Sunday, December 23, 2012

"तो आणि त्याची ती..! १.१८

                  सकाळी अर्जुन जेव्हा कॉलेजला जायला निघाला त्यावेळीही त्याच्या डोक्यात तोच विचार सुरु होता. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यानं तेजालीला याबद्दल सांगितलं. "अरे अर्जुन, कशाला तसा विचार करतोय तु? तुझ्या आयुष्यात असं काही घडणारच नाही रे, खर्‍या प्रेमासमोर तर प्रसंगी देवालाही झुकावं लागतं, तु फक्त याचा विचार कर की तुला स्वरालीसोबत जास्तीत जास्त कसा वेळ घालवता येईल. मी जर मुलगा असते ना, तर कधीच स्वरालीला प्रपोझ करुन मोकळीही झाले असते, तिच्यासारखी मुलगी तुला शोधुनही सापडणार नाही अर्जुन, तुला समजतयंना मला काय म्हणायचं आहे ते?" असं तेजाली बोलल्यावर अर्जुनला जरा हायसं वाटलं. थोड्यावेळानं तिथे हर्षित आला, त्याच्या चेहरा उदास दिसत होता. "काय रे काय झालं?" असं अर्जुनने त्याला विचारलं, "भांडण झालं रे लावण्याबरोबर." असं म्हणतांना हर्षितचा चेहरा केवीलवाणा वाटत होता. "अरे हर्षित, भांडण झालं तरी कशावरुन सांगशील का?" असं तेजाली बोलली. "अगं, काल आम्ही फोनवर बोलत होतो, तितक्यात आईनं आवाज दिला म्हणुन मी लावण्याला पटकन बाय म्हणत फोन ठेवला, नंतर परत फोन केला तर ती मला बोलली, "काय रे, दुसर्‍या गर्लफ्रेंडसोबत बोलत होतास का?" ती असं बोलली आणि मी मुद्दाम तिला चिडवण्यासाठी बोललो की मला जर दुसरी गर्लफ्रेंड असती तर तुझ्याशी बोलायला वेळ तरी असता का? बस्स यावरुन आमचं भांडण झालं, मी रात्रभर जागुन तिला किती मेसेज करुन सॉरी बोललो, तरी तीनं एका मेसेजलाही रिप्लाय केला नाही रे," असं हर्षित बोलला.
                          हर्षित असं बोलत असतांना त्याच्यामाघे लावण्या उभी होती हे त्याच्या लक्षातच आलं नव्हतं, हर्षितचं बोलणं झाल्यावर ती बोलली, "वेड्या तुला भांडता तरी येतं का?" लावण्याचा आवाज ऐकुन हर्षितनं माघे वळुन बघितलं, आणि कान पकडतच तो तिला सॉरी म्हणायला लागला. "अरे हर्षित, मीच तुला सॉरी म्हणायला हवं रे, मी तुला तसं बोलायला नको होतं रे, उलट माझीच चुकी असतांना देखील तु रात्रभर मला मेसेज करत होता, आय एम सॉरी हर्षु, अरे मरणापुर्वीच मी जणु सरणावर जळते रे जेव्हा तुझ्याशी असा अबोला धरते..! " असं लावण्या एकदम प्रेमानं बोलली, आणि हर्षितचा चेहरा आनंदानं फुलला. "चला भांडण मिटलं तर तुमचं एकदाच," असं तेजाली बोलली, आणि मग ते सगळे हसायला लागले.
                      कॉलेज सुटल्यानंतर लावण्या आणि हर्षित दोघंही घराकडे निघाले, पण दोघंही शांतच होते. शेवटी न रहावुन लावण्याच बोलली, "काय रे हर्षित, काय झालयं तुला? असा गप्प गप्प का आहेस? काहीतरी बोल ना.!" हर्षितनं तिच्याकडे बघितलं, आणि शांतपणे बोलला, "हे लावण्या, तुला एक सांगु?" लावण्याने मानेनच होकार दिला, हर्षित काय सांगतोय हे ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले होते. "लावण्या, लग्नापुर्वी होणारी धर्मपत्नी नेहमीच आपल्या गर्लफ्रेंडपेक्षाही जास्त प्रेम आणि काळजी करते नाही कां गं?, आणि लग्न झाल्यानंतर आपलं कर्तव्य असतं की आपणही तिच्यावर तितकच निस्वार्थ प्रेम करावं, कारण या जगात आपल्यावर प्रेम करणारी माणसं फार थोडीच असतात नाही ना?" असं म्हणुन हर्षितनं तिच्याकडे बघितलं. हर्षितनं तिच्याकडे बघितल्यावर लावण्या मनापासुन हसायला लागली, तिला हसतांना बघितल्यावर हर्षितलाही हसु आवरणं कठीण गेलं, हसता हसताच तो बोलला, "हे लावण्या मला वाटलं, तु म्हणशील, मी कसलाही विचार करतो, पण तुला तर चक्क हसु आलं?" लावण्याने त्याच्याकडे बघितलं आणि बोलली, "कसं जमतं रे हर्षित, तुला इतकं छान छान विचार करायला, असं छान वाक्य सुचणं?" हर्षितला काय उत्तर द्याव सुचलच नाही, तो नुसताच तिच्याकडे एकटक बघत राहिला. त्याला असं बघुन शेवटी लावण्याच बोलली, "ज्याच मन चांगल असतं, त्याचे विचार आणि वाणी देखील तितकीच चांगली असते हो ना?" हर्षितनं होकारार्थी मान डोलावली.
                      घरी स्वरालीनं अभ्यास झाल्यानंतर अर्जुनला वाढदिवशी काय सरप्राईज द्यायचं याचा विचार ती करु लागली, आणि थोड्यावेळानं तिला भन्नाट कल्पना सुचली, दुसर्‍या दिवशी तीनं तिचा पेपर झाल्यानंतर तेजालीला फोन केला आणि त्याबद्दल सांगितलं. तेजालीला स्वरालीची कल्पना खुप आवडली, आणि तीनं स्वरालीचं कौतुकही केल. तेजालीनं मग रितेश आणि बाकी सगळ्यांना स्वरालीच्या कल्पना सांगितली. "स्वरालीच ख्ररी अर्जुनची बेस्ट फ्रेंड आहे असं वाटतं नाही, आपल्याला का नाही सुचत अर्जुन आणि स्वराली सारखं विचार करायला? अरे आम्ही इतक्या वर्षांपासुन एकमेकांसोबत आहोत, पण इतक्या रोमॅंटिक कल्पना कधी मनात डोकावल्याच नाहीत रे," असं तेजाली स्वरालीच्या कल्पने बद्दल बोलली. मग ठरल्याप्रमाणे सगळे जण आप आपल्या तयारीला लागले.
                        अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच स्वरालीचा पेपर होता, तरी अभ्यास करुन तीनं अर्जुनचा वाढदिवस खास करायचाच याचा निर्धार केला होता. इकडे हर्षितनं आरामशीर अर्जुनच्या घराची एक चावी मिळवली, आणि त्याला त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपल्या घरी बोलावुन घेतलं, अर्जुन त्या दिवशी हर्षितच्या घरी राहिला, आणि दुसर्‍या दिवशी तसाच त्याच्या सोबत कॉलेजला आला. पण आज कॉलेजमध्ये त्यांच्या ग्रुपमधलं त्याला आणि हर्षितला सोडुन कुणीच आलं नव्हतं, कॉलेज सुटल्यावरही हर्षितनं बहाणा करुन बराच वेळ अर्जुनला घरी जाण्यापासुन रोखुन ठेवलं होतं, मग शेवटी तो अर्जुन घरी पोहचायच्या आधी तो त्याच्या घरी पोहचुन गेला, इकडे स्वराली आणि बाकीच्या ग्रुपनं सगळी तयारी पुर्ण करुन ठेवली आणि ते सगळे अर्जुनची वाट बघत होते, दरम्यान अर्जुनचे मामा मामी देखील तिथे आले, स्वरालीनंही तिच्या आई-बाबांना बोलवलं होतं.

No comments:

Post a Comment