आयुष्यभर हक्कांसाठी भांडत आलो,
वाटलं आज हक्क बजावुन बघावं,
एका बदलाच्या आशेपुरतं तरी
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतादान करावं..!
आश्वासनांच्या त्या भुलथापांना,
यंदा ठरवलंय पायदळी तुडवावं,
मतदारांना गृहीत धरणार्यांना आज आस्मानच दाखवावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!
पाणी, घरं, रस्ते, आरोग्य, सुरक्षा यासाठी अजुन किती झगडावं,
हेच मुद्दे समोर करुन राजकारण्यांनी अजुनही राजकारण करावं?
यांच्या विचारांना जरा आता ठरवलं सुरुंग लावावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!
पैशे आणि चिकन-मटनांच्या तुकड्यांपुढे का लाचार व्हावं,
गैरमार्गानेच निवडुन यायचं तर मग मतदारांना का ह्यांनी एक दिवसाच राजा करावं?
टक्केवारीचा मेवा नाही तर जनतेची सेवा करणार्यांनाच निवडुन आणावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!
स्वच्छ, सुंदर, सुरक्षित जितकं माझं घरं, तितकं शहरही व्हावं,
तरुणांनीच काय पण जनताजनार्दनाचे आता हिरीरीने पुढे व्हावं,
अनमोल असं आपलं मत योग्य त्या उमेदवारालाच द्यावं,
म्हणुन वाटतयं प्रत्येकानं यंदा मतदान करावं..!
तुम्हा सर्वांचाच,
स्वप्निल सुरेश गरुड
No comments:
Post a Comment