नमस्कार मित्रांनो, यंदांच २०१२ हे वर्ष खरं तर माझ्यासाठी लिखाणाच्या बाबतीत खुप लकी ठरलयं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही कारण वर्षाच्या सुरुवातीलाच "तो आणि त्याची ती" ही कादंबरी पुर्ण झाली, "लाईफ इन फार्मसी कॉलेज" या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचं काम पुर्णत्वाकडे चाललयं, आणि यासगळ्यांच्या जोडीला "शिंपल्यातले मोती" या कथा-संग्रहातील ११ पैकी ७ कथा पुर्ण झालेल्या आहेत. म्हणुनच यावेळी मनात लपवलेले शब्द तुमच्या समोर घेऊन आलोय ते या नव्या कथेच्या स्वरुपात..! "पुर्ण होईल अशी ईच्छा" ही शिंपल्यातले मोती या कथासंग्रहातील पहिली कथा, तसं "पुर्ण होईल अशी ईच्छा..!" यानावावरुन कित्येकांनी कथेत काय असु शकतं याचा अंदाज लावायला सुरुवात केली असेल, पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी कित्येकांचे अंदाज नक्कीच चुकतील. तशी ही कथा ८-मार्चला म्हणजेच जागतिक महिलादिनीच टाकायला हवी होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे उशीर झाला, असो, मुलगी, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सुन, सासु आणि अनंतकाळची माता अशा प्रत्येक भुमिकेला आयुष्यभर न्याय देणार्या स्त्रीवर्गाच्या कर्तृत्वाला सलाम..! कथा बरीच मोठी आहे, म्हणुन या कथेचा मुख्य सारांश टाकतोय, तर जास्त शब्दांची ताणा-ताण न करता कथेलाच सुरुवात करतो..!
"आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी पुन्हा जर घडणार असतील तर मी पहिले त्यांचा शेवटच बदलुन टाकला असता गं..!" असं आपल्या पत्नीकडे बघुन म्हणतांना दिनेशच्या डोळ्यांत पाणी दाटुन आलं होतं. सोनोग्राफी सेंटरमध्ये ते आपला नंबर कधी येईल त्याची वाट बघत होते. दिनेशपेक्षा जास्त टेंशन आलं होतं ते मालतीला. तितक्यात त्यांच्या नाव पुकारलं आणि त्या दोघांना आत तपासणीसाठी बोलवलं, आत तपासणीसाठी जातांनाच मालतीचं मन काळजीच्या समुद्रात अखंड बुडुन गेलं, ती तिचा, दिनेश आणि त्यांच्या होणार्या बाळाचा विचार करु लागली.
दिनेश आणि मालती ह्या दोघांचा प्रेमविवाह झालेला होता, त्या दोघांचही रसायनशास्त्रात पदविकेपर्यंत शिक्षण पुर्ण झालेलं होतं. दोघं कॉलेजला असतांना एकमेकांच्या प्रेमात पडलेली होती. आपलं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर दिनेश आणि मालतीनं विवाह करायचा ठरवलं खरं पण त्यांच्या समोर मोठी अडचण होती ती म्हणजे "जात"..! दोघही वेगवेगळ्या जातीची होती, त्यामुळे घरच्यांकडुन कडाडुन विरोध होणार याची दोघांना कल्पना होती, पण तरीही दिनेशनं धाडसं करुन मालतीच्या घरी विचारलं, अपेक्षेप्रमाणे त्याला विरोध झालाच, "अरे वेडा झालास का? अरे कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या पोरीनं, शेजार्यांना कळलं तर, अगं नातेवाईक तर तोंडावर थुकतील माझ्या, आपला समाज वाळीत टाकेल आपल्या कुटुंबाला, हे असं थ्यारं करायचे म्हणुन कॉलेजात जायची का तु?" आणि असं बरंच काही मालतीच्या वडीलांनी दिनेशला सुनावलं होतं. आणि स्वतःच्या घरी जेव्हा दिनेशनं विचारलं तेव्हा तर जणु त्याच्या घरात अणुबॉंम्ब पडवा असा हाहाकार झाला. पण आईनं आपल्या लेकराच्या पंखात बळ दिलं, आणि मोठ्या मुश्किलीने दिनेशचे वडील त्या लग्नाला तयार झाले पण एक महाकठीण अट त्यांनी त्याला घातली होती. इकडे दिनेशशी लग्नाला नकार दिल्याने मालतीने अन्नपाण्याचा त्याग केला दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत होती, शेवटी तिचेही घरचे लग्नाला तयार झाले, आणि त्या दोघांचा तो आंतर-जातीय विवाह पार पडला.
चावडीवरुन गप्पा मारुन जेव्हा दिनेशचे वडील घरी परतायचे तेव्हा जमलेल्या बाकीचे वयस्करांसाठी खालच्या जातीतील पोरीशी गावच्या देशमुखाच्या पोरानं लग्न केलं हा कितीतरी दिवस चर्चेचा विषय ठरायचा. कित्येक जणांना मालती हडळ वाटायची, त्यांच्या मते तीनंच काहीतरी करणी करुन दिनेशला लग्न करायला भाग पाडलं असं वाटायचं या अशा गोष्टीमुळे समाज भ्रष्ट होऊल, गावावर देवीचा कोप होईल, गावात रोगराई पसरेल, दिनेशच्या ह्या कृत्याने गावातील बाकीची तरणी पोरं सुद्धा असंच काहीतरी करु शकतील अशी भिती त्यांना वाटायची, पण दिनेशच्या वडीलांसमोर असं त्यांना सांगायची हिम्मत होत नव्हती. त्याउलट एका खालच्या जातीच्या मुलीशी लग्न करुन समाजापुढे आदर्श ठेवला असं गावच्या काही शिकलेल्या तरुणांना वाटायचं म्हणुनच काय की त्यांना दिनेश एकदम पिक्चर मधला हिरोच वाटायला लागला. दिनेशच्या घरात हळुहळु मालती त्याच्या कुटुंबातील एक एक सदस्याचा विश्वास जिंकत होती. आपल्या सासुबाईंची तर ती लाडकी सुन बनुन गेली, आपल्या लेकाच्या बरोबरीनं शिक्षण घेतलेल्या मुलीला सगळं घरकाम येतं, हा सासुबाईंसाठी मोठा कौतुकाचा विषय असायचा. मालतीसुद्धा हळुहळु आपल्या संसारात रमत होती, आणि अशातच एकदिवस आपल्या संसारात नवीन पावलांच आगमन होईल हे जेव्हा तिला कळालं तेव्हा तर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
आपण बाप होणार आहोत हे जेव्हा दिनेशला कळलं त्यावेळी त्यालाही तितकाच आनंद झाला, पण फार काळ त्याचा तो आनंद टिकला नाही, त्याला कारण होतं त्याच्या वडीलांनी घातलेली लग्नापुर्वीची अट..! दिनेशने जेव्हा त्याच्या घरी आपण मालतीशी लग्न करणार असं सांगितलं त्यावेळी त्याच्या वडीलांनी जणु जमदग्नीचाच अवतार धारण केला असं वाटायला लागला. "आबा, लहानपणा पासुन मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, कधी कुठलाच हट्ट केला नाही, आजपर्यंत कधी तुमचा शब्द खाली पडु दिला नाही. आबा आज तुमच्याजवळ तुम्हाला जमेल आणि माझी पुर्ण होईल अशीच ईच्छा मागतोय ना आबा, आनंदानं द्या संमती माझ्या लग्नाला, आबा ही पहिली आणि शेवटचीच पुर्ण होईल ना माझी ईच्छा?" असं म्हणुन दिनेश खुप रडला होता. त्यावेळी दिनेशच्या वडीलांनी त्याला सांगितलं, "पोरा, मला उभ्या आयुष्यात वाटलं नव्हतं तु असं काही करशील, तुझ्या हातुन जे काही घडलं त्यातुन खुप दुखावलोयं मी, पण तुशी ईच्छा जरुर पुर्ण होईल, मी तुझ्या लग्नाला होकार देईल पण एका अटीवरच, आपल्या घराण्याची परंपरा आहे, आजपर्यंत या घरातल्या ज्यांची लग्न झाली, त्या सगळ्यांना लग्नानंतर पहिला मुलगाच झाला. तु तुझी ईच्छा म्हणुन खुशाल त्या पोरीशी लग्न कर, पण जर लग्नानंतर तिला पहिला मुलगा झाला नाही तर मी तुझं दुसरं लग्न लावुन देईल, आणि ही माझी पुर्ण होईल अशी ईच्छा आहे, बोल कबुल आहे का अट?" अशा या वडीलांच्या घातलेल्या अटीला दिनेशने त्यावेळी होकार दिला होता, पण आता त्याला त्या अटीमुळे अस्वस्थता जाणवत असे, जर आपल्याला मुलगी झाली तर मालतीचं काय होईल? आपल्या बाळाचं काय होईल याविचारानं आपल्याला वेड लागेल असं त्याला वाटायचं. एकदिवस त्याने धीर करुन मालतीला हा प्रकार सांगितला.
पायाखालची जमिनच निघुन जावी असा धक्का मालतीला बसला, सासर्यांनी घातलेल्या अटीत सगळ्यांत जास्त तीचीच फरफट होणार होती. या सागळ्यामुळे ती दुःखी झाली, सासुबाईंना मालतीच्या दुःखाचं कारण माहिती होतं, त्यांनी तिला आईप्रमाणे धीर दिला, सगळं काही ठिक होईल," देवं इतकी परिक्षा नाही बघणार तुझी लेकरा, त्या विधात्यावर विश्वास ठेव..!" असं त्या तिला म्हणायच्या. दिवसांमागुन दिवस जात होते, तसं तसं मालती आणि दिनेशची काळजी वाढतच होती. एकदिवस रात्री दिनेश मालतीला म्हणाला, "मालती तुला आठवतोयं का गं आपल्या कॉलेजचा पहिला थिम डे? त्यावेळी आपण ते वंशाची पणती हे पथनाट्य सादर केलं होतं ते?" दिनेशच्या त्या प्रश्नानं मालतीच्या चेहर्यावर वेगळीच लाली आली, "अरे चांगलाच आठवतोयं ना, त्या पथनाट्यात आपल्याला पहिली मुलगी झालीयं आणि आपण तिच्या जन्मामुळे खुप खुष आहोत असं दाखवलेलं होतं, आणि त्या नाटकानंतर नेहमी मला वाटायचं की मला पहिली मुलगीच व्हावी ते..!" "अगं मला तर अजुनही असंच वाटतं की आपल्याला मुलगीच व्हावी, कॉलेजमध्ये असतांना स्त्रीभ्रुण हत्या थांबवण्यासाठी कितीतरी जनजागृती करणारे उपक्रम आपण राबवले, मुलगा आणि मुलीत भेदभाव करायचा पटत नाही मला, किती कमनशीबी आहे मी, हीच गोष्ट स्वतःच्या जन्मदात्याला पटवुन देऊ शकत नाही, मालती, मी देवाला रोज प्रार्थना करतो की मला मुलगीच हवी," असं दिनेश मालतीला म्हणाला. "तुझं म्हणनं खरं व्हावं रे, चल झोप आता, उद्या आपल्याला सोनोग्राफीला जायचं आहे ना..!" असं मालती त्याला बोलली.
सोनोग्राफीची तपासणी करुन झाल्यानंतर मालती आणि दिनेश यांचा चेहर्यावरचा आनंद ओसांडुन वाहात होता, आनंदाने ते घरी आले, घरी फक्त मालती आणि बाळाची तब्येत चांगली आहे असंच सांगितलं, आणि योगा-योगाने ८-मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मालतीची डिलीव्हरी झाली, तिला मुलगा-मुलगी अशा जुळ्यांची माता बनायचं सौभाग्य मिळालं, दिनेश मालती जवळ गेला, आपल्या दोन्ही मुलांकडे त्याने बघितलं, आणि म्हणाला खरंच आबा आणि आपण पुर्ण होईल अशीच ईच्छा मागितली नाही का? असं म्हणतांना त्याला आनंदाश्रु आवरणं कठीण गेलं. आपल्याला पहिला मुलगा झाला म्हणुन दिनेशचे वडीलपण खुष झाले होते, आपल्या नातवंडाकडे बघुन त्याचा चेहरा फुलला होता, दिनेशकडे बघताच त्यांनी माफी मागायला हात जोडले, पण दिनेशने त्यांना सावरलं, "आबा, माझी काय माफी मागतायं, उलट देवाचे आभार माना की ज्याच्यामुळे तुमचीच काय, पण माझीही ईच्छा पुर्ण झाली."
सासरे बाहेर गेल्यानंतर मालती दिनेशला म्हणाली, "त्या दिवशी तु बोलला की आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी पुन्हा जर घडणार असतील तर मी पहिले त्यांचा शेवटच बदलुन टाकला असता, जर ही गोष्ट पुन्हा घडणार असेल तर दिनेश तुला या गोष्टीचा शेवट कसा अपेक्षित होता रे?" मालतीचा तो प्रश्न ऐकुन दिनेश क्षणभर तिच्याकडे बघुन हसला आणि बोलला, "मालती तुला ठाऊक आहे मला कसा शेवट हवा होता ते, पण असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नाही का? आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट आपल्याला लिहिता येत नाही ते योग्यंच आहे..!" दिनेशच्या त्या उत्तराने मालती सुखावली. ईच्छा तर प्रत्येकाच्या असतात, स्वप्न प्रत्येकजण बघतो, पण फार थोडेच जण त्या स्वप्नांत रंग भरण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्याच ईच्छा पुर्ण होतात. म्हणातात ना ईच्छा असेल तर मार्ग दिसेल, म्हणुन ईच्छा असु द्या, पण त्या पुर्ण करायचा प्रयत्न करायचं सोडु नका.
तर मित्रांनो, कसा काय वाटला "पुर्ण होईल अशी ईच्छा", या कथेचा सारांश? आशा करतो की तुम्हाला संपुर्ण कथा वाचायची ईच्छा नक्कीच झाली असणार, दिनेश आणि मालती कसे एकत्र आलेत? लग्नासाठी झालेला त्यांच्या घरच्यांचा विरोध, गावकर्यांकडुन होणारी मालतीची अवहेलना, सासर्यांच्या अजब अटीमुळे होणारा मनस्ताप, सासुबाईंची माया, हे सगळं वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ब्लॉग लिहितांना काही मर्यादा असतात, म्हणुन संपुर्ण कथा टाकली नाही त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, तुमचीच ईच्छा पुर्ण करण्यासाठी चला आता तुमची रजा घेतो. पुढच्यावेळी पुन्हा येईल नव्या विषयासह, मनात लपवेल्या आणखी काही शब्दांसह, तोपर्यंत प्रत्येकाची एकतरी ईच्छा पुर्ण होवो हीच परमेशवराचरणी प्रार्थना..! जय मराठी, जय महाराष्ट्र..!