं..!
ते होतं कोल्हाट्याचं पोरं...कोल्हाट्याचं पोरं...!

कवितांच माहेर..!
नमस्कार रसिकांनो, मनात लपवलेले शब्द यंदा घेऊन आलोय ते कवितेच्या स्वरुपात..! "कवितांच माहेर..!" या माझ्या काव्यसंग्रहातील पहिली कविता तुमच्यासमोर सादर करतांना मला नक्कीच आनंद होतोयं यात शंका नाही..!
आहे निर्मळ ,निस्वार्थ भावनांची सर,
वास्तवाची जाण असणारं हे छोटसं सदर,
आठवणींचीही आठवण जपणारं आहे हे कवितांच माहेर...!
नाजुक प्रेमाची या कविता घालतील फुंकर ,
शब्द जरी सोपे पण ह्या कविता करयला लावतील विचार..!
रंजलेल्या गांजलेल्यांना देतील मायेचा आधार,
कारण परिस्थितीने घडवले ह्या कवितांवर संस्कार..!
निखळ हास्याबरोबर कधी डोळेही पाणावतील,
वाट चुकलेल्या वाटसरुला त्या वहीवाट दाखवतील...!
साद घालुन तुम्हाला दाद मिळवण्याची आहे
माझ्या कवितांची तयारी....
कारण माहेरवाशीण कविता आता आलीय
तुमच्या मनाच्या दारी ..
सांभाळा त्यांना कारण प्रत्येक कविता
जन्मभर तुमच्याच मनात नांदणारी.....!

Tuesday, April 17, 2012
Monday, April 16, 2012
"थंड घे थंड...!" 2
सर्व "थंड घे थंड...!" या शिर्षकाखाली असलेल्या माझ्या सर्व ग्राफिटी माझ्या ब्लॉगवर तसेच फेसबुक पेजवरही उपलब्द आहेत.
Visit:-www.facebook.com/garudswapnil
Visit:-www.facebook.com/garudswapnil
Sunday, April 15, 2012
यंदाच्या कडकडीत उन्हाळ्यात जरा "थंड घे थंड..!"
नमस्कार मित्रांनो, "मनांत लपवलेले शब्द..!" या ब्लॉगवर आजपासुन तुमच्या भेटीस घेऊन येत आहे शब्दांची चौफेर फटकेबाजी म्हणजेच ग्राफिटी, यंदाच्या कडकडीत उन्हाळ्यात जरा "थंड घे थंड..!" या शिर्षकाखाली..!
तो आणि त्याची ती...! १.६
"हाय अर्जुन, काल तु दिलेला टेडी मला खुप आवडला, अगदी तुझ्या सारखाच आहे, नुसता माझ्याकडे बघत असतो, काहीच बोलत नाही, मी रात्रभर त्याच्याशी गप्पा मारत होते," असं स्वराली बोलली. अर्जुनही जरा लाजतच बोलला, "चल मग आज आपण गप्पा मारतच जाऊ तुझ्या, क्लास पर्यंत." मग ते दोघं एकमेकांबरोबर क्लासकडे निघाले. रस्त्यानं जाता जाता अर्जुनंला रस्त्याच्या लगतची काही रानफुलं दिसली, त्यांच्यावर पडलेल्या दवबिंदुंमुळे ते फुलं गुलाबांच्या फुलां इतकीच सुंदर दिसत होती. त्याच्यातलं एक फुल त्यानं तोडलं, त्याच्यारच्या दवबिंदुचा एक थेंब त्यानं बोटावर घेतला. "निसर्ग सुंदर किमयागार आहे ना अर्जुन?" असं ती अर्जुनला बोलली. "हो ना, ह्या दवबिंदुलाच बघ ना, अगदी मोत्यासारखाच वाटतोयं ना? पण जरा अजुन उन पडलं की ह्याचं अस्तित्व नाहीसं होईल, आणि पुन्हा सकाळी परत आज सारखं सौंदर्यं याच्या वाट्याला येईल." अर्जुन आणि स्वरालीचा असा संवाद सुरुच होता, बोलण्याच्या नादात स्वरालीला क्लासला जाण्याचं लक्षातच राहिलं नाही. ते दोघं एकमेकांशी बोलत चालले असतांना, त्यांना समोरुन अचानक मैथिली येतांना दिसली. त्या दोघांना बघताच मैथिलीनं स्कुटी थांबवली, "स्वराली, घरी चल पटकन तुझ्या, तुझ्या आजीची तब्येत अचानक खुप बिघडली आहे, इतक्यात क्लासवर फोन आला होता." मैथिली असं बोलल्या-बोलल्या स्वराली रडायला लागली.
"मैथिली तु स्वरालीला घेऊन जा पटकन, मी पोहतोच तुमच्या माघनं." असं अर्जुन स्वरालीला धीर देत बोलला. मैथिली आणि स्वराली घरी पोहचल्याच तोच, तिला तिची आई रडतांना दिसली. "आई, आजीला कायं झालं गं?" असं खांद्यावरचं दप्तर बाजुला टाकतं स्वरालीनं रडक्या स्वरातच चिचारलं, आईनं फक्त बोटानं आजीच्या खोलीकडे इशारा केला. स्वराली धावतच आजीच्या खोलीत गेली, आपल्या पलंगावर आजी एकदम निचपत पडली होती, स्वरालीचे बाबा अगदी लहानमुलासारखे रडतं होते, आजीला तपासत असलेल्या डॉक्टरांनी, "सॉरी मराठे साहेब, शी इज नो मोअर", असं खाली मान घालुन सांगितलं, "आशु, असं कसं काय झालं गं, कालच स्वराचा वाढदिवस झाला, किती खुष होती आई," असं म्हणतं स्वरालीच्या बाबांनी हंबरडा फोडला, आणि स्वराली पन, "आजी" असं म्हणतं रडायला लागली.
हार्ट ऍटॅक आल्याने स्वरालीच्या आजीचं दुखःद निधन झालं होतं. थोड्याच वेळात अर्जुन तिथं पोहचला. स्वराली, तिची आई आणि बाबा रडतं होते, अर्जुनला बघताच स्वरालीची आई बोलली, "शेवटच्या क्षणी माईंना तुला आणि स्वरालीला बघायची ईच्छा होती रे, माझी बाहुली कुठेयं रे बच्चा.. बाहुली ये ना गं, तुला राजकुमाराची गोष्ट सांगायची आहे, असं म्हणतचं त्यांनी अखेरचा श्वास घेतला." आणि स्वरालीच्या आई पदराआड तोंड लपवुन रडु लागली. अर्जुन आत मध्ये आला, आतल्या खोलीत आजीच्या डोक्याजवळ बसुन रडणारी स्वरालीला बघितल्यावर त्याच्याही डोळ्यांत आसवं आले. अर्जुनला बघताच, स्वराली ओक्साबोक्शी रडु लागली. "अर्जुन आजीला सांग ना रे, माझ्याशी बोलायला, बघं ना माझ्याकडे बघतचं नाहीऐ, आजी, तुझी बाहुली रडतेयं गं, उठं ना आजी, मला राजकुमाराची गोष्ट सांग ना आजी, आजी मी काढलेलं इंद्रधनुष्याचं चित्र बघं ना आजी, बाबा सांगाना आजीला काहीतरी,"
थोड्यावेळानं स्वरालीचे सर्व नातेवाईक जमले, आजीनं देहदान करायचं ठरवलेलं होतं, आईच्या ईच्छेनुसार मग त्यांचा देह दान करण्यात आला. आज आपण स्वरालीबरोबर रस्त्यानं बोलत चाललो नसतो तर कदाचित स्वरालीला तिच्या आजीच्या शेचटच्या क्षणाला त्यांच्या सोबत असु शकली असती, या विचारानं अर्जुन अजुनच दुखी: झाला. स्वरालीची दशा त्याला बघवली जात नव्हती. तिच्या आईपेक्षाही आजीमध्ये तिचा जास्त जीव होता. रडुन रडुन स्वराली एकदम कोमेजलेल्या फुलासारखी झाली होती. तिच्या डोळ्यांतली आसवं आटली होती, पण हुंदके सुरुच होते. स्वरालीच्या आजीचं अस आकस्मिक निधन एकदम वाईट स्वप्नासारखं तिच्या कुटुंबाला वाटत होतं, आदल्या रात्री आपल्या लाडक्या नातीचा वाढदिवस म्हणुन आजी खुप उत्साही होती. आपल्या बाहुलीचं मन त्यांना माहिती होतं, तिला आवडणार्या राजकुमाराच्या गोष्टीतला तिला हवाहवासा राजकुमार कोण होता हे फक्त आजीलाच ठाऊक होतं, नदीच्या किनारी असलेलं इंद्रधनुष्य, त्याच्या जवळुन उडणार्या दोन पाखरं या स्वरालीच्या चित्राचा अर्थ फक्त आजीलाच उमजायचा. अर्जुनंने ज्या दिवशी तिला डायरी दिली होती, त्या दिवशी स्वरालीनं एका वाळवंटातल्या झाडाला पालवी फुटल्याचं चित्र काढलं होतं, ते बघतांना सगळ्यात जास्त आनंद आजीलाच झाला होता. लहानपणी फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तिला परी सारखं तयार करतांना "आजी मी मोठ्यापणी अशीच सुंदर दिसेल का गं?" असं विचारणार्या स्वरालीला आजीला शेवटच्या क्षणी परीच्याच रुपात बघायचं होतं.
आजीचं निधन होऊन दहा दिवस उलटले होते, स्वरालीनं अन्न-पाण्याला स्पर्शही केला नव्हता, आजीच्या खोलीत लहानपणी आजीनं घेऊन दिलेल्या बाहुलीला जवळ घेऊन ती तशीच बसलेली असायची, "स्वरा, माझ्या बाळा, दोन घास खाऊन घे," असं तिच्या जवळ बसुन रडणार्या तिच्या आई-बाबांकडे तिचं लक्ष नसायची, "आजी-आजी" करत असलेली स्वरालीला बघितल्यावर त्यांच काळीज हेलावुन जायचं. तिची जीवलग मैत्रिण मैथिली तिला बोलतं करायचा प्रयत्न करायची, पण काहीच उपयोग होत नव्हता, स्वरालीला बघितल्यावर मैथिलीला देखील रडायला यायचं. "अर्जुन, बेटा स्वरालीची तब्येत खुप खराब झालीऐ रे, तव्या सारखं तिचं अंग तापलयं रे, डॉक्टरांनी इंजेक्शन्स दिलीत, पण ती काहीच खात-पितं नाही रे, चल ना माझ्याबरोबर." असं अर्जुनला सांगायला रात्री दिड वाजता स्वरालीचे बाबा आले. अर्जुन घाई-घाईनं स्वरालीच्या घरी आला. स्वरालीकडे बघुन त्याच्या डोळ्यातं पाणी आलं, तिच्या आईनं दिलेलं जेवणाचं ताट तो तिच्या जवळ घेऊन गेला.
"स्वराली, आजीसाठी तरी दोन घास खाउन घे गं." असं म्हणतांना त्याचा कंठ दाटुन आला, तरी स्वरालीनं त्याला काही प्रतिसाद दिला नाही. "बाहुली असं नको करु गं," असं म्हणतं अर्जुनने तिला घास भरवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनला बघताच स्वराली पुन्हा रडायला लागली. अर्जुनने तिला तिच्या हातानं जेवण भरवलं, अगदी तिच्या आजीसारखं, लहानपणी त्याला झोपवतांना त्याची आई म्हणायची तीच अंगाई म्हणत त्यानं तिला थापटवुन झोपवलं. रात्रभरं त्याचा हात तिच्या हातात तसाच होता. सकाळी औषधांचा परिणाम दिसु लागला. स्वरालीचा ताप उतरला होता, पण तिच्या मनाला लागलेल्या धक्क्यातनं ती अजुनही सावरली नव्हती. तिची बारावीची प्रॅक्टिकल्सची परिक्षा जवळ येत होती. स्वराली ना क्लासला जात होती, ना कॉलेजला नुसती घरात एकटीच रहात होती, आई-बाबांबरोबर खुपच कमी बोलत होती. तिच्या आईनं तिच्यासाठी महिनाभर रजा घेतली होती. अर्जुन रोज कॉलेजला जाण्याआधी तिला भेटुन जायचा. कॉलेजवरुन आल्यानंतर कितीतरी वेळ तो तिच्यासोबत असायचा. तिला हसवण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करत होता.
हळु हळु स्वराली स्वतःला सावरु लागली होती, हे बघुन तिच्या आई-बाबांना बरं वाटु लागलं होतं, तिला या धक्क्यातनं सावरायला सगळ्यात जास्त मदत झाली ती अर्जुनचीच. अर्जुनने तिला संपुर्ण लक्ष अभ्यासवर केंद्रित कराण्यासाठी मोलाची साथ दिली. त्यानं दिवसरात्र एक करुन तिच्यासाठी सगळ्या विषयांच्या नोट्स तयार केल्या. हल्ली त्याला स्वतःपेक्षा स्वरालीचीच चिंता जास्त असायची. "अगदी माईंसारखी माझ्या स्वराची काळजी करतोस रे अर्जुन तु..!" असं स्वरालीची आई बोलल्यावर अर्जुनला अनोखं समाधान मिळायचं. स्वरालीची प्रॅक्टिकल परिक्षा जवळ येऊन ठेपली होती. आणि अर्जुनच्या कॉलेजमध्येही गॅदरिंग आणि डेज सुरु व्हायला केवळ एकाच आठवड्याचा वेळ राहिला होता. त्याच्या ग्रुपच्या नाटकाची प्रॅक्टिस जोरात सुरु होती, अर्जुन प्रॅक्टिसला का येत नव्हता हे सगळ्या ग्रुपला माहिती होतं. एकेदिवशी कॉलेज झाल्यानंतर त्याचा सगळा ग्रुप त्याच्या घरी आला, तेजाली आणि शामलीने नाटकाची प्रॅक्टिस थोडावेळ बघण्यासाठी स्वरालीलापण बोलावुन घेतलं. त्यादिवशी सगळया ग्रुपनं न चुकता सगळं नाटक सादर केलं, स्वराली खुप खुष झाली होती. तीनं सगळ्यांना गॅदरिंगसाठी शुभेच्छा दिल्या. किती दिवसांनतर स्वरालीच्या चेहर्यावर हसु बघितल्यामुळे अर्जुनपण खुष झाला. "थँक्स दोस्तांनो, आज तुमच्यामुळेच स्वरालीच्या चेहर्यावर हसु आलं, जे मला एकट्याला जमलं नाही ते तुमच्यामुळे शक्य झालयं!" असं स्वराली गेल्यानंतर अर्जुन आपल्या ग्रुपला बोलला.." यंदाचा ड्रामा आपण खास अर्जुन आणि स्वरालीसाठीच करुया..!" असं नाटकाचा सर्वेसर्वा असलेला हर्षित बोलला. "ओ.के. डायरेक्टर.." असं बाकीचे एका सुरात बोलले.
नववर्ष सुरु झाल्यानंतर अर्जुनला त्याची डायरी फक्त दोनच दिवस लिहिता आली होती, नंतर त्याच्या डायरी लिहिण्यात खंड पडला, आज रात्री त्याला डायरी लिहावं असं वाटलं, आज त्यानं डायरी हातात घेतली, तिच्यावर टाकलेलं, "तुझ्या एकांतात सदैव मी..!" असं नाव त्याने खोडुन टाकलं. त्याजागी "तुझ्यासाठीच सर्वस्वी मी..!" असं नाव त्यानं टाकलं. स्वरालीने त्याला दिला होता तो पेन त्यानं जवळ घेतला. आणि त्याची डायरी लिहायला सुरुवात केली..
"आज १८ जानेवारी, गेल्या दहा वर्षांत जे घडलं नाही ते यंदा घडुन गेलं, आज डायरी लिहितांना मला एकांताची नाही तर स्वरालीची चिंता सतावते. किती निरागस आहे ती, बरं झालं तिला विधात्यानं माझ्यासारखं मन नाही दिलं. तिच्या आजीच्या अशा आक्समिक निधनाने तीच्याच कुटंबाला नाहीतर मलाही प्रचंड धकका बसलायं. "अरे आज माझ्या स्वरालीचा वाढदिवस आहे ना, तिच्यासाठी प्रार्थना करायला आले होते" असं आदल्यादिवशी उत्साहनं सांगणार्या तिच्या आजीबरोबर असं का झालं? माझंही कुटुंब देवीच्या दर्शनाला जातांना अपघातात ठार झालं, मला तर हल्ली कुणासाठी देवाकडे प्रार्थना करायलाही भिती वाटु लागलीये. स्वरालीच्या डोळ्यांत अश्रु बघितले की खरचं मन खुप हेलावुन जायचं, तिला यातनं सावरण्यासाठी मला जे जे शक्य होईल ते सगळं करायचा प्रयत्न नक्की केलाच पाहिजे. शिवाय तिचं बारावीचं वर्ष, या सगळ्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर मुळीच व्हायला नको.
बरं झालं आज सगळा ग्रुप घरी आला होता, तेजालीने स्वरालीला नाटकाची प्रॅक्टिस बघायला बोलवलं ते बरं झालं, तेवढचं तीचं मन हलकं झालं.! त्या दिवशी स्वरालीचे बाबा रात्री दिड वाजता घरी आल्यावर काळीज एकदम धस्स झालं, स्वराली कडे बघितल्यावर तिला जगण्याची ईच्छाच उरली नव्हती असं वाटतं होतं, तिच्या आई-बाबांनी तिला जेवु घालायचा किती प्रयत्न केला होता, पण तिनं मी भरवल्यानंतर जेवण केलं, तिला अंगाई म्हणुन झोपवतांना तिनं माझा हात घट्ट पकडला होता. अगदी लहान मुलं आपल्या आईचा हात पकडुन ठेवतं तसाचं..! तिची आजी म्हणायची ते अगदी खरचं आहे, स्वराली खरचं बाहुली सारखीच आहे. माझ्या या बाहुलीला खरचं यापुढे माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत आनंदी ठेवायचा प्रयत्न करण्यासाठी मला सदैव बळ मिळु दे, अगदी तिला तिच्या आजीच्या गोष्टींतला राजकुमार तिला मिळे पर्यंत.!"

तो आणि त्याची ती...! १.५
"आज १ जानेवारी, आयुष्यात आलेल्या या नव्या वर्षाची सुरुवात पहाटेच्या गोड स्वप्नानं होणं, आणि प्रत्यक्षात ते खरचं घडेल, असं दिवसभर जाणवनं ही आज घडलेली घटना माझ्या सदैव लक्षात राहणारी आहे. आज कितीतरी दिवसांनंतर घरी आल्यानंतर माझं मन शांत होतं. माझ्या सगळ्या कुटुंबांच जेव्हा आकस्मिक निधन झालं, त्यानंतर उगवलेला प्रत्येक दिवशी मला वाटायचं कशाला जगतोय मी, का मी माझी जिवनयात्रा संपवत नाहिए, माझं आपलं म्हणावं असं या जगात कुणीच नाही, माझ्या वाचुन कुणाच काही अडतं नाही, माझ्या जिवनाला काही ध्येय्यच उरलं नाही. कॉलेज मध्ये असतांना माझ्या मित्रांमुळे मला माझ्या एकांतपणातुन जराशी सुटका तरी मिळते, पण घरी आल्यावर या एकांतात राहणं म्हणजे काय असतं, हे कुणालाच कळणार नाही. पण आज माझं मन जरा हलकं झालयं आहे असंच वाटतयं. स्वरालीशी झालेली ही अनपेक्षित भेट खरचं किती छान होती. का मी इतके दिवस तिच्याशी बोलत नव्हतो? का मी तिला सारखा टाळत होतो? कदाचित या क्षणी मला याचं उत्तर मिळणार नाही. "सहा-सहा मुलींबरोबर अफेअर्स असणार्याला काय कळणार प्रेम कायं असतं.!" असं मी सकाळी सोहमला बोललो तर खरं, पण मला तरी कुठे प्रेमाचा अर्थ कळतोयं का? सोहम म्हणतो, "जीवन फक्त आकर्षणाने भरलेलं असतं, प्रेम वैगेरे काही नसतं, प्रेम आंधळ असतं असं म्हणानारे स्वतःच मात्र जी सुंदर असते त्याच मुलींवर प्रेम करतात. आकर्षण ही मेंदुनं दिलेली देनगीच आहे, म्हणुन जरा डोक्यानं वागलं तर जीवनात पाहिजे त्या मुलीबरोबर अफेअर करता येतं." कदाचित त्याच्या अनुभवांवरुन तो बोलत असावा. पण हर्षित नेहमी आपल्या ह्र्दयाला पटेल तसाच वागणारा, प्रेमावरं तो बोलायला लागला की नुसतं ऐकत राहावसं वाटतं, पण तरीही तो कोणाच्या प्रेमात नाही ना कुणी त्याच्यावर प्रेम करतं, ही त्याची शोकांतिका.
आज स्वराली बरोबर बोलतांना तिच्याबद्दल आकर्षण जाणवतं होतं का, की मी तिच्यावर प्रेम करु लागलोय, की आकर्षण आणि प्रेमाच्या मध्ये असणारं काही माझ्या आणि तिच्यात आहे, ह्याचाच विचार मला मला करावासा वाटतोयं. आज मला खरंच काय होतयं ते ठाऊकच नाही, पण शब्दांत सांगता येणार नाही असा आनंद मात्र मिळतोय. स्वरालीनं नकळतं मला यावर्षी करायचा संकल्प सांगितला, खरचं मी तिच्या आणि माझ्यासाठी नक्की वेळ काढत जाईल. यंदा आमच्या नाटकाच्या नावाप्रमाणेच, "तिच्या साठी वाट्टेल ते."
डायरी लिहुन झाल्यानंतर मग अर्जुन पुन्हा आपल्या ग्रुप मध्ये मिक्स झाला, आणि ते सर्व जण नाटकाबद्दल चर्चा करु लागले. प्रत्येकाने आपल्याला कोणती भुमिका शोभेल असं हर्षितला सांगितलं, त्यानुसार त्यानं नाटक लिहिण्यास सुरुवात केली. हर्षितला कविता करणं, नाटकं लिहिणं, लेख लिहिणं खुप आवडायचं. कॉलेजमध्ये दरवर्षी होणार्या फ्रेशर्स पार्टी, गॅदरिंग आणि फेअरवेल पार्टीच्या एका दिवसाचा तोच सुपरस्टार ठरायचा. हर्षितनं दोन तासात नाटकाची स्क्रिप्ट लिहुन काढली. फुल इमोशन्स विथ रोमान्स, तुफान विनोद, अनएक्सपेक्टेड ट्विस्ट त्यानं त्या नाटकाच्या स्क्रिप्ट मध्ये ओतलं होतं. शिवाय वर्गातल्या सुंदर मुलींचा गेस्ट अपिअरन्स सारखा वाटणारा रोल म्हणजे 'सोने पे सुहागाच' होता. यंदा गॅदरिंगला नाटक सादर करण्याचं हर्षितचं तिसरं वर्ष, गेले दोन वर्ष त्याला आणि त्याच्या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं, यंदा त्यांना हॅट्रिक करायची होती, म्हणुन सगळे जोमाने प्रॅक्टिसला लागले होते. रात्रीचे सव्वा बारा वाजल्यावर मग जो-तो आप-आपल्या घरी परतला.
अर्जुनलाही आज कितीतरी दिवसांनंतर शांत जोप लागली होती. पहाटे परत त्याच्या स्वप्नात कालप्रमाणेच स्वराली आली, पर्यांनी स्वर्गात घेऊन जाण्यापेक्षा एकांतात तिच्या डोळ्यांत बघतं राहणं त्याला आवडु लागलं. पहिल्या पावसात धरणी न्हाऊन निघालेली, चहुकडे ओल्या मातीचा हवाहवासा वाटणारा सुगंध, पावसापासुन अंग चोरुन झाडावर बसलेली चिमणी पाखरं, पुर्वेकडे निघालेलं इंद्रधनुष्य अशा वातावरणात नदीकाठी स्वराली चित्र काढतेय. पांढरा शुभ्र ड्रेस, मोकळे सोडलेल्या केसांत माळलेलं गुलाबाचं लाल फुल, हातात रंगात बुडवलेला कुंचल्यासह स्वराली चित्र काढतेय आणि चित्र काढुन झाल्यानंतर हलकेच आपल्याकडे बघुन हसते, "जमतयं का मला चित्र काढणं?" असं तिचे काजळ लावल्याने अधिकच खुललेले बोलके डोळे मला विचारतायं, केसांची एक बट तिच्या गोर्या गालांवर येते, ती हातानं बाजु करतांना ती खुप गोड हसते, तिच्या त्या गालांवर पडलेल्या खळ्यांकडे कितीतरी वेळ मी बघत तसाच उभा राहतोयं, असं स्वप्न आज अर्जुनला पडलं. ह्या स्वप्नातुन आपल्याला कोणी ऊठवु नये असा विचार करत असतांना त्यानं रात्री घडाळ्यात लावलेला गजर वाजला आणि त्याला जाग आली. नेहमी सारखी पुन्हा मग त्याची दिनचर्या सुरु झाली. आज तो जिमवरुन जरा लवकरच निघाला, कालसारखचं स्वरालीची आणि तिची भेट व्हावी असं त्याच्या मनाला वाटतं होतं. आणि घडलही तसचं, स्वराली आणि प्रिती दोघी जणी त्याच रस्त्यानं क्लासला जात होत्या, पण आज मात्र प्रितीनं कालसारखी स्कुटी स्लो करण्यापेक्षा सुसाट चालवली.
अर्जुनला काहीच कळलं नाही ना स्वरालीला, "मैथिली, काय गं असं का केलसं?" असं शेवटी न राहावुन स्वरालीनं तिला विचारलं. "तु अजुन पाळण्यातचं आहेस असं वाटतयं मला, मी असं का केलं ते कळेल तुला नंतर." असं मैथिली तिला बोलली. "अगं कालच आम्ही किती दिवसांनंतर एकमेकांबरोबर वेळ घालवला होता, एकमेकांना वेळ देण्याचं ठरवलं होतं, आणि तु आज असं काहीतरी करुन टाकलं, जा उद्या पासुन मी माझी-माझी एकटीच पायी पायी क्लासला येत जाईलं." असं स्वराली नाराज होऊन बोलली. "अरे बापरे, मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं, ही मांजर कधी दुध पण पिऊन टाकेल. काल तु त्याच्या बरोबर होतीस आणि तु मला आत्ता सांगतेय? एका रात्रीत किती बदललीस गं.! पण जाऊदे चांगलचं झालं, अगं आज तुझा वाढदिवस आहे त्याच्या लक्षात तरी आहे का बघुया की?" असं प्रिती स्वरालीला समजवात बोलली.
स्वराली आणि तिची मैत्रिण असं का वागली याचा विचार करत अर्जुन घरी आला, कॉलेजला जातांनाही हाच विचार त्याला सतावत होता. स्वरालीची आज भेट व्हावी असं त्याच्या मनाला वारंवार वाटतं होतं. कॉलेज बंक करुन तिच्या कॉलेजला जाऊन तिला सरप्राईज करु या असा त्याच्या डोक्यात विचार आला. त्यानं सोहमची बाईक घेतली आणि प्रॅक्टिकल बुडवुन तो तिच्या कॉलेजकडे निघाला. वाटेत त्याला स्वरालीची आजी दिसली, मंदिराच्या पायर्या उतरत असलेल्या स्वरालीच्या आजीला बघुन तो थांबला. "आज मंदिरात कसं काय आजी?" असं त्यानं स्वरालीच्या आजीला विचारलं, अर्जुनला पाहुन आजीला आश्चर्याचा धक्का बसला. "अरे आज माझ्या स्वरालीचा वाढदिवस आहे ना, तिच्यासाठी प्रार्थना करायला आले होते, सतरावं संपुन अठरावं लागलयं तिला. तु ये नक्की सायंकाळी घरी, आणि हो तु दिलेली डायरी सुरेख होती बरं का अर्जुन." असं आजीनं सांगितल्यावर तर अर्जुन खुष झाला. "आजी तुम्हाला घरी सोडु का?" असं त्यानं विचारलं, "नको रे, तु कामात असशील, मी जाईन की पायी पायी, आणि मला माझ्या मैत्रिणींकडे पण जायचं आहे." आजी बोलल्यावर अर्जुन मग थेट स्वराली ज्या कॉलेजला शिकायची त्या कॉलेजच्या गेटजवळ आला.
तिचं कॉलेज सुरु व्हायला अजुन अर्धातास वेळ होता, म्हणुन कदाचित ती कॅंम्पस मध्येच कुठेतरी असावी असा विचार करत अर्जुन त्या कॉलेजच्या कॅंम्पसमध्ये फिरु लागला. एका झाडाजवळ स्वराली आणि तिच्या मैत्रिणी अभ्यासाबद्दल चर्चा करत होत्या, कॅंम्पस मध्ये स्वरालीला शोधत असलेल्या अर्जुनवर नेमकी मैथिलीचीच नजर गेली. अर्जुन नक्कीच स्वरालीसाठी इथे आला असावा असं तिला वाटलं, आणि ती स्वरालीच्या कानात बोलली, "अर्जुन आलायं बघ कॅंम्पसमध्ये तुला शोधायला." मैथिलीनं स्वरालीला अर्जुन कुठे आहे ते दाखवलं, त्याला बघताच स्वराली एकदम खुष झाली, अर्जुन असं जोरात ओरडत त्याला पळत जाऊन कडकडुन मिठी मारावी असं तिला वाटलं होतं, ती त्याला आवाज देणार तोच मैथिली बोलली, "वेडी झालीस का स्वराली? थांब ना त्याची गम्मत करुया ना, एक काम कर इथुन आपण जाऊ, तु तोंडावर ओढणी लपेटुन घे, आणि चल माझ्याबरोबर." असं मैथिली बोलली. मग त्या दोघी कॅंम्पस मध्ये फिरु लागल्या, त्यांच्या सोबत त्यांनी बाकीच्या ग्रुपला पण जोडीला घेतलं.
त्यांच्यातली श्वेताली नावाची स्वरालीची मैत्रिण मुद्दाम अर्जुन कडे गेली आणि तिनं त्याला विचारलं, "काही शोधतायं का सर?" अर्जुनने तिच्या कडे बघितलं, आणि बोलला, "नाही नाही, मी सर वैगेरे नाही. आपण बारावीला आहात का ताई?" तिनं होकारार्थी मान डोलवत त्याला सांगितलं, "सायन्सला आहे मी, कुणाला शोधताय का? मी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहे बारावी सायन्सची." अर्जुन मग इकडे तिकडे बघत बोलला, "स्वराली मराठेला ओळखतेस का तु? ती पण बारावी सायन्सला आहे." "अरे आमच्या वर्गात तर स्वराली नावाच्या तीन मुली आहेत, पण त्यातली एकही स्वराली मराठे नाही, कदाचित तुम्ही चुकीच्या जागी आला असणार असं वाटतयं, कारण आमच्या कॉलेजमध्ये सायन्सची एकच तुकडी आहे." असं श्वेताली मुद्दाम बोलली. "नाही गं, मला पक्क माहिती आहे, थॅंक्स फॉर युवर हेल्प" असं म्हणत मग अर्जुन तिथुन जाऊ लागला. मग मैथिली समोरुन आली, तिला बघितल्यावर अर्जुनला हायसं वाटलं, आता आपली आणि स्वरालीची नक्की भेट होईल असं त्याला वाटलं. पण मैथिलीने त्याच्याकडे बघुन-न-बघितल्यासारखं केलं, आणि ती त्याच्या समोरुन निघुन गेली. अर्जुनला नेमकं मैथिलीचं नाव माहिती नव्हतं, मग तो तिच्यामागे मागे जाऊ लागला, वाळवंटात मृगजळाच्या मागे धावणार्यासारखी अर्जुनची गत झाली होती. दुरुन स्वराली सगळं बघत होती, तितक्यात श्वेताली तिथं येऊन पोहचली, "अरे स्वराली, बॉयफ्रेंड आहे का गं तुझा तो, खुप क्युट आहे, कशाला इतकं तरसवतेस त्याला, जा ना भेट त्याला, ए पण त्याला भेटल्यावर एक गोष्ट नक्की सांग की माझ्यासारख्या सुंदर मुलीला बघितल्यावर प्लीज ताई नको म्हणत जाऊ. सुंदर असण्यावर मग चिड यायला लागते, असं एखाद्या स्मार्ट मुलाने ताई म्हंटलं की."
स्वराली अर्जुनकडे जायला निघाली तोच कॉलेज सुरु व्हायची बेल झाली, सगळी मुलं-मुली आपाअपल्या वर्गात जाऊ लागली, त्या गर्दीत अर्जुन दिसेनासा झाला, शेवटी नाईलाजानं मग स्वराली वर्गात येऊन बसली. स्वराली भेटली नाही म्हणुन अर्जुन काहीसा उदास झाला, ’एकांतात तुझी वाट बघण्याचा आनंद सखे’ ही हर्षितची कविता त्याला आठवली, आणि काही झालं तरी आज स्वरालीला भेटायचंच म्हणुन तो कॉलेजच्या गेट बाहेर थांबला. स्वरालीच्या बॅचला प्रॅक्टिकल नव्हतं म्हणुन त्यांची दुपारी तीन वाजताच सुट्टी झाली, त्यांचा ग्रुप कॉलेजच्या बाहेर येतच होता, तेवढ्यात मैथिलीनं श्वेतालीला नजरेनं खुणंवलं आणि स्वरालीला बोलली, "स्वराली प्लीज आज तु प्रणाली बरोबर जाशील का? मला श्वेतालीला ड्रॉप करायचं आहे? स्वराली प्रणाली बरोबर जायला तयार झाली. स्वरालीचं लक्ष नाही असं बघुन मैथिली प्रणालीला बोलली, "मी आणि श्वेताली गेल्यानंतर पाच दहा मिनिटांनी तुम्ही निघा, गम्मत आहे." आणि ठरल्याप्रमाणे मैथिली आणि श्वेताली दोघी निघाल्या, मैथिलीच्या माघे बसलेल्या श्वेतालीनं मुद्दाम तोंडावर ओढणी लपेटली, ज्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. मैथिली स्कुटीवरुन बाहेर पडताच अर्जुनला वाटलं की नेहमी प्रमाणे मैथिली आणि स्वरालीच आहेत, म्हणुन तोसुद्धा बाईकवरुन त्यांच्या मागे मागे जाऊ लागला, मैथिलीनं मुद्दाम गाडी अर्जुनच्या कॉलेजकडे वळवली. अर्जुनला वाटलं की या आपल्यालाच भेटायला येत असाव्यात म्हणुन तो दुसर्या रस्त्यानं त्यांच्या आधी त्याच्या कॉलेजच्या गेटजवळ येऊन थांबला.
अर्जुन कॉलेजच्या गेटवर उभा आहे असं मैथिलीनं बघितलं आणि मागे बसलेल्या श्वेतालीला तिची ओढणी दुर करायला लावली, आणि अर्जुन जवळ येत आहे असं दिसल्यावर तीनं परत गाडी स्लो केली, जेणेकरुन माघे बसलेली श्वेताली अर्जुनला नीट दिसावी. मैथिलीच्या माघे स्वराली नसुन दुसरीच मुलगी आहे हे बघितल्यावर अर्जुनने कपाळावर हात मारला, गुपचुप सोहमची गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि लेक्चरला वर्गात जाऊन बसला. कॉलेज सुटल्यावर मग तो एका गिफ्ट शॉप मध्ये गेला, तिथुन त्यानं स्वरालीला वाढदिवसासाठी छान गिफ्ट घेतलं, आणि घराकडे परतला. घरी आल्यावर त्यानं छान तयारी केली.
स्वरालीचा वाढदिवस म्हणुन तिच्या आई-बाबा दोघांनी आज ऑफिसला रजा टाकली होती, नववधु सारखं सगळं घर त्यांनी सजवलं होतं, सायंकाळी स्वरालीच्या सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या, अर्जुनलाही बोलवलयं असं आजीनं आपल्या सुन-मुलाला सांगितलं होतं. स्वरालीसुद्धा पांढर्या ड्रेसमध्ये एकदम परी वाटत होती, पण सकाळी अर्जुन सोबत आपण चुकीचं वागलो म्हणुन तिचा चेहरा थोडा हिरमुसला होता. आईनं औक्षणाचं ताट आणि तिच्या आवडीचा चॉकलेट केक आणला, "चला माई, पहिले ओवाळा तुम्ही," असं डोक्यावर पदर घेतं स्वरालीची आई आपल्या सासुबाईंना बोलली. "थांब ना आई थोड्यावेळ, आत्ता कुठे सातच तर वाजलेत." असं स्वराली आईला बोलली, तिचं मन तिला सांगत होतं की अर्जुन नक्की येईल, "अगं तुझ्या सगळ्या मैत्रिणी तर आल्या आहेत ना, मग फक्त पाच मिनिटांनी करु की सुरुवात," असं आई बोलली. "अर्जुन ये ना रे पटकन, किती वाट बघायला लावणार आहेस अजुन?" असं स्वराली मनात बोलतं होती. आणि तितक्यात डोअरबेल वाजली,
"नक्की् अर्जुनच असणार." असं मनात म्हणतं ती स्वतः दरवाजा उघडायला धावली, आणि दार उघडताच समोर अर्जुन उभा होताच. "अरे अर्जुन ये ना.." असं म्हणतांना स्वराली खुप आनंदुन गेली होती, तिच्या त्या गोर्या गालांवर वेगळीच लाली आली, "हॅपी बर्थ डे, स्वराली," असं अर्जुन तिच्याकडे बघुन बोलला. "तुझ्या लक्षात होतं, माझा बर्थडे?" असं स्वरालीनं त्याला विचारलं, "हो, तुझ्या आजींमुळे लक्षात राहिला," असं अर्जुन बोलला. आपल्या लाडक्या आजीकडे स्वरालीनं बघितलं, "अगं, आज मंदिरात भेटला अर्जुन, मीच त्याला बोलावलं," आजी असं बोलली, "याच्या पेक्षा अजुन काय हवं होतं मला?" असं स्वरालीनं मनात म्हटलं.
स्वरालीचा वाढदिवसाचा कार्यक्रम छान झाला, जातांना अर्जुनने तिच्यासाठी घेतलेलं गिफ्ट दिलं, "तुला काय द्यावं हे मला सुचलचं नाही, म्हणुन हे छोटसं प्रेझेंट आणलयं, मी गेल्यावर बघं. आय होप तुला नक्की आवडेल," असं म्हणतं अर्जुन तिथुन गेला. तो जाताच तिनं घाई-घाईनं ते प्रेझेंट उघडलं, आणि ती एकदम खुष झाली, "आजी, इकडे ये पटकन, अर्जुनने बघं काय गिफ्ट दिलयं ते," असं ती आनंदानं ओरडली, "अरे वा, माझ्या बाहुली सारखंच खुप सुंदर टेडी आणलायं अर्जुनने," असं आजी अर्जुनने आणलेल्या त्या बाहुलीकडे बघतं बोलली. "आजी आजपर्यंत मला मिळालेलं सगळ्यात सुंदर प्रेझेंट आहे ना हे.?" असं आजीकडे बघतं स्वराली बोलली. आजीनंही तिच्याकडे बघतं होकारार्थी मान डोलावली. स्वरालीच्या घराबाहेर आल्यावर मैथिलीनं अर्जुनला थांबवलं, "सॉरी अर्जुन, तुला आम्ही सगळ्यांनी आज खुप त्रास दिला." असं मैथिली कान पकडतं म्हणाली, तेव्हा कुठे अर्जुनला सकाळी जे घडलं त्याची लिंक लागली, "इट्स ओ.के., मस्त शेंडी लावली मला," असं अर्जुन बोलला, मग मैथिलीनं सगळ्या मैत्रिणींशी त्याची ओळख करुन दिली. आणि मग ते आप-आपल्या घराकडे परतले.
घरी आल्यावर अर्जुन एकदम खुष होता, थोड्यावेळानं त्याचा ग्रुपही त्याच्या घरी नाटकाच्या प्रॅक्टिस साठी आला. नाटकाची प्रॅक्टिस छान सुरु होती. प्रॅक्टिस झाल्यानंतर हर्षित बोलला, "अरे आपलं नाटक २७-जानेवारीला आहे, आपण आदल्या दिवशी सगळे धरण बघायला जाऊ ना. २६ तारखेला नाहीतरी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुट्टीच आहे ना, सकाळी कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपल्या फेवरेट मिसळ स्पॉट्वर जाऊ, तिथुन मग डॅमवर." "भन्नाट आयडिया आहे यार, आपण फक्त मुलं-मुलंच जाऊ," असं सगळे बोलले. आणि नंतर परत नाटकाची प्रॅक्टिस करु लागले. प्रॅक्टिस झाल्यानंतर मग सगळे आप-आपल्या घरी परतले. सकाळ झाल्यानंतर अर्जुनने आज जिमला जाण्याचं टाळलं, आपल्या नेहमीच्या रस्त्यानं तो फिरायला निघाला. आज स्वराली आणि मैथिली त्याच्या अगोदर तिथे उभ्या होत्या. "मैथिली, आज तु जा पुढे क्लासला, मी अर्जुन बरोबर येईलं," असं स्वराली बोलली, "जो हुकुम राणीसरकार," असं म्हणतं मैथिली तिथुन निघुन गेली.

Thursday, April 12, 2012
तो आणि त्याची ती...! १.४
आपल्या घरी गेल्यागेल्या स्वरालीनं आपल्या आजीचे माघनं डोळे झाकले, "आलीस का बाहुली?" असं आजी नेहमीप्रमाणं बोलली. स्वरालीनं हलकेच आपले हात बाजुला नेले, आपल्या आजीला कडेवरच उचलुन घ्यावं असं तिला वाटलं, "आजी तुला माहिती आज मी खुप खुष आहे!" असं स्वराली आजीचे दोन्ही हात तिच्या गालांवर ठेवुन म्हणतं होती. "कोण खुश आहे आज, आईला पण कळु द्या जरा," असं स्वरालीच्या आईने तिला विचारलं. "काही नाही आजीची आणि माझी गम्मत आहे." असं स्वराली आईला चिडवत म्हणाली. स्वरालीचे आई-बाबा दोघेही सर्व्हिसला असल्याने त्यांना तिला म्हणावा तितका वेळ देता येत नसे, म्हणुन स्वरालीला आजीची खुप ओढ होती. "हे बरं नाही हं स्वरा, चिटींग करतेस तु, आईपासुन काय लपवायचं, जा मी आज ऑफिसवरुन येतांना तुझ्या आवडीचं ब्लॅक फॉरेस्ट आईसक्रिम आणलयं, मला नाही सांगणार ना, जा आजीलाच आईसक्रिम देईल तुला ठेंगा." असं तिची आई तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली.
"आई हे बघं, किती मस्त डायरी आहे ना? अर्जुनने मला प्रेझेंट केलीए." असं आईला डायरी दाखवतं स्वराली म्हणाली. "अरे वा, खुप सुंदर आहे, डायरी घेतलीस पण ती लिहिणार आहेस की नाही?" असं आईनं लाडानं आपल्या लेकीला चिडवलं. "आजी, बघं ना आई कशी करते. सारखी मला चिडवत असते, आज मी किती खुष आहे तिला माहितीच नाही, मला आज पहिल्यांदाच स्वयंपाक करायची इच्छा झाली होती माहिती आहे?" स्वरालीच्या या वाक्यानं आई आणि आजी दोन्ही आवाक झाल्या. आजपर्यंत स्वयंपाक करणं म्हणजे दिव्यं असतं असं समजणारी स्वराली चक्क स्वयंपाक करायची गोष्ट करते हे बघुन तिच्या आईला हसु आवरणं कठीण झालं, पण तिचा हिरमुड होईल म्हणुन आईनं कसंबसं हसु आवरलं, आणि आपल्या सासुबाईंकडे बघत बोलली, "बघितलंत का माई, आज सुर्य पश्चिमेकडे उगवला होता वाटतं, तुमची बाहुली मोठी झाली म्हणायची तर, चला आज स्वयंपाकघराचा ताबा सर्वस्वी स्वरालीला देऊन टाकु. मी यांना फोन करुन आजी घरी लवकर बोलवुन घेते. लेकीच्या हातचं यांना पहिल्यांदाच जेवायला मिळणार.!" "बाहुली तुला काही मदत करु का मी?" असं आजी स्वरालीला म्हणाली. "नाही आजी.." असं लाजतचं स्वराली बोलली आणि किचनकडे गेली.
आज आनंदानं घराचं कुलुप उघडुन अर्जुन घरात आला, नेहमी प्रमाणे आज त्याला रडावसं वाटलं नाही, आज आई-वडीलांच्या प्रतिमेला वंदन करतांना त्याचं मन शांत होतं. आज त्याला नेहमी वाटणार्या एकांताची चिंता नव्हती, त्यानं त्याच्याजवळ असलेला तो रेडिओ कितीतरी दिवसानंतर लावला, त्याच्यावर सुरु असलेली जुनी गाणी ऐकतांना तु सुखावला होता. स्वरालीने त्याला दिलेलं पेन त्याच्या शर्टच्या डाव्या खिशात होतं, त्यानं त्याचे दोन्ही हात त्या पेनवर ठेवले, त्याच्या चेहर्यावर हसु आलं. कितीतरी वेळ तो तसाच गाणे ऐकत बसला होता. त्यानं त्या पेनाला खुप निरखुन बघितलं, त्याचे ओठ हळुवार त्याने त्या पेनला लावले, "तुला मी कधीच माझ्यापासुन दुर होऊ देणार नाही, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला जपुन ठेवीन..!" असं तो त्या पेनाकडे बघत बोलला. "आज काही झोप येणार नाही मला, असं त्यानं आपल्या डायरीला उचलतांना म्हंटलं. तितक्यात त्याच्या घराची डोअरबेल वाजली, दार उघडुन बघतो तर काय, त्याचा ग्रुप दारात उभा. "दो दिल मिल रहें है, मगर चुपके चुपके." असं हर्षित बोलला, आणि सगळे अर्जुनच्या घरात आले.
"प्रेमकवीचा देवदास तरं झाला नाही ना?" असं अर्जुन हर्षितला बोलला, तोच त्यानंही लगेच बाकीच्या मित्रांकडे बघत बोलला, "दोस्तांनो, जीवनात मुलगी आली, की मुलं आपल्या लंगोटी मित्रालाही विसरतात असं म्हणतात ते उगीच नाही, काय बरोबर ना अर्जुन? भामट्या, डायरी घ्यायला आपण दोघे गेलो, तिथं ती दिसली, आणि भाईंच आमच्याकडे तिळमात्र लक्ष नाही, शॉपिंग करतांना जशा बायका, आपल्या नवर्यांकडे दुर्लक्ष करतात अगदी तसंच अर्जुन करत होता. शेवटी दुकानाच्या बाहेर आल्यावर मीच तिथुन कटुन जाणं पसंत केलं." रितेश अर्जुनकडे बघत बोलला, "बरं झालं अर्जुन, तुझ्याबरोबर निदान हर्षित होता, सोहम असता तर, नक्की तो कबाब मे हड्डी झाला असता? हर्षितचं तरी या जन्मात काही होणार नाही, निदान तु तरी सुरुवात केलीस..!" "बरं ते जाऊ दे, अरे आपल्या कॉलेजचं गॅदरिंग आणि डेज येतायं ना लवकरच, त्यासाठीच आम्ही आलोय. "पण पहिले काहीतरी खायला दे यार खुप भुक लागली आहे," असं नचिकेत बोलला. "काय आज गप्पा मारुन पोट भरलेलं दिसतं नाही वाटतं, थांबा मस्त कांदापोहे बनवतो, ध्रुव चल मला मदत करायला." असं बोलत अर्जुनने किचनकडे मोर्चा वळवला..
आपल्या उभ्या आयुष्यात फक्त मॅगी नुडल्स बनवता येणारी स्वराली किचनमध्ये आनंदाने शिरली खरी, पण काय बनवावं आणि कसं बनवावं हे तिला सुचेनाच. "पहिल्यांदाच स्वयंपाक बनवायचा आहे स्वराली, कम ऑन आई-बाबा आणि आजी खुष झालेच पाहिजे." असं स्वतःला धीर देतांना मनात म्हणत, स्वरालीनं वरण-भात, जोडिला हिरव्या मिर्चीचा ठेचा आणि छोट्या-छोट्या पोळ्या बनवायचं असं ठरवलं. लहानपणी आईला स्वयंपाक करतांना तिला जवळ बसवायची, म्हणुन तीला हे सगळं बनवता येईल याचा विश्वास वाटु लागला. स्वयंपाक झाल्यानंतर तीने ओट्यावरचा पसरा आवरला, आणि खुप मोठ्ठी लढाई आपण आजी जिंकली असं समाधान तिच्या चेहर्यावर होतं. "आई, झाला बरं का स्वयंपाक, बाबा आले की जेवायला बसुया, मी जाते अभ्यासाला, तु नंतर ताट तयार कर." असं स्वरालीने आईला सांगितलं. "माई, स्वरानं स्वयंपाक केलाय खरा, पण उद्या आपल्या सर्वांना दवाखान्याचा चक्कर मारावाच लागेल, मी पटकन काहीतरी करु का?" असं स्वरालीच्या आईनं विचारल्यावर सासुबाई बोलल्या, "जाऊ दे गं अश्विनी, मन मोडेल माझ्या बाहुलीचं, आणि लग्न करुन आलीस तेव्हा तुला तरी काही येत होतं का, जे होईल ते बघुन घेऊ." आता सासुबाईच असं बोलल्यावर सुनेचं काही चालतयं होयं?
थोड्या वेळानं स्वरालीचे बाबा आले, "बच्चा तुला माहिती आहे का, आज स्वयंपाक तुझ्या आश्विनीने नाही तर माझ्या बाहुलीने केलाय.!" असं आईच्या तोंडुन ऐकताच राहुल खुश झाला. स्वरालीच्या बाबांना त्यांची आई लाडानं बच्चा म्हणायची. "आशु, अगं आई काय म्हणतेय ऐकलयं का? स्वराने स्वयंपाक केलाय, अरे व्वा.! चला चला आज पहिले जेवण करुया, काय गुड न्युज दिलीस आई, इस बात पे आज नो ऑफिस वर्क, बेटा स्वरा." असं म्हणतांना स्वरालीच्या बाबा एकदम एक्साइट झाले होते. थोड्यावेळानं डायनिंग टेबलवर आईनं सर्वांसाठी जेवणाची ताटं मांडली. आपण केलेला स्वयंपाक आपल्या कुटंबाला आवडतोय का नाही हे जाणुन घेण्यासाठी स्वराली खुप उस्तुक झाली होती. "बाबा करा ना सुरुवात." असं म्हणतं तिने आपल्या बाबांना जेवायला सांगितलं. त्यांनी आनंदानं पहिला घास तोंडात टाकला, आणि ते बोलले, "बेटा, तुला माहिती आहे का, तुझ्या आईचा आणि माझा संसार इतका छान कसा आहे,?" स्वरालीनं नकारार्थी मान डोलावली. "स्वरा, अगं आम्ही दोघं कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतांना प्रेमात पडलो. मला वाटायचं ही कधीच बदलणार नाही, आणि तिला वाटायचं मी नक्कीच बदलेल, पण आमचं दोघांचं लग्न झाले, आणि दोघांचेही अंदाज चुकले, मी आहे तसाच राहिलो, आणि तुझी आई माझ्यासाठी सर्वस्वी बदलुन गेली. अगदी तिचा स्वयंपाक पण काय बरोबर ना आशु? हेच आहे ना आपल्यातल्या प्रेमाचं आणि सुखी संसाराचं रहस्य?" असं म्हणत स्वरालीचे बाबा हसायला लागले.
"स्वरा ये माझ्या बाळा, आज मी तुला माझ्या हातानं घास भरवते," असं आई बोलल्यावर स्वरालीला खुप आनंद झाला, तिला वाटलं आपण खुप चविष्ट स्वयंपाक केलाय, पण जेव्हा तिच्या आईनं तिला एक घास भरवला, "आई गं, पाणी दे पटकनं," असं ठेच्याचा घास खाल्या-खाल्या स्वरा बोलली. आपण कसा स्वयंपाक केलायं, हे तिला कळुन चुकलं. त्यामुळे ती उदास झाली. "अगं बाहुली, तुला माहिती आहे का, ज्या मुलींचा पहिल्यांदा सगळा स्वयंपाक चुकतो ना, नंतर त्याच मुली स्वयंपाकात एकदम सुगरण बनुन जातात, तुझ्या आईचंच नाही तर आजीची पण अशीच गम्मत व्हायची बरं का." असं आजी बोलल्यावर तिला बरं वाटलं. "आजी माझी बारावीची परिक्षा झाली की सुट्ट्यांमध्ये मी नक्की कुकिंग शिकेलच बघं तु." असं स्वरालीच्या तोंडुन ऐकल्यावर तिच्या आई-बाबांनाच नाही तर आजीलाही आनंद झाला. नंतर मग आईनं आणलेलं आईसक्रिमच त्यांचा त्या रात्रीच्या जेवणाचा मेन्यु ठरली.
"आयला, अर्जुनची बायकोचं नशीब एकदम जबरदस्त राहिल यार, तिला कसलंच टेंशन घ्यायची गरजं पडणार नाही, अगदी स्वयंपाकाचं पण नाही. लग्न झालेल्या कितीतरी गृहिणींना जमणार नाही असे पोहे बनवलेस तु, हॉटेलिंगचा बिझनेस कर तु खरंच." असं हर्षित बोलला, आणि बाकीच्यांनी त्याच्या समर्थनार्थ माना डोलावल्या. कांदापोहे खाऊन झाल्यानंतर नचिकेत बोलला, "बोला कॉलेजचे एकुलते एक कवीराज, यंदा कोणतं नाटक लिहिलयं गॅदरिंगसाठी?" त्यावर हर्षित लाजतच बोलला, "नाटकाचं नाव ऐकल्यावर हसायचं नाही, ’तिच्या साठी वाट्टेल ते’ हे मी लिहिलेलं नाटक आपण यंदा करुया." अपेक्षेप्रमाणे मग सगळे जण मोठ-मोठ्यानं हसायला लागले, "प्रेमकवी खरचं सिरियस झालायं भाय लोग्स, यावर्षी खरचं याचा प्रेमाचा बार उडणारच म्हणायचं तर!" असं सोहम बोलला. "मला माहिती होतं, तुम्ही नेहमी माझी उडवतात, तुम्हाला सगळ्यांना तुमच्यावर प्रेम करणारी मिळालीए, मी आणि अर्जुनच आतापर्यंत एकाच माळेचे मणी होतो, पण तोही तुमच्याच माळेत येतोयं असं वाटतयं."
"अरे, प्रेम ना कधी यानं कुणावर केलं होतं, ना कुणी याच्यावर केलं होतं, तरी प्रेमावर नाटकं लिहिणं हा याच्याकडुन घडलेला जोकच आहे, पण याचं यंदाच नाटक पाहुन कुणीतरी याच्या प्रेमात पडेल, असा दुग्धशर्करा योग नक्कीच यंदा आहे, असं मला वाटतयं, हर्ष्या तु सांग तुझी नाटकाची स्क्रिप्ट." असं अर्जुन बोलल्यावर हर्षितला नवा जोश आला आणि तो नाटकाची थिम सांगु लागला. "अरे यंदा आपण नाटकात एका सामान्य मुलगा दाखवुया माझ्यासारखा, ज्याचं तिच्यावर खुप प्रेम असतं, पण तीला कसं सांगावं हेच त्याला उमजत नसतं. मग त्याचे मित्र त्याला एक-एक फंडे सांगतात, पण त्याला एकही पटत नसतो, मग आपण असा काहीतरी सिन दाखवुया ज्यात त्याच्या कडुन तिला कळेल, ’फिल माय लव्ह.’ आणि ती पण त्याला होकार देईल."
"हे प्लॉप शो होईल यार, सगळं आधीपासुन ठरलेलं आहे असंच वाटेल. काहीतरी वेगळं पाहिजे, प्यार तो होना चाईना, पर इनकार का तडका लगना मंगतायच बॉस.! नाटकात एकदा विलन तर पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय मज्जा येणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा, नाटक आपलं आहे, जर का मुलींना जास्त रोल दिला तर बघं. खुप नाटकं असतात त्यांची, आयला आपल्या नाटकासाठी आपण जीवतोडुन काम करायचं आणि मुलींनी आयतचं क्रेडिट घ्यायचं हे पटतं नाही. पण मुलींशिवाय नाटकाला मजा नाही हे पण तितकचं खरं म्हणुन थोडासा रोल दे." असं सोहम बोलला. "विलनची आयडिया मस्तच आहे, आणि हर्षित सोडुन दुसरा कोणी विलन शोभेल असं मला वाटतं नाही. याची तब्येत तर बघं, हा नुसता ओरडला तरी चार माणसं घाबरुन पळुन जातील, पण भाई कविता करतात, नाटक लिहितात असं सांगितलं तर खुद्द त्याच्या घरच्यांना विश्वास बसत नाही. प्रत्येक जण चांगला कलाकार नसतो, पण चांगला कलाकार समाजाच्या कुठल्याही स्तरातुन येऊ शकतो, हे याच्याकडे बघुन म्हणावसं वाटतं." असं म्हणतं शार्दुलनं सोहमच्या म्हणन्याला दुजोरा दिला. "अरे असं नका करु रे, यंदा मला हिरोच काम करायचं ना." हर्षित केविलवाण्या स्वरात बोलला.
"वेडा झालायं का रे तु? नाटकाची संकल्पना तुझीच, पटकथा तुच लिहिणार, नाटकाला लागणारा खर्च तुझा म्हणजे निर्माताही तुच, आमच्यासारख्यांकडुन रात्री तीन-तीन वाजेपर्यंत प्रॅक्टिस करवुन घेतो म्हणजे दिग्दर्शकही तुच, आवाज भारदस्त म्हणुन नेपथ्यही तुच करतो, आणि आता हिरोही तुलाच बनायचं असं म्हंटल्यावर सगळे हसतील ना हर्षित.?" असं रितेशने हर्षितला समजावलं. "अरे आपले किती तरी पिक्चर हिरो इतके़च विलनमुळे हिट झालेत माहिती आहे ना यार, म्हणुन हिरो म्हणुन एक तर अर्जुनला घे नाहीतर सोहमला, कारण अर्जुन ऍक्टिंग चांगली करतोच, पण आपल्यातला कुणी डायलॉग विसरला तरी तो संभाळुन घेतो, नाहीतर सोहमला हिरो बनवं, आपला चिकना सोहम नाटकाचा हिरो आहे असं कळल्यावर कॉलेजमधल्या मुली काय दंगा करतील, नेहमीप्रमाणे त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्या मुलींकडुन जास्त येणारच बघं.!" असं नचिकेत बोलल्यावर हर्षित विलन बनायला तयार झाला. "अरे सोहमला हिरो बनवायला काही प्रोब्लेम नाही, पण त्याला एक सांगा की फक्त नाटकाच्या हिरोईनवरच लक्ष द्यायचं, नाहीतरं हा एकीलाही सोडतं नाही. देवानं याला फक्त मुली पटवण्यासाठीच जन्म दिलायं असं वाटतं. म्हणुन अर्जुनच हिरोसाठी परफेक्ट आहे." असं शार्दुलनं आपलं मत मांडलं.
"अरे मी बनेल हिरो, पण आपण नाटकाची स्क्रिप्टच थोडी चेंज करुया, नाटकाच्या शेवटी हिरोईन हिरोच्या नाही तर विलनच्या प्रेमात पडते असं दाखवुया, एकदम मजा येईल. म्हणजे मी पण हिरो राहिल, हर्षित तुमच्या मताप्रमाणे विलन, आणि शेवटी हिरोईन भेटल्यामुळे हर्षितही खुष.!" अर्जुनच्या या युक्तीवादावर सगळ्यांच एकमत झालं. "चला मी आता स्क्रिप्ट लिहायला बसतो, तोपर्यंत तुम्हाला काही सुचतयं का ते बघा." असं हर्षित बोलला आणि त्यानं नाटक लिहायला सुरुवात केली. "मला लव्हगुरुचा रोल दे बरं का, आणि हो विथ सिडक्टिव्ह फिमेल असिस्टंट" असं सोहमं हसत बोलला. इकडे बाकीचे जण मस्ती करत होते, अर्जुन मग डायरी लिहिण्यासाठी आतल्या खोलीत जाऊन बसला. त्यानं त्या डायरीवरुन एकदा हात फिरवला, त्या डायरीवर त्यानं नावं टाकलं, "तुझ्या एकांतात सदैव मी.!" आणि मग डायरी लिहायला त्यानं सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना..!
१४-एप्रिल म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, ज्यांच्या जन्मामुळे या देशातली कोटी कुळे उद्धरली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी मनात लपवलेले काही शब्द..!
कुठे गेलातं तुम्ही बाबासाहेब...?
बघा आम्ही मुलं अजुन,
तुमची वाट बघतोय...
तुमच्या विचारांबरोबरच,
जीवनाला एक दिशा मागतोय..
कंटाळलात का तुम्ही या जगाला?
वैतागलात का आम्हा चाहत्यांना?
शब्द टाकला असतात तरी तयार होतो
आम्ही यमाशी लढायला..
अवघे अवकाश पुरणार नाही,
आमचे अश्रु सामावुन घ्यायला..!
तो सुर्य ही बिचकेल त्या अश्रुंपुढे,
पुन्हा एकदा उजळायला....!
तुम्ही आता निद्राधीन झालात,
सोडलतं या जगात फक्त आम्हा एकटयांना..
पण..जीवनही बाबासाहेब म्हणतयं
नि हाक मारतयं तुमच्या विचारांना...!
मी नेहमीच म्हणत असतो...
तुमच्या सारखा माणुस पुन्हा कधी होणार नाही...!
बाबासाहेब म्हणुन पुन्हा या जगात येतायं ना..?
विचारायचं कारण सांगायचं तर...
भेटला नाहीत तुम्ही जातांना....!

तो आणि त्याची ती...!१.३
कॉलेजचं गेट ओलांडताच, अर्जुन त्याचा ग्रुप नेहमी असायचा त्या जागेकडे जाऊ लागला. "हाय अर्जुन, हॅपी न्यु इयर.!" असा पाठीमागुन तेजाली आणि शामलीनं त्याला आवाज दिला. "सेम टु यु, हे पण आपण मराठी आहोत, मराठी संस्कृती जपायलाच हवी ना, नववर्षाच्या खर्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच द्यायला हव्यात." असं अर्जुन बोलला, आणि ते तिघही चालु लागले. "हाताला काय झालं रे तुझ्या? काल रात्री पार्टी बरीच एन्जॉय केलीए वाटतं?" असं तेजाली अर्जुनच्या हाताकडे बघुन बोलली. अर्जुन नुसता हसला, आणि त्यानं तिला उत्तर देण्याचं टाळलं. तितक्यात समोर उभ्या असलेल्या रितेशने अर्जुनला आवाज दिला, "काय बॉस, हात बरा आहे का? अरे एक गुड न्युज आहे ना यार, आपल्याला आज प्रॅक्टीकला ऑफ आहे. आपल्या प्रोफेसर लोकांनी काल जंगी पार्टी केलीए वाटतयं, चक्क ४-जण आज रजेवर, वर्षाची सुरुवात अशी ऑफ मिळुन झाली, देवा वर्षभर अशीच कृपा ठेव आमच्यावर.!" रितेशचं बोलणं तेजालीला कदाचित पटलं नव्हतं असं तिचा चेहरा सांगत होता, रितेश आणि तेजाली यांची जोडी म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या शिवाय करमेना अशीच होती. तेजाली रितेशला काहीतरी उपदेश करणारच होती, तितक्यात बाकीचा सगळा ग्रुप आला होता..
"क्या भाई लोग्स, नव्या वर्षाचा कोणाचा काही संकल्प?" असं सोहम आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बोलला. "काही नाही यार, कॉलेजची शेवटची दिड वर्ष राहिली त्यात काहीतरी करुन दाखवील म्हणतो." हर्षित असं बोलल्यावर सगळ्यांना हसु आलं, "काय हर्षित, कुछ कुछ होने लगा है?" असं मिताली बोलली. "अगं त्याला कुछ-कुछ नाही खुप काही होतं, पण यानं ते एक्सप्रेस करायला शिकावं की नाही? निदान माझा तरी आदर्श ठेवला असता डोळ्यांसमोर..!" असं शार्दुल बोलला. "हो का महाशय, अकरावी पासुन तुम्ही प्रयत्न करत होता, पण शेवटी काय मलाच प्रपोझ करावं लागलं, आणि म्हणताय माझा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायच," असं अंजली शार्दुलला बोलली. "खरं सांगु का मित्रांनो, मला असं काही करायची प्रचंड भिती वाटते रे..!" असं हर्षित बोलल्यावर सगळ्यांना हसायला आलं. "सोडा रे कोणत्या दगडावर डोकं आपटतोय आपण, याला किती वेळा सांगितलं, वेड्या प्रेम-वैगेरे असं काही नसतं, मनाचे पोरखेळ असतात ते, अंधश्रद्धा असतात असल्या गोष्टी, पण आमच्या वेड्या प्रेमकवीला काय त्याचं?" सोहम असं बोलला, त्यामुळे हर्षितचं मन जरा खट्टु झालं होतं.
"सहा-सहा मुलींबरोबर अफेअर्स असणार्याला काय कळणार प्रेम कायं असतं?" असं इतक्यावेळ शांत असलेला अर्जुन जेव्हा बोलला, "ओह्ह्ह्ह्ह्ह" असं सगळा ग्रुप एकसुरात ओरडला, "प्रेमाबद्दल आज चक्क अर्जुन बोलतोय? देवा कृपा केलीस रे कॉलेज मधल्या किती मुलींवर." असं तेजाली बोलली, तितक्यात कॉलेजची बेल झाली. "कॉ-ओर्डिनेटर आज कोणतं प्रॅक्टीकल करायचं?" असं अर्जुन हर्षितला बोलला. "काही नाही आज लॅब मध्ये "एस.टी.डी. खेळुया इतकचं काम." बाकीचे सगळे एकासुरात बोलले. "हाय मामा, हॅपी न्यु इयर, काल मजा केली की नाही हं? असं सोहमने लॅबच्या बाहेर उभ्या असलेल्या लॅब असिस्टंटला विचारलं. "काय नाही रे मुलांनो, आम्हाला काय आला दिवस तो पांडुरंगाच्या कृपेनं सारखाच." असं लॅब असिस्टंट म्हणाला. "मामा आज काही सर नाहीत, त्यामुळे आम्ही लॅब मध्ये आमचं आमचं काम करतो, तुम्हाला काही डिस्टर्ब करत नाही, तुम्ही बसा तुमची मुंबई-चौफेर मधली कोडी सोडवतं. फक्त डॉन (प्रिंसिपल) राऊंडला येतांना दिसले की आम्हाला आवाज द्या" अशी नचिकेतनं विनंती केली. अर्जुन, रितेश, हर्षित, सोहम, नचिकेत, ध्रुव, तेजाली, मिताली, अंजली, शामली हे सगळे एकाच बॅच मध्ये होते. फक्त चैताली, आणि शार्दुल दुसर्या बॅच मध्ये होते.
लॅब मधले सगळे जण आप-आपले स्टुल एकत्र करुन एका टेवलाजवळ जमले, आणि आपाआपली पुस्तकं जवळचं ठेवली. प्रशांतने त्याच्या जवळ असलेली पाण्याची बाटली फिरवली, आणि पहिल्याच वेळी ती बाटली सोहमजवळ येऊन थांबली, सोहमला स्टेअर करायला लावलं, आणि मग सोहम आणि वृषाली दोघंही समोरा-समोर बसले, वृषाली लगेच हरुन जाईल असं सगळ्यांना वाटलं मात्र जवळपास तीन मिनिटे तीने सोहमला नजरेनं चांगलीच टक्कर दिली, पण शेवटी सोहमच जिंकला. या खेळात तो चॅंम्प होता. आता सोहमने बाटली फिरवली, आणि हर्षितसमोर त्या बाटलीचं तोंड आलं, "मला माहिती आहे, तुम्ही मला काय करायला लावणार ते, पण मी तुम्हाला मी माझी केलेली नवकविता- ’मॅडम आमची जरा न्यारी’ ऐकवतो, प्लीझ दोस्तांनो," असं हर्षित बोलला, आणि कुणी काही म्हणायच्या आतचं त्यानं ती कविता म्हणायला सुरुवात केली. सगळी बॅच पोट धरुन हसायला लागली होती. "कार्टुन आहेस यार तु, कशावरपण कविता करायची का?" असंच प्रत्येकजण त्याला म्हणत होता. सुमारे दोन तास एस.टी.डी. गेम चालु होता, बॅचंमधील जवळ-जवळ सर्वांवर काहीतरी टास्क करायची वेळ आली होती, पण सुदैवाने अर्जुनचा नंबर काही केल्या आलाच नव्हता.
"अरे ती बाटली फिरवणं थांबावा, अर्जुन सोडुन सगळ्यांचा एकतरी चान्स झाला, आता अर्जुनलाच टास्क करु देऊ, काय म्हणताय तुम्ही?" असं शौर्य बोलला, "अरे अर्जुन साठी ओन्ली ट्रुथच, नो स्टेअरिंग-नो डेअरिंग." असं बॅच मधल्या सगळ्या मुलींनी सुचवलं, उरलेल्या सगळ्यांच त्यावर एकमत झालं, पण त्याला ट्रुथसाठी कोणी प्रश्न विचारायचा यावर मग मुला-मुलींमध्ये काही एकमत होईना. शेवटी रितेशच बोलला, "अर्जुनला आपण प्रेमावरचं प्रश्न विचारु ना, सकाळीच तो सोहमला म्हंटला नव्हता का, सहा-सहा मुलींबरोबर अफेअर्स असणार्याला काय कळणार प्रेम कायं असतं?" "एक नंबर, कधी तरी मेंदु वापरला असं म्हणायला हरकत नाही तरं." तेजाली गरज नसतांना रितेशला शेरा देऊन मोकळी झाली. रितेश काही तिला प्रतिउत्तर देईल तेवढ्यात "अरे मुलांनो, प्रिंसिपल येताय बरं का, असं लॅब असिस्टंटने आरोळी दिली, आणि सगळ्या बॅचचा हिरमुड झाला. सुटलो बाबा एकदाचं, असाच भाव जणु अर्जुनच्या चेहर्यावर होता.
कॉलेज संपल्यानंतर, अर्जुन आणि हर्षित दोघंही डायरी घेण्यासाठी निघाले, या नव्या वर्षापासुन हर्षितनेही अर्जुनप्रमाणेच डायरी लिहिण्याचं ठरवलं होतं. ते दोघं ज्या दुकानात डायरी घेण्यासाठी शिरले, योगायोगाने स्वरालीसुद्धा त्याच दुकानात होती आणि तीसुद्धा डायरी बघत होती. स्वरालीला रोज चित्रं काढायची सवय होती, आणि ते चित्र काढत असतांना तिला काय वाटायचं ते ती डायरीत लिहित असे. स्वरालीला बघुन अर्जुनला आश्चर्याचा जणु सुखद धक्काच बसला. "आजी साठी डायरी खरेदी करतेस का?" असं अर्जुनने तिला मुद्दाम विचारलं, किती दिवसांनंतर त्याला तिच्याशी स्वतःहुन बोलावसं वाटलं होतं. ओळखीचा आवाज ऐकताच स्वरालीनं माघे वळुन बघितलं, अर्जुन तिच्यापाठीमागे होता आणि त्यानं तिला आवाज दिला हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला खुप आनंद झाला, कळी उमलतांना झाडाला जितका आनंद होत असेल अगदी तसाच आनंद तिला झाला. "आजी साठी नाही रे, माझ्यासाठीच खरेदी करते आहे, तु पण डायरी खरेदी करायला आलास का?" असं स्वरालीनं उत्तर दिलं "हो, यंदाची ही ११वी डायरी, गेले दहा वर्ष झाले डायरी लिहितो मी, अरे बोलता बोलता तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचं विसरलोच बघं," अर्जुनचा आणि स्वरालीचा मग संवाद सुरु झाला, हर्षित बिचारा दोघांकडे बघत बसला, दहा मिनिटांनंतर अर्जुनच्या लक्षात आलं की आपल्याबरोबर हर्षितपण आहे, त्याने हर्षितकडे बघितलं, आणि तीन डायर्या उचलल्या, एक त्यानं स्वरालीला दिली, एक हर्षितला आणि एक स्वतःसाठी.
"ही डायरी घे स्वराली, माझ्याकडुन तुला नवीन वर्षाचं प्रेझेंट, नाही म्हणु नकोस असं म्हणुन त्यानं ती डायरी स्वरालीच्या हातात दिली. "थॅंक यु अर्जुन, मी तु दिलेली डायरी घेईल, पण एका अटीवरचं, थांब एक मिनिट," असं स्वराली बोलली आणि तिनं त्याच्या साठी एक छान पेन घेतला. "तुझी यंदाची डायरी ह्या पेनने लिहावीस अशी माझी इच्छा" असं म्हणत तिने तो पेन त्याला दिला. आणि ते तिघेही दुकानाबाहेर पडले. दुकानाबाहेर पडताच हर्षित बोलला, "अरे अर्जुन, मला नचिकेतकडे जायचं आहे रे, मी येतो रात्री तुझ्या घरी, चल बाय." आणि लगेच हर्षित तिथुन चालायला लागला. "तु घरीच जातोयं ना?" असं स्वरालीने अर्जुनला विचारलं. "होय, आणि तु?" असं त्यानं तिला विचारलं, तीनं मानेनंच होकार दिला आणि हसतचं मग दोघं घराच्या दिशेने चालु लागले.
मावळतीच्या सुर्यांच्या लालीनं आसमंतावर जणु गालीचा पसरवला होता, घरट्याकडे परतणार्या पक्ष्यांची किलबील, सायंकाळी सुटलेला गारवा, दुरच्या मंदिरातुन येणार्या घंटांचा नाद, शाळा सुटल्यावर घराकडे मस्ती करत जाणार्या छोट्या-छोट्या मुलांची गंमत बघत कितीतरी वर्षांनंतर आज अर्जुन आणि स्वराली दोघंही एकत्रपणे चालले होते. हा रस्ता कधी संपु नये, एकमेकांना काय-काय सांगु असं त्यांना बोलता-बोलता वाटत होतं, म्हणुन जणु आज नेहमीच्या रस्त्यानं घराकडे न जाता जरा लांबच्या रस्त्यानंच जावं, असं त्यांच्या मनानं ठरवलं, अन सहाजिकच पाऊलही तशीच पडतं गेली. आपण लहानपणी इतके चांगले मित्र होतो, पण नंतर आपल्याबाबतीत असं का घडलं याची खंत त्या दोघांनाही वाटत होती. घर जवळ येत असल्याचं कळताच स्वरालीचं बोलण मध्येच थांबवुन अर्जुन बोलला, "आजचा दिवस खरचं किती छान होता नाही? दरवर्षी करतो त्यापेक्षा वेगळाच संकल्प मी यंदा करायचा ठरवलायं." स्वरालीने त्याच्याकडे बघितलं, आणि लाजतचं विचारलं, "वेगळा संकल्प म्हणजे?" "कळेलच की तुला थोड्या दिवसांत, तुझ्यापासुन काही लपलयं का?" असं अर्जुनने तिला उत्तर दिलं. "अर्जुन खुप काही लपवलयं तु, किती दिवसांनंतर छे, किती वर्षांनंतर आपण इतका वेळ इकमेकांबरोबर घालवलायं..! निदान यावर्षी तरी आपल्या दोघांनाही एकमेकांसाठी वेळ देता येईल हाच संकल्प कर म्हणजे झालं, चल बाय.!" असं म्हणतचं स्वराली घराकडे पळत गेली. तिच्या त्या पाठमोर्या आकृतीकडे अर्जुन बघतच राहिला. आज एक विलक्षण समाधान दोघांनाही लाभलं याचा आनंद त्या दोघांच्याही चेहर्यावरुन ओसांडत होता.
Wednesday, April 11, 2012
तो आणि त्याची ती..!१.२
स्वराली, एक बिंधास्त, मदमस्त अशी मुलगी होती. तिच्या वयाच्या मुलींपेक्षा ती चारचौघीत अधिक सौंदर्यवती दिसायची. दोन्ही गालांवर पडल्या जाणार्या खळ्यांमुळे तिचं सौंदर्य अधिक खुलायचं. स्वभावानंही स्वराली एकदम गोड मुलगी होती. एकदम निरागस, निस्वार्थ, निष्पाप लहान अजाण बालकासारखीच. लहानपणापासुन स्वराली एकदम लाडात वाढली होती, पण तरी हट्टीपणाचा लवलेश तिच्यात नव्हता. लहानपणी फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तिच्या आजीनं तिला परी सारखं तयार केलं होतं, "आजी मी मोठी झाल्यावर अशीच सुंदर दिसेल का गं?" असं वयाच्या पाचव्या वर्षी विचारणारी स्वराली आजही जणु आरशासमोर असली की जणु हाच प्रश्न विचारत असावी. तिला स्वतःच्या प्रतिमे कडे बघुन लटकेच लाजण्यास आवडायचं. अभ्यासात ती हुशार होती, पण तिला मोठेपणी चांगलं चित्रकार बनायचं होतं. तिनं काढलेली निसर्गचित्रे दरवेळी शाळेत चर्चेचा विषय असायची. आई-वडीलांचं एकलुतं एक ते कन्यारत्न त्यामुळे त्यांनी कधी तिचं मन मोडलं नव्हतं, अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं होतं. आजीसाठी ती तर एक संजीवनीच होती, आपल्या लेकापेक्षा त्यांचा नातीत जास्त जीव होता. जणु जुन्या झाडाला नवी पालवी फुटावी अगदी तसंच स्वराली आणि तीच्या आजीचं नातं होतं.
अशी ही स्वराली अर्जुन पेक्षा चार वर्षांनी लहान होती. ते दोघं एकमेकांचे शेजारी होते. अर्जुन आणि स्वरालीच्या कुटुंबाचा एकदम घरोबा होता. लहानपणी भातुकलीचा खेळ खेळतांना त्या दोघांना नेहमी राजा-राणी केलं जायचं. लहानपणी अर्जुन आणि स्वराली एकदम जीवलग मित्र होते, पण जेव्हा अर्जुनच्या आई-वडीलांच अपघाती निधन झालं, त्यानंतर अर्जुन जणु एकदम बदलला. बारा वर्षाच्या त्या कोवळ्या वयात त्याच्या मनाला मोठ्या माणसांसारखं विलक्षण समजुतदारपण, शहाणपण लाभुन गेलं. जे वय खेळण्या-बागडण्याचं होतं, त्या वयात आता अर्जुन दुसराच विचार करत असे. आपलं सगळं लक्ष त्यानं अभ्यासावर एकवटलं होतं. अर्जुनमधला हा अचानक झालेला बदल आठ वर्षाच्या छोट्या स्वरालीला कळायचा नाही, शाळेतुन घरी आल्यावर खेळतांना आता तीचं मन रमायाचं नाही, अर्जुन नेहमी तिला आजीच्या गोष्टीतला राजकुमार वाटायचा. "आजी हा अर्जुन असा कसा वागतो गं, एकदम बाबांसारखा? हल्ली खेळायला येतचं नाही, नुस्ता त्याच्या घरात बसुन अभ्यास करत बसतो. तो असा का गं करतो?" असा प्रश्न स्वरालीनं आजीला केला की आजी क्षणभर निरुत्तरीत व्हायची, आजीच्या डोळ्यात मग पाणी दाटुन यायचं, छोट्या स्वरालीला मग ती मांडीवर थापटवुन झोपवतांना म्हणायची, "माझी बाहुली तु अजुन लहान आहेस, तु थोडी मोठी झाली की कळेल..!" "आजी मी मोठी केव्हा होणार गं?" असा प्रश्न विचारतच मग स्वराली झोपी जायची.
"मैथिली, अर्जुन जवळ आल्यावर मुद्दाम तु स्कुटी स्लो करुन हॉर्न का वाजवलासं?" असं नाराजीच्या सुरातच स्वरालीनं स्कुटी चालवत असलेल्या मैथिलीला विचारलं, तिनं लगेच स्कुटी थांबवली, स्वराली कडे बघुन हसतचं म्हणाली, "चोराच्या मनात चांदणं म्हणतात ते उगीच नाही बरं, अग सकाळी सकाळी माझ्यामुळे तुला अर्जुनच दर्शन घडलं अन तु मला बोलतेस मी हॉर्न का वाजवलास, अग स्वराली, तुझं काही ऑब्जेक्शन नसेल तर तुला एक सांगते, मी अर्जुन साठी एका पायावर काहीही करायला तयार आहे. तु तुझा डिसिजन घेऊन टाक एकदाचा..!" स्वराली मैथिलीकडे बघतं बोलली, "हल्ली तुझा चावटपणा वाढत चाललायं बरं का मैथिली, कशी म्हणतेस काही ऑब्जेक्शन आहे का. क्लासला जायला उशीर होतोय, चल पटकन..!" मैथिलीने पुन्हा मग स्कुटी चालवु लागली, "खरचं मैथिली बोलली ते किती सत्य आहे ना? नव्या वर्षाची सुरुवात, आणि आज सकाळीच अर्जुनच्या चेहर्यावरचं हास्य, बरं झालं तिनं हॉर्न वाजवला ते. नाहीतरं अभ्यासाच्या नादात खरचं आज अर्जुनचं हसणं मिस झालं असतं. तो दिसला की दिवस किती छान जातो माझा, ज्या दिवशी तो दिसत नाही त्या दिवशी खरचं कशातचं चित्त लागतं नाही, पण असा विचार का करते मी, जाऊ दे ना स्वराली पण आज खरचं छान वाटलं..! थॅंक्स मैथिली." असं स्वराली मनात स्वगत बोलतं होती. तितक्यात क्लासची इमारत आली, "अहो स्वराली मॅडम, स्कुटी पार्क करायची आहे, क्लास आला उतरा आता." असं मैथिलीनं म्हंटल्यावर स्वराली भानावर आली, नेहमीच्या सवयीप्रमाणे तिनं स्कुटीच्या आरशात बघितलं, आज ती खरचं खुप सुंदर दिसत होती, आरशातल्या तिच्या त्या प्रतिबिंबाला अर्जुन मागुन बघतोय असाच तिला भास झाला, तिच्या गालावर छान हसु आलं, दोन्ही गालांवरच्या खळ्या त्यामुळे अधिकच खुलल्या, "हॅपी न्यु इयर अर्जुन" असं ती बोलली, "काय गं आरशात कुणाला हॅपी न्यु इयर करतेस, अर्जुनला हो ना?" असं म्हणतं मैथिली तिला चिडवु लागली. "थांब मैथिली बघतेच तुला" असं स्वराली मैथिलीला बोलली, "प्रेमात पडलयं म्हणायचं कुणीतरी, मज्जा आहे बुवा एका मुलीची आज, नाहीतरं आमचं नशीब.!" असं म्हणत मैथिली घाई-घाईनं क्लासमध्ये शिरली. तिच्या माघुन स्वराली पण आली, पण आज ती समोरचा बेंच सोडुन खिडकीशेजारी बसली होती.
क्लासमध्ये बायोलॉजीचं लेक्चर सुरु झालं, सर सेंट्रल नर्व्हस सिस्टीम या टॉपिकची रिव्हिजन घेऊ लागले, आज मात्र स्वरालीचं लक्ष सरांच्या शिकवण्याकडे मुळीच नव्हतं, ती वहीत चित्र काढायला लागली, नदीचे दोन काठ तीनं काढले, त्या काठांच्या मध्ये वाहणारं पाणी रेखाटत असतांना, तितक्यात तीला त्या चित्रात काहीतरी चुक होतेयं असं जाणवलं. "किती वेडी आहेस स्वराली तु, अगं नदीचे काठ एकमेकांच्या बरोबर तर असतात, पण ते कधी एकमेकांना मिळतंच नाहीत ना, माझ्या बाबतीतही असंच झालं तर?" असं मनातच म्हणत स्वराली घाई-घाईनं ते चित्र खोडु लागली, तितक्यात सरांची नजर तिच्याकडे गेली, "स्वराली स्टॅंड अप, एक्सप्लेन दि पार्ट्स ऑफ सी.एन.एस." सरांच्या त्या प्रश्नानं स्वराली एकदम दचकली, घाई-घाईनं ती उत्तर द्यायला उभी राहिली, पण तिला प्रश्न काय होता ते माहितीच नव्हतं, "सॉरी सर" म्हणतं ती सरांकडे खाली मान घालुन बघु लागली. "व्हॉट सॉरी, अग बारावीचं वर्ष आहे हे तरी ठाऊक आहे ना, सकाळी-सकाळी झोपली होतीस का लेक्चरला? अग इतका महत्वाचा टॉपिक शिकवतोय, आणि तुझं लक्षचं नाही, आणि नेहमी पुढे बसतेसना तु, आज एकदम शेवटच्या खिडकी जवळच्या बेंच वर का बसली? सकाळी सकाळी लेक्चरला झोप लागत असेल तर खाली जाऊन तोंडावर पाणी मारुन ये, जा पटकन." सरांनी असं म्हणताचं क्लासमधली मुलं हसायला लागली, स्वरालीला एकदम अवघडल्यासारखं झालं होतं, "एक्स क्युज मी सर, तिच्या आजीची तब्येत सध्या बरी नसते म्हणुन हल्ली स्वरालीला तिची खुप काळजी वाटते, म्हणुन कदाचित.." असं पहिल्या बेंचवर बसलेल्या मैथिलीने सरांना सांगितलं. "अगं मग पहिले सांगायचं नाहीस का, ओ के, सिट डाऊन" असं सरांनी स्वरालीला सांगितलं आणि ते फळ्यावर आकृती काढायला वळले, तितक्यात मैथिली माघे बसलेल्या स्वरालीकडे बघुन हसली, "थॅंक्स." असं हळुचं म्हणत मग स्वरालीनं सरांच्या शिकवण्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
क्लास संपल्यावर घराकडे जातांना, मैथिली बोलली, "काय गं कसला विचार करत होतीस? अर्जुनचाच ना?" मैथिलीच्या या प्रश्नाला स्वरालीनं उत्तर देण्याचं टाळलं. घर जवळ आल्यावर स्वराली उतरली, पहिल्यांदा तिची नजर अर्जुनच्या घराकडे गेली, त्याच्या घराला कुलुप नव्हतं, हे दिसताच स्वराली घाई-घाईनं जिना चढत आपल्या घरात आली, लगेच तिनं आपल्या खोलीची खिडकी उघडली आणि सकाळी जे घडलं त्याचा विचार तिचं कोवळं मन करु लागलं. "आली का माझी बाहुली क्लास वरुन?" अशी मायेची हाक मारत आजी स्वरालीच्या खोलीत आली, "आजी, हॅपी न्यु इयर," असं म्हणत मग स्वरालीनं आजीचा आशिर्वाद घेतला. आपल्या लाडक्या नातीला आशिर्वाद देऊन आजी तिच्या पलंगावर बसली, पलंगावरची बाहुली बाजुला करुन स्वरालीनं आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं, "आजी तु मला लहानपणी सांगायची ती राजकुमाराची गोष्ट सांग ना आत्ता?" असं स्वराली लहान मुलींप्रमाणं बोलली. आजीला हसु आलं आणि हसतचं ती बोलली, "आमची बाहुली आता मोठी झाली ना, तरी आजीची गोष्ट ऐकायची आणि ती पण राजकुमाराची?" "आजी मी तुझी बाहुली आहे ना, बाहुली नेहमी जशी असते तशीच राहते, छोटुशी, गोंडुली, तिला नाही गं अजुन मोठं व्हायचं, तिला आजीसाठी असंच राहयचं" स्वराली असं बोलली, आणि आजीनं तिच्या डोक्यावर हात फिरवत गोष्ट सांगायला सुरुवात केली.
"आजचा दिवस खरचं किती वेगळाच आहे, पहाटे स्वप्नात अचानक स्वराली कशी काय आली, आणि सकाळी जिमवरुन परतांना सुद्धा ती दिसली," असं म्हणतांना अर्जुन सुखावला होता, "अर्जुनसाहेब, कॉलेजला जायला उशीर होईल, चला तयारी करा पटकन", असं स्वतःलाच म्हणत अर्जुन कॉलेजला जायची तयारी करु लागला. घराबाहेर पडतांना आज त्याच्या चेहर्यावर विलक्षण समाधान जाणवत होतं. समोरच्या कुंडीतल्या लाल गुलाबाकडे त्याची नजर गेली, त्याच्या कडे बघुन तो पुन्हा हसला, एका क्षणासाठी त्यानं डोळे मिटले, आणि मग त्याने कॉलेजकडे प्रस्थान केलं. रस्त्यानं चालतांना आज त्याला घडी-घडी मागे वळुन बघावसं वाटतं होतं. रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्तीवरची छोटी-छोटी सात-आठ मुलं-मुली पकडा-पकडी खेळतं होती. एक छोटी मुलगी, तिच्या पेक्षा थोड्याशा मोठा वाटण्यार्या मुलाला पकडायचा प्रयत्न करत होती, "हे..हे..मी आऊटच नाही व्हणार..!" असं म्हणणार्या त्या मुलाकडे बघुन अर्जुनला हसु आलं, किती दिवसांनंतर त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवले. हळुहळु तो तिथुन जाऊ लागला, तितक्यात त्याला समोरुन येणारी मैथिली दिसली, तिचही त्याच्याकडे लक्ष गेलं. सकाळ सारखाचं हॉर्न वाजवत ती त्याच्याकडे बघुन ती हसतंच तिथुन गेली. स्वतःच्या डोक्यावर टपली मारतं मग अर्जुन पुन्हा चालु लागला.

Subscribe to:
Posts (Atom)