Saturday, March 16, 2013

"तो आणि त्याची ती..!" १.२३


                        वेदाली, स्वराली आणि अर्जुनला घेऊन त्यांच्याघराजवळ असलेली इंडियन ऍंशियंट आर्ट गॅलरी बघायला घेऊन गेली होती, तिथे अस्सल भारतीय कला संस्कृतीचं दर्शन घडतयं असं जाणवल्याशिवाय रहात नव्हतं. विविध कलाकृती, मुर्ती, चित्र, कलाकुसरीच्या विविध वस्तुंच ते अनोखं प्रदर्शन होतं, स्वरालीला चित्रांचा विभाग खुप आवडला होता, ती ते चित्रं बघण्यात गुंग होती. "हे स्वराली, हे घे तुझ्यासाठी..!" असं म्हणत अर्जुनने तिला पुर्वीच्या काळी वापरात येणारे अनोखे कुंचले व रंग तिच्यासाठी खरेदी केले, त्याला बघुन स्वराली खुप खुष झाली. "हे वेदाली, तुला सांगु का, स्वराली उत्तम चित्रकार आहे बरं का, इंटरमिजिएटच्या परिक्षेत अव्वल होती ती..!" असं अर्जुन बोलला. "व्वा, म्हणजे स्वरालीला इथे आणलं ते नक्की बरं झालं, चल स्वराली तुला मी अजुन एक छान गिफ्ट देते," असं म्हणुन वेदालीने चित्र  काढण्यासाठी पुर्वी वापरत तशी सुमारे दोन डझन कागद तिला घेऊन दिली. "थॅंक्स वेदाली, खरंच बघं ना किती कमालीची सुंदर आहेत ही सगळी पेंटिंग्स," असं स्वराली तिला बोलली, सुमारे तासभर ते प्रदर्शन बघत होते, नंतर तिथुन ते त्यांच्या घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये गेले.  गार्डनमध्ये असलेली मिनीट्रेन स्वरालीला जाम आवडली. दरम्यान ते तिघे गार्डन मध्ये गप्पा मारत बसले असतांना स्वच्छिल समोरुन आला. "सरप्राईज, सरप्राईज..! असं म्हणत त्याने आणलेली कॉटनकॅंडी स्वराली आणि वेदालीला दिली. "अरे तु इथे अचानक कसं काय आलास? असं वेदाली आश्वर्यचकित होऊन बोलली. 
         "हे अगं असं काय बोलतेस, तुच तर सांगितलं ना मला की गार्डनमध्ये ये असं, आणि तु या दोघांना घेऊन आलीस, चिंटु आणि त्याच्या गॅंगला विसरलीस का, टेंशन घेऊ नकोस मी घेऊन आलोय त्यांना, ते बघं ती तिथे गोळा खातायं..!" असं म्हणुन स्वच्छिलने जणु वेदालीवरच बाऊंसर टाकला. "स्वच्छिल, मला पण गोळा खायचा रे..!" असं स्वराली जणु लहान मुलीसारखं बोलली, आणि स्वच्छिल खुष होऊन बोलला, "अगं नुसता गोळा नको म्हणुस, जंबो गोळा खाऊ घालतो चल..!" असं म्हणुन तो त्या गोळ्यावाल्याकडे निघाला, त्याच्यामाघे स्वरालीपण निघाली तसा अर्जुनही उठला, स्वच्छिलकडे बघुन वेदाली हळुच बोलली, "स्वच्छिल म्हणजे एकदम कठीण आहे, एकादाचं शोधलंच त्याने..!" गोळा खाऊन झाल्यानंतर स्वच्छिल बोलला, "हे चला आपण एक ग्रुप फोटो काढुया, या दिवसाची आठवण म्हणुन, काय विचार आहे तुमचा?" "अरे व्वा, मस्त आयडिया आहे रे स्वच्छिल..!" असं अर्जुन त्याला बोलला. सायंकाळची वेळ असल्याने त्यागार्डन जवळ नेहमीच गर्दी असायची, त्यामुळे स्वच्छिल स्वरालीसोबत चालु लागला, आणि अनायसे अर्जुनला वेदालीची सोबत मिळाली. अर्जुन आजुबाजुची दृष्ये बघत चालु लागला, तर स्वच्छिल स्वरालीशी गप्पा मारत चालत होता, "हे स्वराली, तुला सांगु का, आपण जो फोटो काढु ना, मी त्याची स्टोनप्रिंट देईल तुला..!" असं स्वच्छिल स्वरालीला बोलला. "स्वच्छिल काय असतं रे स्टोनप्रिंट?" असं स्वरालीने त्याला विचारलं.
              "अगं माझा मित्र फोटोग्राफर आहे, त्याने नुकतच एक मशीन मागवलयं, त्यातुन आपले फोटो दगडावर प्रिंट करता येतात, त्याला स्टोनप्रिंट म्हणतात, तुला सांगतो स्वराली, एखाद्या मुलीचा फोटो तिला असा स्टोन प्रिंट करुन प्रपोझ करावं, शप्पथ, ती नाही म्हणुच शकत नाही, कारण इतक्या इनोव्हेटिव्ह वे ने तिला कुणीच प्रपोझ केलेलं नसतं..! अगं प्लेटवर तर नेहमीच आपण फोटो बघतो, पण असा दगडावर फोटो असेल तर समोरचा खुष होणारच, कारण आपल्याकडे पुर्वीपासुन दगडावर फक्त देव-देवतांची चित्रं किंवा मुर्ती कोरलेल्या असता, त्यामुळे असा कुणाला स्टोनप्रिंट दिला की तो जणु आपल्याला देवासमानच आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही..!" असं स्वच्छिल बोलला. 
                      "खरंच खुप रोमॅंटिक आयडिया आहे रे..!" असं स्वराली बोलली.  अर्जुन आणि वेदाली काय करतायं हे बघण्यासाठी स्वच्छिल सहज मागे वळला, "हे स्वराली, अर्जुन आणि वेदालीला बघं, दोघं कशी नवं लग्न झालेल्यांसारखी चालतायं एकमेकांसोबत लाजत लाजतं, अगदी मेड फॉर इच ऑदर वाटतायं ना..!"  स्वच्छिल असं बोलल्यावर स्वरालीने माघे वळुन पाहिलं, आणि हसतच बोलली, "अरे हो, ते दोघं किती लाजत लाजत चाललीएं, पण ती दोघं मेड फॉर इच ऑदर नाही वाटत रे, तुला खरं सांगु का स्वच्छिल, तुझी आणि वेदालीची जोडी मस्तच वाटेल बघं, अरे आम्ही मघा गप्पा मारत होतो ना तेव्हा ती तुझी खुप तारीफ करत होती, स्वच्छिल असा, स्वच्छिलने लहानपणी असं केलं वैगेरे वैगेरे असं सांगतांना तिचा चेहरा खुप आनंदुन गेला होता. तु आवडतो रे तिला असं तिच्या बोलण्यातुन जाणवतं..!" असं स्वराली बोलल्यावर स्वच्छिल नुसताच हसला, आणि मनातच "खरंच वेदालीला इमोशनल फुल म्हणतो ते चुकीचं नाही, मला वाटलं तीने माझ्या खुप चुगल्या केल्या असतील,  बिचारीनं तर माझी स्तुती केली आणि आयतंच माझ्या हाती कोलीत देऊन टाकलं..!  

Monday, March 4, 2013

"तो आणि त्याची ती..!" १.२२


                      "चेक ऍंड मेट..!" असं आनंदाने अर्जुन बोलला, "कमाल आहे अर्जुन तुझी, अरे माझ्या मित्रांशी कितीतरी वेळा मी चेस खेळलो, आजवर कधीच हरलो नाही,  पण आज सलग तीन गेम मध्ये हरवलंस तु मला, वेल डन, कोणी शिकवलं तुला इतकं छान चेस खेळायला..?" असं स्वच्छिलच्या बाबांनी  अर्जुनला आनंदाने विचारलं. "स्वरालीच्या बाबांनी, ते खुप छान चेस खेळतात, लहान असतांना ते मला आणि स्वरालीला चेस खेळायाल शिकवतं, त्यांच्याबरोबर आजपर्यंत मी एकदाही जिंकलो नाही..!" असं अर्जुन बोलला. सुमारे अर्ध्यातासापासुन त्यांचा गेम बघत असलेली स्वरालीने मग अर्जुनला आवाज दिला. "हे केव्हा आलीस तु स्वराली?" असं अर्जुनने तिला विचारलं.  "अरे मी तर केव्हाच घरी आले, केव्हाचा तुमचा गेम बघत होते, काही म्हंटल तरी चालेल पण, अर्जुन अगदी बाबांसारखाच गेम खेळतो तु, काका तुम्हीपण खुप छान खेळतात, पण अर्जुनच्या क्वीनने तुमच्या सगळी चाल उलटवली..!" असं म्हणुन स्वराली हसली. स्वरालीचं ते बोलणं ऐकुन अर्जुन आणि स्वच्छिलचे बाबा दोघंही हसायला लागले. "काय स्वराली, रात्री जेवण झालं की होऊन जाऊ देऊ तुझी आणि अर्जुनची चेसची एक मॅच..!" असं स्वच्छिलचे बाबा तिला बोलले आणि स्वरालीने हसुनच होकार दिला.
          गच्चीवरुन खाली आल्यावर स्वराली अर्जुनला बोलली, "काय रे अर्जुन तुला कंटाळवाणं वाटतयं का? तु का आला नाहीस सकाळी स्वच्छिलच्या मित्रासोबत? अरे स्वच्छिलने थंब हिल दाखवली खुप मस्त होती, तुला मिस करत होते रे, का नाही आलास तु?"  अर्जुन काही बोलणार इतक्यात, "अर्जुन भैय्या, चल ना आमच्यासोबत क्रिकेट खेळायला..!" असं चिंटुने त्याला आवाज दिला, त्याच्यासोबत त्याची चिल्लरपार्टी आणि वेदालीपण जोडीला होती. चिंटु आणि वेदालीला बघताच अर्जुन आनंदाने स्वरालीला बोलला, "अगं तुमच्यासोबत आलो असतो तो मला इथे चिंटु भेटला नसता ना? अगं हा चिंटु, आणि हे त्याचे सगळे मित्र, ही चिंटुची ताई वेदाली, स्वच्छिल आणि ही दोघंही क्लासमेट आहेत, वेदाली ही स्वराली..!" त्या छोट्या मुलांकडे बघत स्वराली त्यांना बोलली, "ऐ मला पण घ्याल का तुमच्या टिममध्ये कच्चा लिंबु म्हणुन..?" स्वराली असं बोलल्यावर अर्जुन आणि वेदालीला हसायला आलं. इतक्यावेळ स्वतःच्या रुम मध्ये असलेला स्वच्छिलला हसण्याचा आवाज आला आणि तसा तो लगबगीने त्याच्या रुममधुन बाहेर आला. हॉल मध्ये असलेल्या वेदाली, अर्जुन, स्वराली, चिंटु आणि त्यांच्या मित्रांना बघुन स्वच्छिल क्षणभर त्यांच्याकडे बघत बसला. 
                     "हे दिदी, तुला घेऊ आमच्या टिममध्ये, पण स्वच्छिलदादाला नाही घेणार, तो चिटिंग करतो, आमचा बॉल घेऊन पळुन जातो..!" असं चिंटुसोबत त्याचे बाकीचे मित्र बोलल्यावर स्वरालीने स्वच्छिलकडे आश्वर्याने पाहिलं आणि बोलली, "बाप रे, स्वच्छिल अरे काय ऐकतेयं मी? तु या छोट्या मुलांना असा त्रास देतोस? अरे इतका मोठा झालास तरी अजुन तु खोड्या काढतोस? बघं ती मुलं कशी घाबरतात तुला, स्वच्छिल चांगलं नाही रे असं वागणं..!" स्वराली असं बोलली आणि स्वच्छिलला खुप ओशाळल्यासारखं झालं. मनातच तो चिंटु आणि त्याच्या मित्रांना शिव्या घालु लागला, "आईशप्पथ, आज तर आपलं बॅडलकच खराब आहे, चिंट्यासारखी शेंबडी कार्टी स्वरालीसमोर हिरोगिरी करतायं, एकदा स्वराली गेली की दाखवतोय यांना, कसं क्रिकेट खेळतात तेच बघतो.  क्रिकेटच काय पण गोट्या-गोट्या खेळणंही अवघड करेल तुमचं.!" असं स्वच्छिल मनातच बोलला.
       "हे चिंटु, असं काहीपण काय बोलतो," असं म्हणत वेदालीने त्याला रागवायचा प्रयत्न केला. "चल ना अर्जुनभैय्या," असं अर्जुनच्या हाताला पकडत चिंटु त्याला बाहेर घेऊन जाऊ लागला, तशी त्याच्यासोबत स्वराली आणि वेदालीपण निघाली, त्यांच्यामागुन बच्चे कंपनी निघाली पण स्वच्छिलला वाकुल्या दाखवनुच..! स्वच्छिलने रागानेच त्यांच्याकडे बघितलं, आणि त्याच्यारुम मध्ये येऊन तो खिडकी उघडुन यांचा खेळ बघु लागला. "देवा, तुझी करणी महान रे..! सकाळी या अर्जुनाला एकटं सोडलं, आणि आता या वानरसेनेनं मला एकटं पाडलं, चांगलं नाही केलंस देवा..! असं स्वच्छिल बोलला. इकडे अर्जुन, स्वराली क्रिकेट खेळण्यात रमुन गेले. कितीवेळ यांना बघुन स्वतः जीवाची घालमेल करत बसणार त्यापेक्षा कार्टुन बघुया असा विचार करुन स्वच्छिल त्या खिडकीसमोरुन उठला. थोडावेळ झाल्यानंतर त्याने वेदालीला फोन केला. "हे वेदाली, असं का छळतेयं गं, त्या तुझ्या भावाला काही समज देत जा? यार शोभतं का त्याला,  असं कुणा सुंदर मुलीसमोर आपला असा गेम केला राव त्याने..! बरं ते जाऊ दे, तुझी आणि त्या अर्जुनची कशी भेट झाली गं?" असं स्वच्छिल तिला बोलला. "अरे बापरे, कुठे तरी आग लागली म्हणायची तरं, काय रे अर्जुनची स्वराली आवडली का तुला हं? म्हणुनच तु मुद्दाम सकाळी तिला एकटीलाच घेऊन कॉलेजला गेलास ना?" असं वेदालीने त्याला उत्तर दिलं. "हो आवडलीएं मला ती, म्हणुन मी मुद्दाम तिला एकटीलाच घेऊन गेलो कॉलेजला, खुष हेच ऐकायचं होतं ना तुला, झालं तुझ्या मनाचं समाधान, तुझी पण कमालच आहे यार, एक दिवसही झाला नसेल त्या अर्जुनला भेटुन आणि त्यासाठी तु मला, तुझ्या बालमित्राला चिडवतेयं, आय डोन्ट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यु वेदाली..!" असं  स्वच्छिल जरा रागातच तिला बोलला. "हे स्वच्छिल, उगाच माझ्यावर का चिडतोयं, अरे तु जर या छोट्यांना असा त्रास देत नसतास ना तर आज तुलाही खेळता आलं असतं, चल नंतर बोलुया, आता माझी बॅटिंग आलीए, आणि अर्जुन बॉलिंग करतोयं..!" असं म्हणुन वेदालीने फोन ठेवला.
                    "या वेदाली बरोबर बोलण्यात काही अर्थ नाही," असं स्वच्छिल फोन ठेवल्यानंतर स्वगतच बोलला. थोड्यावेळाने त्याने विचार केला, घाई-घाईने त्याने त्याच्याकडे असलेला नवा टेनिसबॉल घेतला आणि बाहेर गेला, "हे चिंटु, हे घ्या तुमच्यासाठी नवा बॉल आणलायं, आता तरी घ्याल का मला तुमच्या टिममध्ये," असं तो म्हणणारच तितक्यात त्याने बघितलं की तिथे ना अर्जुन होता ना स्वराली आणि वेदालीपण दिसत नव्हती. तसा तो आर्यन जवळ गेला आणि बोलला, "अरे तुमचा अर्जुनभैय्या कुठे गेला?" आर्यनने वेदालीच्या घराकडे बोट दाखवल्यावर स्वच्छिलला काळजी वाटु लागली, "वेदाली, या दोघांना तिच्या घरी घेऊन गेली, कमाल आहे या मुलीची..!" असं म्हणुन तो परत त्याच्या घरी आला आणि अर्जुन आणि स्वराली परत यायची वाट बघत बसला. एकतास त्या दोघांची वाट पाहुन आता स्वच्छिलचा संयम सुटणार असं वाटत होतं, म्हणुन तो वेदालीला फोन करायला लागला, पण ती त्याचा फोन मुद्दाम उचलत नव्हती. शेवटी न राहावुन स्वच्छिलने तिच्याघरी जायचं ठरवलं. वेदालीच्या घरची डोर-बेल वाजवल्यावर तिच्या आईने दरवाजा उघडला, "काकु, वेदाली आहे का घरी?" असं त्याने नेहमीप्रमाणे साळसुदपणे विचारलं."नाही रे स्वच्छिल, ती थोड्यावेळापुर्वीच बाहेर गेली, आणि तिच्याबरोबर तर तुमच्याघरी आलेले पाहुणे होतीच की, कदाचित तुझ्याच घरी गेली असणार बघं..!" असं वेदालीची आई बोलल्यावर स्वच्छिल तिथुन निघाला, वेदाली अर्जुन आणि स्वराली या दोघांना घेऊन कुठे गेली असेल याचा तो विचार करु लागला. 

Thursday, February 14, 2013

"तो आणि त्याची ती..!" १.२१


                  "हाय फ्रेंड्स, मीट माय बेस्ट फ्रेंड स्वराली, आमच्या मातोश्रींच्या जीवलग मैत्रीणीची राजकुमारी," असं स्वच्छिलने स्वरालीची ओळख सगळ्यांना करुन दिली. स्वच्छिल कॉलेजचा जी.एस. होता त्यामुळे त्याच्यासोबत नेहमी मुला-मुलींचा गराडा असायचा, सगळ्यांमध्ये त्याची वट बघुन स्वरालीला बरं वाटलं. स्वच्छिल आपल्या मित्र-मैत्रिणींसह तिला सगळं कॉलेज दाखवत होता, त्यांचा वर्ग, त्यांची लॅब, लायब्ररी, त्यांचा कट्टा, कॅंटीन, कॉलेजच्या मागे असलेया गार्डनला ते लव्हर स्पॉट म्हणायचे तिथे पोहचल्यावर स्वच्छिल तिला बोलला, "स्वराली, मी जेव्हा फस्ट इयरला होतो ना तेव्हा मला माहित नव्हतं बरं का हा लव्हर स्पॉट आहे ते, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मी आणि माझी वेदाली नावाची मैत्रिण इथे बसलो होतो, आणि त्यावेळी आमच्या सिनियर्सनी आम्हा दोघांना "पहेला नशा" हे गाणं म्हणुन खुप चिडवलं होतं. हे प्रकरण खुप गाजलं होतं कॉलेजमध्ये," असं स्वच्छिल तिला बोलला. "अरे व्वा, म्हणजे तु कॉलेजचा चॉकलेट बॉय आहेस तर? हे मला दाखव ना तुझी गर्लफ्रेंड?" असं स्वराली खुप आनंदाने त्याला बोलली. "छे गं, या कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड असायला नशीब लागतं, आणि मी आणि वेदाली आम्ही दोघं फ्रेंड्स आहोत, खरंतर जिच्यावर प्रेम करावं अशी कोणी मिळाली नाहिये मला..!" असं स्वच्छिल जरा लाजत बोलला. "कशी मुलगी हवीऐ, जी.एस.? जरा आम्हालापण कळु द्या?" असं त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याला चिडवलं. "वेळ आली की नुसतच सांगणार नाही तर दाखवेल मला कशी प्रेयसी हवीये," असं म्हणतांना समोर असलेल्या स्वरालीकडे त्याने नकळत इशारा केला. बराच वेळ झाला तरी अर्जुन कसा पोहचला नाही म्हणुन स्वराली अर्जुनबद्दल स्वच्छिलला विचारु लागली. "हे स्वराली, अर्जुन कोण गं? बॉयफ्रेंड आहे का तुझा?" असं स्वच्छिलच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं. तशी स्वराली जरा लाजली हे सगळ्यांना जाणवलं, "माझा बेस्ट बेस्ट बेस्ट फ्रेंड आहे तो..!" असं स्वराली त्यांना बोलली. "अगं माझा फ्रेंड गेला होता त्याला घ्यायला, तर त्याने यायला नकार दिला." असं स्वच्छिलने तिला सांगितलं. हे सगळं  स्वरालीला खुप वेगळंच वाटलं होतं. "हे फ्रेंड्स, आपण लॉंग राईड वर जाऊ या का अप टु थंब हिल पर्यंत?" असं स्वच्छिल सगळ्यांना बोलला. सगळ्यांनी होकार दिला, पण स्वरालीची घरी जायची ईच्छा होत होती. हे लक्षात येताच स्वच्छिलने आपल्या एका मैत्रिणीला खुणवलं, "हे स्वराली, अगं इकदम मस्त स्पॉट आहे तो, अग अंगठ्याच्या आकाराची टेकडी बघायला आवडेल तुला..!" असं शुभदाने स्वरालीला सांगितलं, आणि मग ते सगळे त्या थंब हिल कडे बाईकवरुन रवाना झाले.
                        थंब हिल कडे जाणारा रस्ता मोकळाच असल्याने सगळ्यांच्या बाईक्स फुल स्पिडवर धावत होत्या. "हे स्वराली, तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, गाडी हळु चालवायला लावतो सगळ्यांना," असं स्वच्छिल तिला बोलला. आपल्यामुळे यांचा हिरमुड नको व्हायला म्हणुन स्वरालीने नकार दिला, पण गाडीवर ती जणु जीव मुठीत घेऊन बसली होती. थंब हिलचा परिसर खुप सुंदर होता, चहुकडे हिरवळ पसरलेली, मार्च महिना होता, वसंताची चाहुल असल्याने तरी तिथे असलेल्या रानफुलांची झाडे फुलांमुळे बहरली होती, आजु-बाजुला वाहणारे छोटे छोटे झरे बघणार्‍याचं मन मोहुन घेत होते. टेकडीवर गेल्यानंतर तर आजुबाजुचा परिसर खुप सुंदर दिसत होता. "खरंच स्वच्छिल, आमच्या गावापेक्षाही खुप सुंदर जागा आहे ही, किती प्रसन्न वाटतयं, थॅक्स इथे आणल्याबद्दल..!" असं स्वराली त्याच्याकडे बघुन बोलली. "चला, आजचा दिवस सार्थकी लागला तरं, तु खुष आहेस ना बस्स, हेच पाहिजे मला. अर्जुनने खुप मिस केलं हे सगळं, का आला नाही तो? कदाचित त्याला आमचं घर आवडलं नसणार, बोर होतोयं तो इथे असं वाटतयं मला..!" असं स्वच्छिल तिला बोलला, आणि खाली उतरु लागला. समोर दुरवर जाईल इतकी नजरेनं जणु स्वराली अर्जुनला शोधत होती असं वाटु लागलं, "काय रे अर्जुन का आला नाहिस तु रागावलायं का माझ्यावर?" असं ती मनातुनच जणु त्याच्याशी बोलु लागली.  थोड्यावेळाने ती खाली उतरली तशी उदास वाटु लागली. "स्वच्छिल घरी जाऊया रे आता आपण, आई-अर्जुन वाट बघत असतील," असं स्वराली त्याला बोलली, मग ते घराकडे परतु लागले.
                             इकडे अर्जुन स्वच्छिलच्या घराबाहेर बसला होता, त्याला समोरच्या अपार्टमेंट मध्ये छोट्या मुलांमध्ये होणारं भांडण दिसलं, तसा तो तिथे पोहचला. त्याने त्यांच भांडण मिटवलं आणि त्यांच्यासोबत तो क्रिकेट खेळु लागला. त्या लहान मुलांसोबत खेळतांना त्याला सकाळी जे घडलं त्याचा विसर पडला. एक अनोळखी मुलगा आपल्या छोट्या भावासोबत खेळतोयं, असं वेदाली नावाच्या एका मुलीने आपल्या गॅलरीतुन बघितलं, आणि घाईने ती खाली आली, आणि अर्जुनची चौकशी केली. "स्ट्रेंज, स्वच्छिलच्या घरी पाहुणा आहेस तु? अरे स्वच्छिल तर इतका खोडकर आहे ना की बस्स, तो आणि त्याचे मित्र ही मुलं खेळतं असली, आणि यांच लक्ष नसलं की या लहान मुलांचा बॉल घेऊन पळुन जातो तो, खुप त्रास देतो यांना, पण तु तर यांच्यासोबत चक्क लहानमुलांसारखा क्रिकेट खेळतोयं हे बघुन बरं वाटलं, बाय दि वे, मी वेदाली, मी आणि स्वच्छिल दोघं क्लासमेट्स आहोत..!" असं ती त्याला बोलली. "अर्जुन भैय्या, स्वच्छिलदादाला मी मोठा झालो की चांगला धडा शिकवणार आहे, इथुन सचिन सारखा अस्सा सिक्सर मारेल ना की त्याच्या रुमची काचच फोडुन टाकेल, असं सात वर्षांचा छोटा चिंटु बोलल्यावर अर्जुनला आणि वेदालीला हसु आवरणं कठीण झालं. "अरे चिंटु, असं नाही बोलायचं, अरे सचिन कधी कोणाला असा त्रास देतो का? चला खेळा तुम्ही आता, मी जातो घरी, आणि भांडण करु नका बरं का..!" असं अर्जुन त्याला बोलला. "अरे अर्जुन, काही काम आहे का रे तुला कारण मी सकाळीच पाहिलं तर स्वच्छिल कोणा मुलीला घेऊन कॉलेजला जातांना दिसला?" असं वेदालीने त्याला विचारलं, तसं अर्जुनने तिच्याकडे बघुन हसला, "अगं काही काम नाही, आणि ती मुलगी स्वराली होती, माझी बेस्ट फ्रेंड, खरंतर तिची आई आणि स्वच्छिलची आई बालमैत्रिण आहेत, मागे दोन महिन्यापुर्वी अलकाकाकु स्वरालीच्या घरी आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी बोलावलं होतं आम्हाला. आणि अनायसे स्वरालीची बोर्डाची परिक्षा संपली, मलाही तीन दिवस सुट्टी होती म्हणुन आम्ही इकडे आलोत..!" असं अर्जुन बोलला. "ओह्ह, असं आहे तर, अरे पण मग तु का नाही गेला त्याच्याबरोबर कॉलेजला? आमचं कॉलेज एकदम जबरदस्त आहे यार..! कसलंच टेंशन घ्यायची गरज नसते..! तु जायला हवं होतं त्या दोघांसोबत..!" असं वेदाली बोलली. "जाणार होतो, पण उशीरा जाग आली, रात्री खुप वेळ जागरणं झालं होतं ना? पण तु नाही गेलीस कॉलेजला?" असं अर्जुनने तिला उत्तर दिलं. "अरे जाणार होते पण कंटाळा आला, आणि बरं झालं नाही गेले ते, या निमित्ताने तुझी भेट झाली," असं म्हणुन वेदाळी निखळपणे हसली, आणि मग ती अर्जुनला, "फ्रेंड्स" असं म्हणत फ्रेंडशिप साठी हात समोर केला, अर्जुननही हलकेच हसला आणि  बोलला, "फ्रेंड्स फॉरऐव्हर, चल बाय वेदाली..!" आणि तो तिथुन घरी गेला. दुपारी तीनच्या सुमारास स्वच्छिल आणि स्वराली दोघं थंबहिल वरुन परत आले.
                           घरात येताच स्वरालीने तिच्या आईला विचारलं की अर्जुन कुठे आहे, "अगं कशी रे तुम्ही दोघं, त्या बिचार्‍याला इथे एकट्याला ठेवलं, तो वर गच्चीवर बसलायं स्वच्छिलच्या बाबांसोबत चेस खेळतं.!" असं अलकाकाकु स्वरालीला बोलला. स्वराली घाईने गच्चीवर गेली, अर्जुन आणि स्वच्छिलचे बाबा चेस खेळण्यात एकदम गुंग झाले होते, त्यामुळे स्वरालीने काहीच आवाज दिला नाही, आणि ती गुपचुप त्यांचा खेळ बघत बसली. इकडे स्वच्छिल त्याच्या खोलीत आला, अर्जुनची चांगली जिरवली म्हणुन तो खुष होता, सायंकाळी पण काहीतरी बहाणा करुन स्वरालीला घेऊन जाऊ बाहेर, आणि अर्जुन परत ठेऊ एकट्याला घरी असं तो ठरवु लागला, दरम्यान त्याला वेदालीने फोन केला, "हाय स्वच्छिल, आलास का कॉलेजवरुन? काय रे भामट्या, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कोणी असा त्रास देतं का? अर्जुनला घेऊन जायचं ना आपल्या कॉलेजला? चल बाय, सी यु लेटर..!" असं म्हणुन वेदालीने फोन कट केला, आणि स्वच्छिलला जाम टेंशन आलं. "आयला हा बांगडु तर जेम्स बॉंड निघाला, वेदालीची आणि याची भेट झालीच कशी काय? ती वेदाली तर एकदम इमोशनल फुल आहे, माझ्याबद्दल सगळं ओकुन मोकळी झाली असेल कदाचित, शिट, याला घेऊन गेलो असतो कॉलेजला तर बरं झालं असतं, निदान ग्रुपच्या मुलांनी याला गुंतवुन ठेवला असता, होप या वेदालीने या माकडाच्या हातात तलवार दिली नसेल..!" असं म्हणुन स्वच्छिल कॉटवर डोकं पकडुन बसला.

Sunday, February 3, 2013

"तो आणि त्याची ती..!" १.२०


            स्वरालीची बोर्डाची परिक्षा संपली होती, त्यामुळे ती दिवसभर चित्रकलेचा सराव करायची, "आत्मकथन सोडुन ज्याला इतरही सगळं लिहिता येतं तो खरा लेखक, याप्रमाणे निसर्गचित्रांखेरीज बाकीची चित्र काढता येतात तो खरा चित्रकार..!" या वाक्याने स्वराली एकदम प्रभावित झाली होती, त्यामुळे ती निसर्गचित्रांखेरीज बाकीच्या चित्र प्रकारांचा अभ्यास करु लागली. असाच एक दिवस तीला अलका काकुंनी फोन केला, "हे स्वराली, बेटा आपलं ठरलं होतं ना की सुट्टी लागली की येशील तु माझ्या घरी अर्जुनला घेऊन आहे ना लक्षात तुझ्या?" असं अलका काकु बोलल्या होत्या. अलकाकाकुंचा फोन आला होता हे स्वरालीने तिच्या आईला सांगितलं, आणि मग अर्जुनच्या घरी आली. "हे अर्जुन, तुला दोन-चार दिवस सुट्टी घेता येईल का रे माझ्यासाठी आपल्याला अलकाकाकुंनी बोलवलंय रे, मी, आई आणि तु आपण तिघेजण जाऊया का त्यांच्याघरी?" असं तीने त्याला विचारलं, "चालेल, पुढच्या आठवड्यात जाऊ आपण," असं अर्जुन तिला बोलला. अर्जुनकडुन होकार मिळाल्यानंतर स्वराली खुष होऊन घरी परतली, आणि केव्हा आपण अलकाकाकुंच्या घरी जाऊ असं तिला वाटायला लागलं.सकाळी लवकर स्वराली, तिची आई आणि अर्जुन तिघंही अलकाकाकुंच्या घराकडे बसने रवाना झाले, बसस्टॅंडवर अलकाकाकुंच्या सोबत होता त्यांचा एकुलता एक मुलगा स्वच्छिल..!
                  स्वच्छिल हा स्वरालीपेक्षा वयाने तीनवर्ष मोठा, पण अर्जुनपेक्षा एकवर्षाने लहान होता. स्वच्छिल या शब्दाचा अर्थ ज्याचं चरित्र स्वच्छ आहे, पण स्वच्छिलची वागणुक त्याच्या नावाच्या अर्थाच्या एकदम विरुद्ध होती, घर सोडलं की बाकी सर्वत्र बॅडबॉयच्या इमेजमध्ये त्याला वावरायला आवडायचं..! "मला फक्त प्रेमात असणारी मजा लुटायचीऎ, पण "प्रेमाचं" लेबल, मला नकोयं." असं तो नेहमी म्हणायचा. स्वच्छिल एकदम जिद्दी होता, त्याला कशातच पराभव स्विकारायला आवडायचं नाही, बॅडबॉय असला तरी तो कॉलेजमध्ये सगळ्या परिक्षांत अव्वल असायचा, त्यामुळे त्यांच्या कॉलेजचा तो जी.एस. होता, त्यामुळे सगळीकडे त्याला मान असायचा. अलकाकाकु जेव्हा स्वरालीच्या घरुन आल्या, त्यांनी स्वच्छिलला स्वराली आणि अर्जुनबद्दल सांगितलं, अर्जुनच्या त्या कौतुक करतांना थकत नसत, त्यामुळे स्वच्छिलला अर्जुन नावाचा मुलगा आहे तरी कोण ज्याचं आपली आई इतकं कौतुक करते म्हणुन त्याला अर्जुनला एकदा भेटायचंच होतं.
                     बसस्टॅंडवर स्वरालीला बघताच स्वच्छिलला जणु लव्ह ऍट फस्ट साईट असंच वाटलं, त्याच्या कॉलेजमधल्या कित्येक मुलींबरोबर त्याने डेटिंग केलेलं होतं, पण स्वरालीला बघताच जणु त्याची विकेटच गेली असं त्याल वाटलं. पण स्वराली बरोबर असलेल्या अर्जुनकडे जेव्हा त्याचं लक्ष गेलं, तेव्हा सहाजिकच त्याच्यातला बॅडबॉय जागा झाला होता. घरी आल्यावर तो त्याचं घर स्वरालीला दाखवु लागला, त्याच्याबद्दल तो भरभरुन बोलत होता, अशातच स्वरालीचं लक्ष एका ट्रॉफीवर गेलं, "हे स्वच्छिल, ही ट्रॉफी कशाबद्दल मिळाली रे तुला?" असं तीने त्याला विचारलं, आपल्या टि-शर्टच्या बाह्या सावरत स्वच्छिल बोलला, "अगं इंटरकॉलेज बॉडीबिल्डींग मध्ये पहिला आलो तेव्हा मिळाली ती..!" स्वरालीने त्याला तसा प्रश्न विचारला म्हणुन तो फार सुखावला पण क्षणातच स्वरालीने त्याला बोलली, "अरे अर्जुन, या ट्रॉफीसारखीच तुझ्याक्डे पण ट्रॉफी आहे ना, यापेक्षा थोडीशी मोठी आहे ना, हे स्वच्छिल तु आणि अर्जुन पंजा लढवा ना एकदा..!" अर्जुनची तब्येत आपल्यासमोर काहीच नाही हे बघताच स्वच्छिलला जोश आला, आणि तो अर्जुनला आग्रह करु लागला, शेवटी अर्जुनही तयार झाला, पण अवघ्या काही सेकंदातच अर्जुनने स्वच्छिलला हरवलं, स्वरालीसमोर हरलो, यामुळे स्वच्छिलला खुप वाईट वाटलं, यामुळे अर्जुन तर पक्का त्याच्या मनात बसला. सायंकाळी स्वच्छिल अर्जुनला घेऊन त्याच्या मित्रांकडे घेऊन गेला, "हे बॉईज, हा अर्जुन आहे बरं का, एकदम हॉट डुड, हे हा आर्मसेसलर आहे बरं का..!" असं अर्जुनची ओळख त्याने त्याच्या मित्रांना करुन दिली, "भाई, आमच्याशी लावता का पंजा,?" असा प्रश्न उर्जित नावाच्या मित्राने अर्जुनला विचारला, अर्जुनने गम्मत म्हणुन त्याच्याशी पंजा लावुन त्यालाही हरवलं हे बघुन संजय नावाच्या स्वच्छिलचा मित्र त्याला बोलला, "व्वा, यार आमच्या कॉलेजच्या अनबिटेबल आर्म रेसलरला हरवलं, पंजा झाला आता पंच-पंच खेळायचा एक गेम,?" स्वच्छिलचे मित्रांच्या चेहर्‍यावरचे हावभावाचा अंदाज घेत अर्जुनने साफ नकार दिला.
                           घरी परतत असतांना, स्वच्छिल अर्जुनला बोलला, "हे अर्जुन, स्वराली आणि तुझ्यात काही रिलेशन आहे का रे? डाव आहे का ती तुझी? आयला, अरे लाजु नको सांग ना खरं खरं तुमच्याबद्दल? आपल्याला तर जाम आवडलीयं रे, साला आमच्या कॉलेजमध्ये अशा आयटम आहे, तु बघशील तर कुणाशी रिलेशन ठेऊ आणि कुणाशी नको असं होईल. पण स्वरालीला पाहिल आणि मला तर..., आईशप्पथ तुझं आणि तिचं अफेअर नसेल तर आपली सेटींग करुन देशील का यार तिच्याशी..!" स्वरालीबद्दल स्वच्छिल असं बोलला हे बघुन अर्जुनला प्रचंड राग आला, त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली, "अरे स्वच्छिल मला वाटलं तु चांगला मुलगा असशील, अरे तुला तर आपण काय बोलतोयं त्याचंही भान नाहिये, अरे असा विचारच कसा आला तुझ्या मनात? तुझ्या जागी आज कोणी दुसरा असता आणि स्वरालीबद्दल माझ्यासमोर असं बोलला असता ना, तर त्याच्या तोंडात हात टाकुन त्याची जीभ खेचली असती, एकदा बोललास, बसं झालं, परत स्वरालीबद्दल असं काही बोललास तर बघं," असं अर्जुन स्वच्छिलच्या डोळ्यांकडे एकदम खुन्नसने बघुन बोलला, "ओय, पहातोय काय रागाने, काय करशील रे? मारशील मला, चल मार एक पंच मारुन दाखव, मग मानेल..!" असं स्वच्छिल अर्जुनला बोलला, आणि खरंच अर्जुनने त्याला खुप जोरात पंच मारला त्यामुळे तो भररस्त्यात खाली पडला, चांगली पाच मिनिटं त्याच्या तोंडुन एक अवाक्षर निघालं नाही, पण त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, "चिल चिल.. मर्दाची औलाद आहेस तु पटलं मला, माझ्यावर हात टाकलास कोई बात नही, पण स्वरालीचा हात हातात धरुन तुझ्यासमोरुन निघुन जाईल आणि  हेच तुझे हात माझ्यासमोर झुकवील मी..! वाटु दे तुला माझा कितीही राग, पण शेवटी बाजी मारेल हा स्वच्छिल वाघ, लक्षात ठेव स्वराली सारख्या चांगल्या मुली नेहमी माझ्यासारख्या वाईट मुलांना सुधारण्यासाठीच  असतात रे मजनु, अर्जुन भले ती तुझ्यावर या क्षणाला प्रेम करत असु दे, पण एकदिवस ती माझ्या प्रेमात पडल्याशिवाय रहाणार नाही, कारण स्वरालीला प्रेम करण्यासाठी यापुढे हा स्वच्छिल अर्जुनचा पर्यायच ठेवणार नाही..!" असं स्वच्छिल त्याला बोलला. घरी आल्यावर मात्र काही घडलंच नाही असं तो दाखवत होता. 
                         रात्री सर्वांची जेवणं झाल्यानंतर ते सगळे मिळुन अंताक्षरी खेळु लागले, पण अर्जुनचं मन त्यात रमत नव्हतं, आपल्या आईच्या मैत्रिणीच्या मुलीबद्दल कोणी असं कसं काय बोलु शकतो, ह्या विचारात त्याच मन बुडुन गेलं, स्वच्छिल इतरांना जे दाखवतो, आणि आपल्याला जो स्वच्छिल दिसला यात खरं काय तेच कळत नाही. अंताक्षरीचा खेळ चांगलाच रंगात आला होता, पण अर्जुनचं लक्ष नव्हतं, तितक्यात स्वच्छिलचं, "तु चिज बडी है मस्त, मस्त..!" या गाण्याने अर्जुन संतापला होता हे त्याच्या चेहर्‍यावरुन कळत होतं, आपल्याला झोप येतीयं असं दाखवुन तो तिथुन जाऊ लागला, त्याचबरोवर स्वच्छिलही उठला. त्याच्या खोलीत आल्यावर अर्जुनसमोर तेच गाणं गुणगुणतं होता, थोड्यावेळाने त्याला त्याच्या मित्राचा फोन आला, "कुणाला तरी आपणं इंम्प्रेस करतोयं कारण आपलं हार्ट तिच्यामुळे फडफडतयं हे पाहुन समोरच्याचं रक्त उकळतयं, उद्या कॉलेजला आल्यावर सांगतो." असं म्हणुन स्वच्छिलने फोन ठेवला. अर्जुनला काही केल्या झोप लागत नव्हती, म्हणुन तो उठला आणि खिडकी उघडुन आकाशातल्या त्यार्‍यांकडे बघु लागला. स्वच्छिलचं लक्ष त्याच्याकडे गेलं, "काय अर्जुनराव, झोप उडाली का? की निद्रानाश झालायं? झोप येत नसेल तर यौवनाचे चमत्कार बघत बसं, आपल्याकडे बरंच कलेक्शन आहे, शांत झोप लागेल तुला..!" असं म्हणुन स्वच्छिल एकदम कुस्तितपणे हसला. अर्जुनने त्याच्याबोलण्याकडे दुर्लक्ष केलं, थोड्यावेळाने त्याला तिथेच झोप लागुन गेली.
                          सकाळी स्वच्छिल नेहमीपेक्षा खुप लवकर उठला होता, "हे स्वराली, तु आज येशील का माझ्यासोबत कॉलेजला? माझ्या सगळ्या फ्रेंड्सला भेटवील मी?" असं त्याने तिला विचारलं. "अरे येईल ना, पण अर्जुन?" असं स्वरालीने त्याला विचारलं. "अगं टेंशन नको घेऊ, त्यालापण घेऊ ना सोबत, पण तो अजुनही खुप गाढ झोपेत आहे, माझा एक मित्र आहे तो पिक करेल त्याला, काल रात्री अर्जुनला तसं मी सांगितलयं, अर्जुनच बोलला की त्याला काही हरकत नाहीऎ, तर मग निघुया का आपण?" असं स्वच्छिल स्वरालीला बोलला. क्षणभर थांबुन स्वराली त्याच्याबरोबर जायला तयार झाली, आणि स्वच्छिल तिला बाईकवरुन त्याच्या कॉलेजला घेऊन गेला. सुमारे नऊ वाजता अर्जुनला जाग आली, घड्याळाकडे बघताच तो हैराण झाला, "बापरे, रोज पहाटेच उठणारा मी, आज इतकी झोप कशी लागली?" असं स्वगत बोलत त्याने रुममध्ये नजर फिरवली तर तिथे स्वच्छिल नव्हता. मग त्याने अलकाकाकुंना स्वच्छिल कुठे गेलायं ते विचारलं, "अरे अर्जुन, तो आणि स्वराली दोघं त्याच्या कॉलेजला गेली आहेत, तु तयार हो पटकन, त्याचा मित्र येणार आहे तुला घ्यायला," असं अलकाकाकु त्याला बोलल्या. अर्जुन तयारी करुन स्वच्छिलच्या मित्राची वाट पहात बसला, थोड्यावेळाने फोन आला की स्वच्छिलच्या मित्राची तब्येत अचानक बिघडलीयं, म्हणुन  तो येऊ शकत नाही, हे ऐकताच अर्जुन उदास झाला.


Sunday, January 13, 2013

"तो आणि त्याची ती..!" १.१९

                   अर्जुन घराकडे आला, लांबुनच त्याला त्याच्या घरात उजेड बघुन त्याला आश्चर्य वाटलं, त्यामुळे त्याची पावलं घराच्या दिशेनं पटापट पडायला लागली. घराजवळ आल्यावर त्याच्या दारावर असलेलं ते तोरणं, अंगणात काढलेली आकर्षक रांगोळी, दरवाजात लावलेल्या पणत्या बघुन तो सुखावुन गेला, आनंदानं तो घरात आला आणि समोर बघुन अवाकच झाला. त्याचं सगळं घर फुलांनी, स्वरालीच्या चित्रांनी खुप सुंदरपणे सजवलेलं होतं, त्याचे मामा-मामी, स्वरालीचे आई-बाबा आणि त्याच्या सगळ्या ग्रुपला बघुन त्याला खुप आनंद झाला. अर्जुनच्या सर्व मित्रांनी आप-आपले बालपणाच्या फोटोंचे खास मास्क तयार केले होते, अर्जुनला बघताच सगळ्यांनी मोठ्या जल्लोषानं एकासुरात "हॅपी बर्थ डे टु यु, हॅपी बर्थ डे टु यु, हॅपी बर्थ डे डियर अर्जुन, हॅपी बर्थ डे टु यु.." असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या. अर्जुनचे डोळे आनंदाश्रुंनी भरुन आले, त्याचा वाढदिवस याआधी कधीच इतक्या चांगल्या प्रकारे साजरा झाला नव्हता असं त्याला वाटु लागलं.
                 हे सगळं बघत असतांना त्याची नजर चहुकडे स्वरालीला शोधत होती, तितक्यात समोरुन स्वरालीला केक आणि औक्षणासाठी केललं ताट घेऊन येतांना बघितलं आणि अर्जुन खुप सुखावला. "अर्जुन, ही सगळं सरप्राईज तुला देण्याची आयडिया स्वरालीची आहे बरं का..!" असं तेजाली बोलली, आणि अर्जुनने स्वरालीकडे बघितलं, नजरेनंच तो तिला जणु थॅंक्स म्हंटला. "अरे यांनी जर मदत केली नसती तर हे सगळं शक्यच झालं नसतं," असं स्वराली अर्जुनला बोलली. औक्षण झाल्यानंतर थोड्यावेळाने अर्जुनच्या घरी खान सर आले, त्यांना बघुन अर्जुनला खुप आनंद झाला. त्यांनी अर्जुनसाठी बॉक्सिंग ग्लोव्ह्ज आणले होते. अर्जुनचा बर्थ डे खुप चांगल्या प्रकारे साजरा झाला. रात्री ९.३० च्या सुमारास मग जमलेले घरी जाण्यास निघाले, पण हर्षित आणि रितेश आज अर्जुन सोबत थांबणार होते.
                      अर्जुन स्वराली जवळ गेला, "हे स्वराली, कसं काय सुचलं गं, आयुष्यातलं सगळ्यात उत्तम सरप्राईज होतं हे..!" असं अर्जुन तिच्या डोळ्यांत बघुन बोलला, त्याच्या चेहर्‍याकडे बघुन  स्वरालीच्या चेहर्‍यावर समाधान झळकत होतं, "अर्जुन, मी तुला म्हंटलं नव्हतं का, १-जानेवारीला की यंदा आपल्याला एकमेकांसाठी वेळ देता येईल असा संकल्प कर, थोडा वेळ मी दिला आणि तुला खुष करण्यासाठी हे सगळं सुचलं, माझी चित्र तु केव्हा बघायला आला असतास त्यापेक्षा ही आज तुझ्या वाढदिवशीच तुला दाखवता आली मला, तु खुष आहेस ना अर्जुन?" असं स्वरालीनं त्याला विचारलं. "हो स्वराली, तुझ्या कडे एक गोष्ट मागु का?" असं अर्जुनने तिला विचारलं. स्वरालीनं त्याला हसुनच संमती दिली, आणि अर्जुन तिच्या चित्रांकडे बघत बोलला, ही सगळी चित्र अशीच राहु देशील का माझ्या घरात?" स्वरालीनं त्याच्याकडे बघितलं, आणि तीनं त्याला होकार दिला, आणि मग ती तिच्या घरी निघुन गेली.
                              घरी आल्यावर स्वराली अर्जुनचा विचार करत होती. इकडे हर्षित, रितेश आणि अर्जुन स्वरालीचे एक एक चित्र बारकाईनं बघत होती. रितेश आणि हर्षित तर तिच्या चित्रांची स्तुती करतांना थकत नव्हते आणि अर्जुन प्रत्येक चित्राचा अर्थ शोधण्यात गुंग झाला होता. "कवीच्या मनावर एखादी प्रेरणा आरुढ झाली की ती त्याच्याकडुन मग नेहमीच दर्जेदार कलाकृती निर्माण करवुन घेते, अगदी तसंच स्वरालीच्या चित्रांना बघतांना जाणवतं, अगदी बोलकी आणि मन गुंतवुन ठेवणारी आहेत ही सगळी चित्रं," असं हर्षित बोलला. "खरं आहे हर्षित, प्रत्येक चित्र काहीतरी सांगु बघतयं असं जाणवत मला पण," रितेशनं हर्षितच्या बोलण्याला दुजोरा दिला. तितक्यात अर्जुन हर्षितला बोलला, "हे तुला तो डायरी घ्यायच्या वेळचा किस्सा आठवतोयं का? आपल्याला स्वराली भेटली तो..?" हर्षित त्याला बोलला, "मग चांगलाच आठवतो ना, पण तुला का अचानक त्याची आठवण झाली रे?" अर्जुन त्यावर बोलला, "अरे, स्वराली बोलली होती, तिला प्रत्येक चित्र काढतांना काय जाणवतं ते ती तिच्या डायरीत लिहिते ते, या चित्रांचा अर्थ आणि खरी मजा त्या डायरीतील तिनं लिहिलेल्या भावनांबरोबर येईल असं वाटतं." "अरे मग तु स्वरालीला सांग ना तसं, तुला देईल की ती तिची डायरी वाचायला," असं रितेश बोलला. 
                       घरी आल्यावर स्वराली खुप खुष होती. अर्जुनला तिच्या चित्रांकडे बघुन समाधानी होतांना तिला खुप आवडलं होतं. उद्या तिचा शेवटचा पेपर होता, म्हणुन ती पुन्हा जोमानं अभ्यासाला लागली. दुसर्‍या दिवशी अर्जुन तिच्या सोबत तिच्या परिक्षा केंद्रावर गेला होता. तिचा पेपर सुरु झाल्यावर अर्जुन कॉलेजला आला. लेक्चर झाल्यानंतर लावण्या अर्जुनला बोलली, "हे  स्वराली खुप चांगली मुलगी आहे रे अर्जुन, काय सुंदर आयडिया होती तीची, एखाद्याला सरप्राईज द्यावं तर असंच..!" असं ऐकल्यानंतर अर्जुनला खुप आनंद झाला. कॉलेज सुटल्यानंतर हर्षितने अर्जुनला स्वरालीच्या डायरीची आठवण करुन दिली. अर्जुन घरी आल्यानंतर तो स्वरालीची वाट पाहु लागला, थोड्यावेळाने स्वराली तिथे आली आणि धीर करुन अर्जुनने  तिला विचारलं, "हे स्वराली तुला राग नसेल येणार तर एक विचारु का गं?" स्वराली त्याच्याकडे बघत बोलली, "अरे विचार ना, त्यात कसली आलीए परवानगी, आणि मला माहिती आहे मला राग येईल असं तु काहीच करणार नाहीस, बोल बिंद्धास्त..!" स्वराली असं बोलल्यावर अर्जुनला बरं वाटलं, आणि तो बोलला, "स्वराली, आपण जेव्हा डायरी घेत होतो, त्यावेळी तु बोलली होतीस की तुला प्रत्येक चित्र काढतांना काय वाटतं, त्या भावना तु डायरीमध्ये लिहितेस ते, तुला वेळ असेल तर मला सांगशिल या प्रत्येक चित्र काढतांना तुला काय वाटलं होतं ते?" अर्जुनच्या या प्रश्नाने स्वराली जराशी लाजली, "अरे अर्जुन, मी आत्ता सांगण्यापेक्षा, मी नक्की देईल तुला माझी डायरी वाचायला..!" असं बोलुन ती तिथुन निघुन गेली. स्वराली गेल्यानंतर अर्जुन तिच्या चित्रांकडे बघत बोलला, "कसं काय कळतं स्वरालीला माझ्या मनातलं?"