त्या रात्री स्वरालीला झोपच लागत नव्हती. अर्जुन काय बोलला होता, याचाच विचार तिच्या मनात सुरु होता. अर्जुनला मी खरचं इतकी आवडते का? या प्रश्नाचं उत्तर तिला हवं होतं. अर्जुनने फक्त विचारायचीच देरी आहे, असं तिला वाटायचं. अर्जुनला ती तिचा बेस्ट फ्रेंड मानत होती, पण त्या दोघांतलं नातं निव्वळ मैत्रीपुरतच मर्यादित नव्हतं हे तिला जाणवायचं. तिचं मन पहिल्यांदा खुप चंचल होतयं असं तिला वाटलं. नंतर ती अर्जुनला उद्या अलकाकाकुंना भेटवणार होती ते तिच्या लक्षात आलं, अलकाकाकुंना अर्जुन नक्कीच आवडेल असं तिला वाटत होतं. सकाळी आठ वाजता स्वराली अर्जुनच्या घरी आली. "अर्जुन, आत्ता चल ना माझ्या घरी, तुला कोणाला तरी भेटवायचं आहे." असं स्वराली बोलली. "अगं इतक्या सकाळी कोणाला भेटवणार आहेस?" असं अर्जुन बोलला. "तु इथेच बोलत बसणार आहेस का अर्जुन? चल ना पटकन." असं स्वराली त्याला बोलली. मग ते दोघेही स्वरालीच्या घरी आले. "अलकाकाकु, हा बघा हा अर्जुन, अर्जुन ह्या अलकाकाकु, आईची बालपणीची सखी." असं स्वराली एकदम प्रफुल्लित होऊन सांगत होती.
अर्जुनबरोबर मग त्यांनी थोडावेळ गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांना जाणवलं की त्यांनी अर्जुनबद्दल जे मत मनात तयार केलं होतं ते किती चुकीचं होतं, अर्जुन खरंच खलनायक नाही तर त्यांना नायक वाटायला लागला. थोड्यावेळानं अर्जुनच लक्ष घड्याळाकडे गेलं, "येऊ का काकु मी, कॉलेजला जायचं आहे मला..!" असं अर्जुन बोलला, जातांना तो त्यांचा आशिर्वाद घ्यायला विसरला नाही. अलकाकाकु त्याच्या या वर्तनाने खुपच खुष झाल्या, अर्जुन गेल्यानंतर त्या स्वरालीला बोलल्या, "स्वराली एकदम छान स्वभावाचा मित्र आहे बघं अर्जुन, अगं या कलयुगात मुलं स्वतःच्या आई-वडीलांच्या पाया पडायला कचरतात, अर्जुनवर खरचं खुप छान संस्कार झालेले आहेत, त्याच्यासारखा विनयशील मुलगा मी आजवर बघितला नाही. आमच्या स्वच्छिलला एकदा अर्जुनला भेटवायलाच हवं.!" अलका काकुंच्या तोंडुन अर्जुनची स्तुती ऐकुन स्वरालीला अर्जुनाचा खुप अभिमान वाटला, ती जाम खुष झाली. "अगं स्वराली, तुझी बारावीची परिक्षा झाली की अर्जुनला नक्की घेऊन ये आमच्या घरी," असं अलका काकु बोलल्या. थोड्यावेळानं अलकाकाकु स्वरालीच्या आईसोबत बसस्टॅंडवर गेल्या, बसमध्ये चढण्यापुर्वी त्या स्वरालीच्या आईला बोलल्या, "अश्विनी, तु काल रात्री बोलली ते खरंच होतं बघं, अर्जुनबद्दल माझ्या मनात अनेक शंका होत्या, पण आज त्याला सकाळी भेटल्यावर एकदम मतपरिवर्तनच झालं बघं, खरचं तुझ्या स्वरालीसाठी अर्जुन खरंच एकदम सुयोग्य जोडीदार ठरेल बघं." स्वरालीच्या आईलाही खुप बरं वाटलं होतं.
कॉलेजमध्ये आल्यावर अर्जुन हर्षितला भेटला, "काय कविराज, काय म्हणत होती लावण्या?" असं अर्जुन बोलल्यावर हर्षित जरासा लाजला. "अरे आपण उगाच तिला मिस. इगो म्हणायचो रे, खरतर ती एकदम मस्त आहे स्वभावाला, पण सोहम म्हणायचा तशी थोडी रिझर्व्ह टाईपची आहे रे. अर्जुन, काल खरचं माझ्या आयुष्यातली सुंदर सायंकाळ होती बघं.!" असं हर्षित बोलला. अर्जुन आणि हर्षित तिथे गप्पा मारत उभे होते, तिथे मग चिराली, शामली, मिताली आणि रितेशपण आले, "अरे अर्जुन आज तेजालीचा वाढदिवस आहे रे, तिला सरप्राईज द्यायचं आहे पण काही सुचतच नाही, एखादी आयडिया सांग ना?" असं रितेश बोलला. "अरे आम्हाला तर काही सुचलंच नाही बघं, तुम्ही काही तरी सुचवा याला, पहिली गोष्ट म्हणजे हा तिचा बर्थडे विसरला, मी त्याला सांगितल्यावर आत्ता कुठे याला भान आलं," असं केतकी बोलली. मग सगळेजण विचार करत बसले होते, तितक्यात चिरालीला तेजाली येतांना दिसली, "अरे तेजाली येतेयं बरं का." असं ती बोलली. "अरे अर्जुन, आज तर माझं ब्रेकअप पक्क आहे यार, ती इथे यायच्या आत चल इथनं," असं रितेश बोलला. मग अर्जुन आणि रितेश दोघही तिथुन हळुच निघुन गेले.
"हॅपी बर्थडे तेजाली," असं तेजाली आल्यानंतर हर्षित, शामली, केतकी आणि चिराली एकसुरात बोलले. "थॅंक्स फ्रेंड्स," असं तेजाली बोलली, जरा उदास मुडमध्येच. "काय गं तेजाली, रितेश कुठे आहे? मला वाटलं तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे बरोबर एकत्र येणार आहात? आहे कुठे तो? असं हर्षित मुद्दाम बोलला. "कुठे गेलायं काय माहिती, माझा बर्थडे आहे हे पण त्याच्या लक्षात नसणार, काल रात्रीपासुन त्याच्या फोनची वाट बघत होते, पण साधा एक एस.एम.एस. सुद्धा पाठवला नाही त्याने, सकाळी वाटलं तो घ्यायला येईल पण आलाच नाही," असं म्हणतांना तेजालीचा चेहरा हिरमुसला होता. "येईल गं, अगं एकवेळ तो त्याचा बर्थडे विसरुन जाईल, पण तुझा बर्थडे तो विसरणं शक्यच नाही. त्याला माहिती आहे ना तेजाली रागवेल, असेल कॅंम्पसमध्येच तुला शोधत, कदाचित तुला सरप्राईज देणार असेल तो." असं मितालीनं मग तिला समजावलं. तितक्यात कॉलेज सुरु झाल्याची बेल झाली, लेक्चरला तेजालीचं मन रमत नव्हतं. ती सरांची नजर चुकवुन रितेशला फोन करत होती, पण रितेशने तिचा फोन उचलाच नाही. तासाभरानंतर त्यानं तिला मेसेज पाठवला, "हा मोबाईल नं कोणाचा आहे, मुर्खासारखं केव्हाचा मिसकॉल देतोय?" त्याच्या ह्या मेसेजमुळे तेजालीला रडुच आलं.
तेजालीच्या शेजारी बसलेल्या शामलीनं तिला हळुच विचारलं, "कायं गं काय झालं, का रडतेयं?" तेजालीनं तिला रितेशचा मेसेज दाखवला. "येऊ दे त्याला, आज बघतेच त्याच्याकडे." असं ती बोलली. कॉलेज सुटायच्या थोडावेळ अगोदर रितेश आणि अर्जुन दोघंही कॉलेजच्या गेटवर येऊन थांबले. कॉलेज सुटल्यानंतर समोरुन सुप्रिया येतांना दिसताच रितेश कान पकडुन उठबशा काढायला लागला, "हॅपी बर्थडे तेजाली.. सॉरी तेजु.." असं कॉलेजच्या गेटवर रितेश बोलत होता. त्याला बघताच तेजालीच्या डोळ्यांत आनंदाश्रु दाटुन आलं, धावतच ती त्याच्याजवळ गेली. "रितेश, जा कट्टी, किती तरसवलंस.." असं म्हणत तीनं त्याच्याकडे बघितलं, "सॉरी राणीसरकार, अहो तुमच्यासाठी नजराणे आणण्यास गेलो होतो." असं म्हणत रितेशनं अर्जुनला खुणवलं. तेजाली एकवीस वर्षाची झाली होती म्हणुन रितेशनं ’चॉकलेट्स, ग्रिटींग्स, पर्फ्युम, टि-शर्ट, टेडी बेअर, मेक अप किट, तिचा फोटो असलेली फोटोफ्रेम, इयर रिंग्स, ब्रेसलेट, तिला आवडणार्या जुण्या पिक्चर्सची सिडी, गुलाबाच्या फुलांचा बुके, घड्याळ, एक छान कादंबरी, डायरी, साडी, पैंजण, ताजमहालाची अप्रतिम प्रतिकृती, बांगड्यांचा सेट, तिचा फोटो असलेला चॉकलेट केक, लेदर पर्स, तिचा आणि त्याचा फोटो असलेलं लॉकेट, असे तिच्यासाठी सुंदर २१ गिफ्ट त्याने घेतले होते, एक एक गिफ्ट तिला तो देत होता, आणि त्यासोबत "हॅपी बर्थ डे टु यु... हॅपी बर्थ डे टु यु.. हॅपी बर्थ डे डियर तेजु हॅपी बर्थ डे टु यु.." असं रितेश म्हणत होता, त्याच्यासोबत त्याच्या ग्रुपनही सुंदर साथ दिली. तेजालीला खुप आनंद झाला, तीनं रितेशला मिठी मारली, "थॅक्स रितेश," असं ती त्याला बोलली. "काय गं भांडणार नाहीस का?" असं त्यानं तिला चिडवलं, "आजपासुन आपण भांडायचं नाही रे." असं तेजाली बोलली. "हे तेजु असं नको करुस गं, तुझ्याशी भांडलो नाहीतर करमत नाही, तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना, हे असंच राहु दे, काही म्हण रडु आलं की खुप सुंदर दिसतेस तु, आय लव्ह यु तेजाली..!" असं रितेश तिला बोलला.
"अरे तुम्ही दोघं बोलतच बसणार आहात का? आम्हाला पार्टी हवी तेजाली." असं लावण्या बोलली. "अरे मग वाट काय बघतायं, चला कॅंन्टीनला, आज तेजाली नाही मी देईल पार्टी" असं रितेश बोलला. पार्टी झाल्यानंतर "रितेशने काय छान गिफ्ट घेतले ना रे हर्षित," असं लावण्या बोलली. "हं, तुझा बर्थ डे असल्यावर बघं..!" असं हर्षित बोलला. पार्टी झाल्यानंतर रितेश तेजालीला तिच्या घरी घेऊन गेला. "रितेश आज खरंच तु माझा वाढदिवस अविस्मरणीय केलास रे, कसं काय सुचलं तुला हे सगळं?" असं तेजालीनं त्याला विचारलं. "अगं खरं तर मला काही सुचतंच नव्हतं, आज सकाळी तुला येतांना बघितलं आणि अर्जुनबरोबर मी तिथुन निघुन गेलो. कितीतरी वेळ मी विचार करत होतो, पण काही सुचतच नव्हतं, शेवटी अर्जुनलाच विचारलं, स्वराली जर त्याची गर्लफ्रेंड असती तर त्यानं तीला काय गिफ्ट दिलं असतं? मग त्यानंच सांगितलं की तुला एकवीस वर्ष पुर्ण झालेत म्हणुन २१ गिफ्ट दे..!" असं रितेश बोलला.
"अर्जुन किती रोमॅंटिक आहे ना. खरचं रे मला तर मनापासुन वाटतं की त्याचं आणि स्वरालीचं कमिटेड रिलेशनशिप असावं." असं तेजाली बोलली. "त्याला गरज आहे गं तीची, मैत्री जिथे असते त्यावेळी कसलीच गरज नसते, आणि जेव्हा गरज असते त्यावेळी मैत्री पेक्षाही प्रेमाचीच जास्त गरज असतेच असते. आपला सगळा ग्रुप होता त्यावेळी त्याला आपण त्याच्या एकटेपणाची जाणीवपण होऊ दिली नाही, पण आता आपला ग्रुप नुसताच नावाला राहिला आहे गं, ह्या २२ फेब्रुवारीला त्याचा बर्थडे आहे, होप त्यादिवशी तरी." असं रितेश बोलला. "स्वरालीशी बोलायचं का आपण?" असं तेजाली बोलली. "वेडी आहेस का तेजु तु? अगं तिची बारावीची परिक्षा आहे, आणि असं अचानक कसं तीला सांगणार, गोंधळुन जाईल ती, जे काही करायचं ते अर्जुनलाच करु देऊया.!" असं रितेश बोलला.
कॉलेजवरुन घरी आल्यानंतर अर्जुनला भेटायला स्वराली त्याच्या घरी आहे. "अर्जुन, अर्जुन आज मी खुष आहे तुझ्यावर.!" असं स्वराली आनंदानं त्याला बोलली. "काय झालं स्वराली?" असं अर्जुनने स्वरालीला उस्तुक्तेनं विचारलं. "अरे आज तु आमच्या घरी आलास ना अलकाकुंना भेटायला, त्या खुप इंप्रेस झाल्यात, तुझा स्वभाव एकदम आवडला त्यांना, आणि त्यांनी तुला त्यांच्या घरीपण बोलवलयं, माझी परिक्षा झाली ना की सुट्टीत जाऊया आपण?" असं स्वरालीनं अर्जुनला विचारलं. "हो जाऊया, पण तुझी परिक्षा तर संपु दे, उद्या तुझा केमिस्ट्री-१चा पेपर आहे ना, झाला अभ्यास?" असं अर्जुन तिला बोलला. "हो रे आज अलकाकाकु गेल्यानंतर दिवसभर अभ्यास करत होते, पुर्ण ३ रिविजन्स करुनच उठले, आता रात्री परत थोडा अभ्यास करेल." असं स्वराली बोलली. "हं अभ्यास करुन दमलीस वाटतं तु? काही करु का खायला आपल्यासाठी? तु सांग तुला काय आवडेल?" असं अर्जुन बोलला. "अरे आता सायंकाळ झाली, आठ वाजता बाबा आले की मग जेवण करायचं असतं, मग भुक कशी लागेल? आणि कशाला माझ्यामुळे तुला कशाला त्रास?" असं स्वराली बोलली. "हे त्रास काय त्यात, तुला मॅगी नुडल्स आवडतात ना? बस आलोच मी दोन मिनीटांत," असं अर्जुन स्वरालीला बोलला आणि किचनमध्ये वळला.
अर्जुनच्या पाठीमागे स्वरालीपण त्याच्या किचनमध्ये आली, "अर्जुन तुला सगळा स्वयंपाक येतो का रे?" असं तीनं त्याला विचारलं. "हो गं स्वराली, शिकलोय सातवीपासुनच" असं अर्जुन अभिमानानं बोलला. "किती छान, मला सांगु काय काय बनवता येतं, चहा, रसना, कोकम सरबत आणि मॅगी बस इतकच बनवता येते. पण मी सुट्टीत शिकणार आहे कुकिंग." असं स्वराली बोलली. अर्जुन तिच्याकडे बघुन हसला, तयार झालेली मॅगी मग त्याने छान तिला सर्व्ह करुन दिली, आणि स्वतःलाही घेऊन मग ते दोघंही हॉलमध्ये येऊन गप्पा मारत बसले. अर्जुनने तिला तेजालीच्या बर्थडे ची गंम्मत सांगितली. "अरे अर्जुन, आज तेजालीचा बर्थडे होता, मला सांगायंच ना सकाळी, ए ती फार चांगली आहे रे, तुझी मॅच बघायला आठवणीने घ्यायला आली होती रे मला, चल अर्जुन आपण तिला फोनवरुन बर्थडे विश करुया ना..!" असं स्वरालीनं अर्जुनला आग्रह केला.
स्वरालीचा आग्रह मग अर्जुन थोडेच टाळणार होता, मग त्याने तेजालीला फोन केला, "ऐ तेजाली, तुला अजुन एक खास गिफ्ट माझ्याकडुन जरा डोळे बंद कर, हं ऐक आता," असं अर्जुनने तिला म्हणत स्वरालीला फोन दिला. "हॅलो तेजाली दिदी, विश यु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दि डे, हॅपी बर्थ डे..!" असं स्वराली एकदम मंजुळ आवाजात बोलली. "अरे व्वा, स्वरालीच बोलतेय ना तु?" असं तेजालीने तिला विचारलं. स्वरालीनंही फोनवरुन होकार दिला. पाच मिनिट मग त्या दोघी एकमेकींशी बोलत होत्या, "हे स्वराली, तुला एक गुपित सांगते बरं का, अर्जुनचा बर्थडे आहे २२ फेब्रुवारीला, आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत तु करशील ना आम्हाला मदत?" असं तेजालीनं तिला विचारलं. "अगं नक्कीच करेल ना," असं स्वरालीनही आनंदाने होकार दिला. फोन ठेवल्यानंतर अर्जुनने तिला विचारलं, "काय गं स्वराली, काय नक्की करणार आहेस?" "आमची गम्मत आहे, तुला कळेल नंतर." असं म्हणत स्वराली हसायला लागली. "तुम्हा मुलींच्या मनात काय चालतं ते कळणं खरच कठीण आहे बरं," असं अर्जुन तिला बोलला.
No comments:
Post a Comment