Saturday, February 4, 2012

येत्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने खास "प्रेमात पडलं की" ही कविता आयुष्यात प्रेमात पडणार्‍यांसाठी..!

माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचा राग, तिचं लाजणं,
जवळपास नसुनही जवळ असणं,
जीवनाशी खेळ करतं ते खोटं-खोट रुसणं,
आणि अचानक तिचं ते स्वप्नात दिसणं..

माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

केसांची बट ती हळुच मागे सारते,
तिचा डावा हात की उजवा हात होता?
हेच आठवता-आठवता रात्र देखील सरते..
रात्रीच्या त्या खट्याळ पावसात चिंब न्हायायचं,
गुलाबाचं फुल स्वप्नातचं तिच्या केसांत माळायचं..!

माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

तिला खुश करण्याकरता मन काय काय नाही करतं,
तिच्या त्या सौंदर्यावरुन, नजर खरचं नाही हो सरतं..
तिची एक नजर टिपायला, मन बसतं झुरतं,
तिच्या त्या गोड हास्याने मन नाचतं पिसारा फुलवतं..!

माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

तिच्याशी बोलायची मन किती तयारी करतं,
पण ती समोर आली की कोण जाणे,
ह्र्दयातील शब्द ऒठांनी बोलायचच विसरतं.
तिच्यासमोर मग मित्र सारे प्रेमाने चिडवतात,
मनातील भाव जणु तिच्यापर्यंत पोहचवतात..!

माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

वर्गात मग तिच्याकडे चोरुन बघणे,
अन तिचही त्या नजरेला नजर भिडवणे,
अचानक मग ती चालतांना मागे वळुन पाहते,
तिच्या त्या लाजत हसण्याने सारं काही कळते..!

माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

तिची प्रत्येक भेट तिला खरं ते सांगण्यासाठी प्रेरित करते,
मनातील ईच्छा कसा मांडेल याची जणु ती कल्पना करते,
तिच्या त्या होकारानॆ मन किती आनंदलेलं,
सारं जगचं जिंकल्याचं दोघांनी अनुभवलेलं..!

माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

तिच्यावर प्रेम करतांना प्रेम करावं भरलेल्या ढगासारखं,
मनाचं भलेपणही तिच्यावर बरसवावं पावसासारखं,
आणि खरचं,
माझं काय आणि तुमचं काय,
प्रेमात पडलं की...
प्रेमात पडलं की हे असचं व्हायचं..!

No comments:

Post a Comment