Sunday, June 10, 2012

तो आणि त्याची ती..! १.९

                   "काय जोशी, यंदा ड्रामा जोरदार होणार असं दिसतयं?" असं त्यांच्या कॉलेजच्या सगळ्यांत विध्यार्थीप्रिय शिक्षिका असलेल्या पोद्दार मॅडम स्टुडंट्स कॉर्नरवर पोस्टर लावत असलेल्या हर्षितला बोलल्या. "होयं मॅडम, आम्ही खुप दिवसांपासुन या नाटकाची तयारी करतोय." असं हर्षित बोलला. "अरे वा, नाव तर खुप सुंदर आहे, "तो आणि त्याची ती"?, यावेळी पहिल्या रांगेत बसुन बघावं लागेल तुमचं नाटक..!" असं पोद्दार मॅडम बोलल्यावर हर्षित खुष झाला. दरम्यान तिथे कॉलेजच्या बर्‍याच मुला-मुलींची गर्दी जमली. प्रत्येक जण ते पोस्टर बघुन नाटकाची चर्चा करु लागला. तितक्यात लावण्या तिथं आली, "ऑल दि बेस्ट हर्षित फॉर युवर ड्रामा," असं ती हर्षितला बघुन बोलली. लावण्या पत्की हर्षितच्याच वर्गातच होती, पण ती दुसर्‍या बॅच मध्ये होती. तिला बघताच हर्षितला आश्चर्याचा अनपेक्षित असा सुखद धक्का बसला. हर्षित वर्गात ऑफ लेक्चरला नेहमी कविता वैगेरे सादर करायचा. त्यांच्या कॉलेजचा तो एकुलता एक कवी, नाटककार आणि लेखक होता. त्याच्या प्रेमकविता वर्गात सगळ्यांना आवडायच्या, लावण्याला सोडुन. त्याला कारणही होतं, एकदा हर्षितनं फ्रेशर्स पार्टीत एक कविता म्हंटली होती, "अशी असावी माझी प्रेयसी..!" त्यातलं त्या प्रेयसीचं वर्णन लावण्या सारखंच होतं. त्यामुळे तीला ते आवडलं नव्हतं. एरवी कॉलेजमध्ये लावण्याला फारसं कोणी ओळखतं नव्हतं, पण हर्षितच्या त्या कवितेमुळं ती त्यादिवसापासुन कॉलेजमध्ये एकदम फेमस बनुन गेली. हर्षितनं मुद्दाम तसं केलं असा तिचा समज झाला, म्हणुन ती त्याचा राग करायची. तो समोर असला की ती खुप संतापलेली वाटायची. हर्षितला तिच्याशी काही घेणं देणं नव्हतं, तो त्याच्या कविता करण्यात मस्त असायचा. पण आज अचानक लावण्या त्याच्याशी स्वतः बोलल्यावर तो दंग झाला. तिच्याकडे बघुन तो नुसताच हसला, आणि तिथुन निघुन गेला.
              "अरे बाप, आज कांड झाला ना यार...!" असं हर्षित धावत धावत बोलला. आपल्या ग्रुप जवळ आल्यावर तो जोर जोरात हसायला लागला. "अरे काय झालं रे? कोणाला प्रपोझ करुन आलास की काय?" असं सोहम त्याला बोलाला. "अरे नाही रे, ती मिस. इगो लावण्या पत्की चक्क बोलली ना राव आपल्याशी, ऑल दि बेस्ट दिलं ड्रामासाठी." हर्षित एकदम खुष होऊन सांगत होता. "अरे बापरे, हा चमत्कार कसा घडला? निवडुंगाचा गुलाब कसा झाला?" असं रितेशनं त्याला विचारलं. "रितेश, हर्षित कसे आहात रे तुम्ही, मुलींना काय काय नावं ठेवतात, मिस. इगो काय, निवडुंग काय?" असं म्हणतं तेजालीनं तिची नाराजी दर्शवली. "जाऊ दे गं, काय झालं हर्षित सांगशिल का?" असं चैताली तेजालीला शांत करत बोलली. "अगं मी नाटकाची पोस्टर्स लावत होतो, बरेच मुल-मुली बघतं होते, तितक्यात अचानक माघुन "ऑल दि बेस्ट हर्षित" असा आवाज आला, माघे वळुन बघतो तर काय लावण्या उभी, आपली तर बोलतीच बंद झाली ना..! तिच्याकडे बघुन नुसताच हसलो, आणि इकडे निघुन आलो." असं हर्षित बोलला. "याला म्हणतात, "मुलगी स्वतः आली दारा, आणि हा म्हणतो मी एकटा सदाशिवच बरा." सोहमने आपल्या नेहमीच्या स्टाईलनं त्याला उपरोधिक टोला मारला. हर्षित सोहमकडे उदास चेहरा करुन बघायला लागला. "अरे असा काय बघतो माझ्याकडे, यार इतकं चांगलं ती ऑल दि बेस्ट करतं होती, तु काहीतरी बोलायचं ना, ऍटलिस्ट तिला आमचा ड्रामा बघायला नक्की ये असं तरी आमंत्रण द्यायचं. आपल्या नाटकातला एखादा डायलॉग सांगायचा, बात करनेसे बात बनती है बॉस..!" असं सोहम हर्षितला बोलला. 
               "अरे कोणत्या टॉपिकवर बोलताय तुम्ही?" असं माघुन आलेला अर्जुन बोलला. तितक्यात "अरे हर्षित, बॅडमिंटन मिक्स डबल्सला नाव देतोयं का? लावण्याने तुला विचारायला लावलं होतं." असं ध्रुव बोलला. "देवा, इतका आनंद एकाच वेळी देऊ नकोस रे, सवय नाही मला, हर्षितला खरंच हर्षवायु होऊन जाईल रे." असं हर्षित बोलला. "नशीबं फळफळलयं रे." असं नचिकेत बोलला. "गुडलक हर्षित, तुझ्या नाटकाची जादु आत्तापासुन दिसायला लागलीए बरं का..!" असं शामली बोलली. "अरे असं नका करु रे, मला कसंतरी वाटतयं.!" असं हर्षित बोलला. "अरे तु चल माझ्याबरोबर, काही टेंशन घेऊ नकोस." असं म्हणत सोहम हर्षितला घेऊन गेला. ते दोघं गेल्यानंतर बाकीच्या ग्रुपने काय झालं ते अर्जुन आणि ध्रुवला सांगितलं. "चला तो सुरुवात तर करतोय, एकवेळ माझं काही झालं नाही तरी चालेल, पण हर्षितला नक्कीच एका गर्लफ्रेंडची नितांत गरज आहे." असं अर्जुन बोलला. "ओय, काहीतरी काय बोलतोय, स्वरालीला सांगु का अर्जुन..?" असं तेजालीनं अर्जुनला चिडवलं. आणि ते सगळे लेक्चरला गेले.
कॉलेज सुटल्यावर हर्षित अर्जुनच्या बरोबर निघाला. "अर्जुन, मला कधी कधी वाटतं, मला कुणीतरी हवीएं माझ्यावर प्रेम करणारी, माझी काळजी करणारी, माझ्या कविता ऐकतांना माझ्या डोळ्यांतच बघत राहणारी, कविता संपल्यानंतर "व्वा हर्षित" अशी मनमोकळी दाद देणारी, जीच्यावर मला कविताच सुचत राहतील अशी, जी माझ्या कवितांना तीची लाडकी सवत मानणारी, एकांतात माझी आठवण काढणारी, मी परफेक्ट नाहीए असं माहिती असुनही मला नेहमी साथ देणारी. पण कधी कधी वाटतं, आपल्याला गर्लफ्रेंड नाहीए ते बरचं आहे. कविता करणं, लेखनं करणं हे माझ्या आयुष्याचं नुसतं पॅशनच नसुन श्वसन आहे, आणि कुणासाठी मी माझ्या श्वसनाकडे दुर्लक्ष करावं का? तिच्या नादात माझं कविता करनं खंटुन गेलं तर? मला काय हवयं ते नक्की काही सुचत नाही. वर्गात जेव्हा मी प्रेमकविता म्हणायचो, त्यावेळी किती जणांना वाटायचं की मी नक्कीच कुणाच्या तरी प्रेमात पडलेलो असेल. पण अर्जुन प्रेमावर कविता करण्यासाठी प्रेमात पडणंच गरजेचं असतं का रे? प्रेमाची जाण असणं इतकं क्वॉलिफिकेशन पुरेसं नसतं का? इतरांना आवडणार्‍या माझ्या कविता, कधी कधी मलाच अपुर्ण वाटतात असं का होतं असावं याचाच मी विचार करतो रे.!" हर्षित असं बोलुन शांत झाला. 
                  "मलाही खरचं कुठं काही कळतयं का वेड्या, अरे हल्ली तर मला माझंच भान रहात नाही, ऐरवी मी स्वतःच्या विश्वात रमणारा, पण या विश्वात आता स्वरालीपण जोडली गेलीए असं वाटतं, तुला हसु येईल कदाचित, पण आयुष्यात तिचा विचार मी जितका करतोय ना, तितका कधी स्वतःचाही केला असेल असं वाटतं नाही. हल्ली देव माझ्यावर रुसलेला वाटतो, कारण त्याच्यापेक्षा मी स्वरालीचं जास्त नाव घेतो. अर्जुन राजपुत चांगला मुलगा बनु शकतो, चांगला भाऊ बनु शकतो, चांगला मित्र बनु शकतो, चांगला पती बनु शकतो, चांगला पिता बनु शकतो, पण चांगला प्रियकर बनु शकतो का? या प्रश्नाचं उत्तर मला सापडतं नाही. म्हणुन कदाचित स्वरालीवर मी प्रेम करतो हे तिला कधी सांगुही शकेल का असा प्रश्न मला पडतो, एक प्रेयसी नसली तरी निदान एक चांगली मैत्रिण म्हणुन तीची साथ आयुष्यभरासाठी मला पाहिजे रे. मला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे, पण मी तिला आवडतो की नाही हेच माहिती नाही, आणि तिला माझ्याबद्दल म्हंटल तर काहीच माहिती नाही, पण तिला दरवेळी जाणवतं की ती मला आवडते, हाच तर असेल खर्‍या प्रेमाचा अनुभव नाही का? असं अर्जुन बोलला. 
"आपण दोघंही एकाच समुद्रात, एकाच नावेतनं प्रवास करतोय असं वाटतयं, पण आपल्याला किनारा मिळेल का याबद्दल शंकाच आहे." असं हर्षित बोलला. "आपल्या नावेला किनारा मिळेल का ते माहित नाही, पण शंकरनानाची चहाची टपरी जरुर लागली आहे रस्त्यानं जातांना, चल तिथे जाऊ..!" असं अर्जुन बोलला, आणि ते चहा पिण्यासाठी निघुन गेले. घरी आल्यावर अर्जुनने क्षणभर विश्रांती घेतली. सायंकाळी रेडिओवर लागणारा सांजरंग नावाचा कार्यक्रम तो ऐकत बसला. टि.व्ही तो फक्त बातम्यांसाठी, बॉक्सिंगच्या मॅचसाठी आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच असेल तेव्हाच बघायचा. ऐरवी त्याचा रेडिओ, दरमहिन्याला सार्वजनिक वाचनालयातुन आणलेली पुस्तकं जिंदाबाद असायची. वि.स. खांडेकर, विं.दा.करंदीकर, विनायक  दामोदर सावरकर, विश्वास पाटील, रणजीत देसाई, कवी ग्रेस यांची पुस्तकं वाचायला त्याला आवडायचं. थोडावेळानं त्याच्या घरी स्वराली आली. "अर्जुन, आजचं प्रॅक्टिकल एकदम सोप्प गेलं." असं म्हणतं स्वराली तिच्या प्रॅक्टिकलची गंम्मत त्याला सांगु लागली. तो नुसता तिच्याकडे बघतच राहिला, तीचं बोलणं असंच सुरु रहावं असं त्याला वाटतं होतं. "अरे असं काय बघतोय, झोप लागली का तुला? केव्हाची मीच बोलतेयं, आणि तु काहीच बोलतं नाहीसं?" असा प्रश्न तिनं त्याला केला. "काही नाही गं स्वराली, हर्षितचा विचार करत होतो. हल्ली तो प्रेमाच्या बाबतीत खुप सिरियस झालायं.." असं अर्जुन बोलला.
                "सिरियस का झालायं?" असं स्वरालीनं त्याला विचारलं, "जाऊदे तुला नाही कळणारं त्यातलं," असं अर्जुन तिला बोलला. "असं कसं, मी काय छोटी मुलगी आहे का?" असं स्वरालीनं त्याला सवाल केला. "अगं तु छोटी नाहीस, पण सांगेन तुला कधीतरी, बरं काल तु तुझ्या आई-बाबांना माझ्या फाईटची नक्कल करुन दाखवलीस, असं काका सांगत होते, जरा मला पण करुन दाखवं ना, मी कसा फाईट करतो ते?" असं अर्जुन बोलला. "छे काहीतरीच काय, मला थोडीच फाईट करता येते, मला तर चित्रं काढता येतात." असं म्हणतं स्वराली तिथुन जाऊ लागली. "ऐ स्वराली, कधी तुझी चित्रं दाखवशील ना मला." असं अर्जुन तिला बोलला. "हो, नक्की दाखवेल ना, ये तुला वेळ असेल तेव्हा..!" असं म्हणतांना ती खुष झाली. रात्री मग नेहमीप्रमाणे पुन्हा सगळा ग्रुप जमुन नाटकाची प्रॅक्टिस करु लागला. पण हर्षितचं प्रॅक्टिसमध्ये लक्ष नव्हतं. "ओ डायरेक्टर, लावण्याचा विचार करतायं का? तीनं याला ऑल दि बेस्ट काय केलं, बॅडमिंटनचा पार्टनर बनशील का वि़चारलं, भाई तर एकदम हिट विकेट झाला म्हणायचं तर..!" असं रितेश बोलला. "अरे हर्षित, इतका विचार नको करु, आपलं एक वाक्य सांगतो लक्षात ठेव, "आपण नेहमी आपला विचार करायचा, मग दुसरे पण आपला विचार करायला शिकतात" असं नचिकेत बोलला. "उद्या तु तिला एकदाच काय ते विचारुन टाक, डोक्याची कटकट मिटेल तुझी. तिला विचार बिनधास्त की तिला अचानक असं काय झालं, की तिला तुझ्याशी बोलावसं वाटलं, जमतयं का बघ नाहीतर तिला जय महाराष्ट्र करुन मोकळा हो." असं सोहम बोलला. "त्याला नका रे त्रास देऊ, आप-आपले संवाद पाठ करा." असं अर्जुनने सगळ्यांना समजावलं. थोडावेळ झाला नसेल तोच रितेशच्या मोबाईलवर तेजालीचा कॉल आला, "अरे रितेश हर्षित आहे का रे तुमच्यासोबत, लावण्याला त्याच्याशी बोलायचं आहे रे." असं तेजाली बोलली. "हो हो तो इथंच आहे, ओ हर्षित भाऊ, लावण्याचा फोन आहे, हितगुज करायचा विचार आहे वाटतं." असं रितेश बोलल्यावर हर्षितचा चेहरा खुलला. "हॅलो, हर्षित बोलतोयं," असं जेव्हा तो बोलला त्यावेळी सगळे जणं हसायला लागले, आणि तो लाजतच अर्जुनच्या घराच्या मागच्या बाजुला गेला. पंधरा मिनिटांनी तो परत आला त्यावेळी तो खुप खुष आहे, असं त्याचा चेहरा सांगत होता. "अरे आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी प्रपोझ केलं ना यार मला." असं म्हणतांना हर्षित जाम खुष झाला. 
            "भाई पार्टी." असं सगळे एकसुरात ओरडले. "कसं प्रपोझ केलं रे प्रेमकवी तुला?" असं ध्रुव बोलला. "सांगेन रे, पण आत्ता नाही, आपल्या ड्रामाच्या दिवशी..!" असं म्हणत हर्षितनं बाकीच्यांची उत्सुकता लांबणीवर टाकली. "आपलं मुलांच किती मस्त असतं ना, एखादी मुलगी जेव्हा तिच्या मैत्रिणींना सांगते ती प्रेमात पडलीए, त्यावेळी त्यासगळ्या त्या मुलाची नीट चौकशी करतात, कसा दिसतो, किती उंच आहे, गोरा आहे की सावळा, घरदार कसं आहे, कोणत्या कास्टचा आहे, बॅंक बॅलंस कसा आहे, सोडुन तर नाही जाणार वैगेरे वैगेरे, पण आपलं एकचं असतं, कोणी म्हंटला की मी प्रेमात पडलोय, लगेच "भाई पार्टी, भाई पार्टी.." असं सोहम बोलल्यावर सगळे हसायला लागले. "म्हणुन मी नेहमी म्हणतो ना, डोकं वापरुन कुणाला आकर्षित करणं म्हणजेच प्रेम. दिल का काम सिर्फ खुदके लिये धडकनेका, दुसरों के लिये धडकने लगा तो साला जियेंगे कैसे?" असं सोहम बोलला. "मी काय म्हणतोय, आपण उद्याच जाऊ ना डॅमवर, २६ जानेवारीला फुल्ल प्रॅक्टिस करु?" असं ध्रुव बोलला. "हो, उद्याच जाऊया, नाहीतरी २७ जानेवारीला आपला ड्रामा असेल, २६ तारखेला गेलं तर नाटकाची मुलींबरोबर नीट प्रॅक्टिस करायची राहुन जाईल. त्यापेक्षा उद्या जाऊया सकाळी मस्तपैकी. दुपारपर्यंत येऊ कॉलेजला." असं रितेश बोलला. "चालेल ठरलं तर, उद्या सातला निघुया आपणं..!" असं हर्षित बोलला आणि ते नंतर घरी परतले. 
"अर्जुन तु वेडा झालायं का, स्वरालीसमोर आज असा अचानक प्रेमाचा विषयं का काढला? ती काय विचार करेल, जरी तिच्या आई-बाबांच लव्ह मॅरेज झालं होतं तरी तिला खरंच यातलं काही कळतं असेल असं मला नाही वाटतं. आजीच्या गोष्टींत रमणारी ती, तिला प्रेम काय असतं ते उमजेल का या कोवळ्या वयात..? परत तिच्यासमोर असं काही करु नकोस.."असं अर्जुन स्वतःलाच समजवतांना झोपी गेला. "आज अर्जुनने मला प्रेमाबद्दल का सांगितलं असावं, मी काय छोटी मुलगी आहे का असं म्हंटल्यावर एकवेळ मला वाटलं, की त्याला शब्द तर सुचलेत, पण ते ओठांतुन बाहेरच पडले नाहीत, जणु फुल उमलण्याची वाट बघत असलेल्या झाडाची कळीच कुणीतरी तोडली असं वाटलं. त्याला का काही सांगावसं वाटलं नाही कोण जाणे. माझे चित्रं त्याला दाखवील त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावर कसे भाव असतील याची उत्सुकता मनाला लागलीए. अगदी पहिल्या पावसाची आतुरतेनं वाट बघणार्‍या चातकासारखं मन वाट बघतयं, कधी तुला माझी चित्र दाखवील अर्जुन." असं विचार स्वरालीच्या मनात अभ्यास करतांना येत होता. रात्र खुप झाली होती, ती बिचारी त्या स्टडी टेबलवरच झोपुन गेली. तिच्या स्वप्नात तिला आजी दिसली, तिची आजीनं नेहमी सारखं तिचं डोक आपल्या मांडीवर घेतलं, आपल्या हातांनी तिला कुरवाळत आजी तिला आवडणारी राजकुमाराची गोष्ट सांगु लागली. गोष्ट झाल्यानंतर आजीनं विचारलं, "आवडली का गोष्ट आमच्या बाहुलीला?" स्वराली नुसतीच हसली. 
              तिचे डोळे झाकत आजी बोलली, आज आजीनं आमच्या बाहुलीचा राजकुमार पण आणलायं बरोबर, बघायचायं का आमच्या बाहुलीला? असं आजीने विचारल्यावर स्वरालीनं आजीचे हात बाजुला केले, तिला तिचा राजकुमार दिसणार तोच, "स्वरा बेटा, अगं अभ्यास करता करताच झोपली का तु? उठ बेटा, कॉटवर झोपुन घे. शहाणी माझी बाहुली ती." असं म्हणुन आईनं स्वप्न बघत असलेल्या स्वरालीला त्या स्वप्नातुन जागं केलं. "काय गं आई, झोपमोड केलीस तु.." असं नाराज होऊन स्वराली बोलली. "बेटा, टेबलवर अभ्यास करतांना तुला झोप लागली, रात्रभर अशीच असती तर सकाळी तुझी पाठ दुखली असती ना..!" असं म्हणतं आईनं तिला उठवलं. आणि पलंगावर झोपायला सांगितलं, स्वराली झोपली खरी, पण तिला ते स्वप्न परत पडलचं नाही, तिला आवडणारा तो गोष्टीतला राजकुमार दिसलाच नाही. 

No comments:

Post a Comment