अर्जुन घराकडे आला, लांबुनच त्याला त्याच्या घरात उजेड बघुन त्याला आश्चर्य वाटलं, त्यामुळे त्याची पावलं घराच्या दिशेनं पटापट पडायला लागली. घराजवळ आल्यावर त्याच्या दारावर असलेलं ते तोरणं, अंगणात काढलेली आकर्षक रांगोळी, दरवाजात लावलेल्या पणत्या बघुन तो सुखावुन गेला, आनंदानं तो घरात आला आणि समोर बघुन अवाकच झाला. त्याचं सगळं घर फुलांनी, स्वरालीच्या चित्रांनी खुप सुंदरपणे सजवलेलं होतं, त्याचे मामा-मामी, स्वरालीचे आई-बाबा आणि त्याच्या सगळ्या ग्रुपला बघुन त्याला खुप आनंद झाला. अर्जुनच्या सर्व मित्रांनी आप-आपले बालपणाच्या फोटोंचे खास मास्क तयार केले होते, अर्जुनला बघताच सगळ्यांनी मोठ्या जल्लोषानं एकासुरात "हॅपी बर्थ डे टु यु, हॅपी बर्थ डे टु यु, हॅपी बर्थ डे डियर अर्जुन, हॅपी बर्थ डे टु यु.." असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या. अर्जुनचे डोळे आनंदाश्रुंनी भरुन आले, त्याचा वाढदिवस याआधी कधीच इतक्या चांगल्या प्रकारे साजरा झाला नव्हता असं त्याला वाटु लागलं.
हे सगळं बघत असतांना त्याची नजर चहुकडे स्वरालीला शोधत होती, तितक्यात समोरुन स्वरालीला केक आणि औक्षणासाठी केललं ताट घेऊन येतांना बघितलं आणि अर्जुन खुप सुखावला. "अर्जुन, ही सगळं सरप्राईज तुला देण्याची आयडिया स्वरालीची आहे बरं का..!" असं तेजाली बोलली, आणि अर्जुनने स्वरालीकडे बघितलं, नजरेनंच तो तिला जणु थॅंक्स म्हंटला. "अरे यांनी जर मदत केली नसती तर हे सगळं शक्यच झालं नसतं," असं स्वराली अर्जुनला बोलली. औक्षण झाल्यानंतर थोड्यावेळाने अर्जुनच्या घरी खान सर आले, त्यांना बघुन अर्जुनला खुप आनंद झाला. त्यांनी अर्जुनसाठी बॉक्सिंग ग्लोव्ह्ज आणले होते. अर्जुनचा बर्थ डे खुप चांगल्या प्रकारे साजरा झाला. रात्री ९.३० च्या सुमारास मग जमलेले घरी जाण्यास निघाले, पण हर्षित आणि रितेश आज अर्जुन सोबत थांबणार होते.
अर्जुन स्वराली जवळ गेला, "हे स्वराली, कसं काय सुचलं गं, आयुष्यातलं सगळ्यात उत्तम सरप्राईज होतं हे..!" असं अर्जुन तिच्या डोळ्यांत बघुन बोलला, त्याच्या चेहर्याकडे बघुन स्वरालीच्या चेहर्यावर समाधान झळकत होतं, "अर्जुन, मी तुला म्हंटलं नव्हतं का, १-जानेवारीला की यंदा आपल्याला एकमेकांसाठी वेळ देता येईल असा संकल्प कर, थोडा वेळ मी दिला आणि तुला खुष करण्यासाठी हे सगळं सुचलं, माझी चित्र तु केव्हा बघायला आला असतास त्यापेक्षा ही आज तुझ्या वाढदिवशीच तुला दाखवता आली मला, तु खुष आहेस ना अर्जुन?" असं स्वरालीनं त्याला विचारलं. "हो स्वराली, तुझ्या कडे एक गोष्ट मागु का?" असं अर्जुनने तिला विचारलं. स्वरालीनं त्याला हसुनच संमती दिली, आणि अर्जुन तिच्या चित्रांकडे बघत बोलला, ही सगळी चित्र अशीच राहु देशील का माझ्या घरात?" स्वरालीनं त्याच्याकडे बघितलं, आणि तीनं त्याला होकार दिला, आणि मग ती तिच्या घरी निघुन गेली.
घरी आल्यावर स्वराली अर्जुनचा विचार करत होती. इकडे हर्षित, रितेश आणि अर्जुन स्वरालीचे एक एक चित्र बारकाईनं बघत होती. रितेश आणि हर्षित तर तिच्या चित्रांची स्तुती करतांना थकत नव्हते आणि अर्जुन प्रत्येक चित्राचा अर्थ शोधण्यात गुंग झाला होता. "कवीच्या मनावर एखादी प्रेरणा आरुढ झाली की ती त्याच्याकडुन मग नेहमीच दर्जेदार कलाकृती निर्माण करवुन घेते, अगदी तसंच स्वरालीच्या चित्रांना बघतांना जाणवतं, अगदी बोलकी आणि मन गुंतवुन ठेवणारी आहेत ही सगळी चित्रं," असं हर्षित बोलला. "खरं आहे हर्षित, प्रत्येक चित्र काहीतरी सांगु बघतयं असं जाणवत मला पण," रितेशनं हर्षितच्या बोलण्याला दुजोरा दिला. तितक्यात अर्जुन हर्षितला बोलला, "हे तुला तो डायरी घ्यायच्या वेळचा किस्सा आठवतोयं का? आपल्याला स्वराली भेटली तो..?" हर्षित त्याला बोलला, "मग चांगलाच आठवतो ना, पण तुला का अचानक त्याची आठवण झाली रे?" अर्जुन त्यावर बोलला, "अरे, स्वराली बोलली होती, तिला प्रत्येक चित्र काढतांना काय जाणवतं ते ती तिच्या डायरीत लिहिते ते, या चित्रांचा अर्थ आणि खरी मजा त्या डायरीतील तिनं लिहिलेल्या भावनांबरोबर येईल असं वाटतं." "अरे मग तु स्वरालीला सांग ना तसं, तुला देईल की ती तिची डायरी वाचायला," असं रितेश बोलला.
घरी आल्यावर स्वराली खुप खुष होती. अर्जुनला तिच्या चित्रांकडे बघुन समाधानी होतांना तिला खुप आवडलं होतं. उद्या तिचा शेवटचा पेपर होता, म्हणुन ती पुन्हा जोमानं अभ्यासाला लागली. दुसर्या दिवशी अर्जुन तिच्या सोबत तिच्या परिक्षा केंद्रावर गेला होता. तिचा पेपर सुरु झाल्यावर अर्जुन कॉलेजला आला. लेक्चर झाल्यानंतर लावण्या अर्जुनला बोलली, "हे स्वराली खुप चांगली मुलगी आहे रे अर्जुन, काय सुंदर आयडिया होती तीची, एखाद्याला सरप्राईज द्यावं तर असंच..!" असं ऐकल्यानंतर अर्जुनला खुप आनंद झाला. कॉलेज सुटल्यानंतर हर्षितने अर्जुनला स्वरालीच्या डायरीची आठवण करुन दिली. अर्जुन घरी आल्यानंतर तो स्वरालीची वाट पाहु लागला, थोड्यावेळाने स्वराली तिथे आली आणि धीर करुन अर्जुनने तिला विचारलं, "हे स्वराली तुला राग नसेल येणार तर एक विचारु का गं?" स्वराली त्याच्याकडे बघत बोलली, "अरे विचार ना, त्यात कसली आलीए परवानगी, आणि मला माहिती आहे मला राग येईल असं तु काहीच करणार नाहीस, बोल बिंद्धास्त..!" स्वराली असं बोलल्यावर अर्जुनला बरं वाटलं, आणि तो बोलला, "स्वराली, आपण जेव्हा डायरी घेत होतो, त्यावेळी तु बोलली होतीस की तुला प्रत्येक चित्र काढतांना काय वाटतं, त्या भावना तु डायरीमध्ये लिहितेस ते, तुला वेळ असेल तर मला सांगशिल या प्रत्येक चित्र काढतांना तुला काय वाटलं होतं ते?" अर्जुनच्या या प्रश्नाने स्वराली जराशी लाजली, "अरे अर्जुन, मी आत्ता सांगण्यापेक्षा, मी नक्की देईल तुला माझी डायरी वाचायला..!" असं बोलुन ती तिथुन निघुन गेली. स्वराली गेल्यानंतर अर्जुन तिच्या चित्रांकडे बघत बोलला, "कसं काय कळतं स्वरालीला माझ्या मनातलं?"

No comments:
Post a Comment