Sunday, February 12, 2012

"लाईफ इन फार्मसी कॉलेज" या पुस्तकाबद्दल बोलु काही..!

        "काय रे, स्वप्निल MH-CET चा निकाल लागला. आता कोणत्या फिल्ड मध्ये करियर करायचं M.B.B.S./B.D.S की B.Engg.?" असा प्रश्न त्यावेळी मला ओळखणारा प्रत्येकजण विचारत असे. माझ्याकडुन जेव्हा "मी B.Pharmacy करणार आहे."असं सांगितल्यावर त्यांची उत्सुक्तेने बघणारी नजर क्षणातच जणु माझी कीव करायची. "अरेरे, फार्मसी कशाला करतोस!" अशा विधानांबरोबर "पुढे एखादं दुसरं मेडिकल स्टोअर्स टाकशील किंवा डॉक्टरांचे उंबरठे झिजवायची वेळ येणार रे तुझ्यावर, अरे M.B.B.S अन B.Engg. सारख्या फिल्डला मरण नाही अन काय तर B.Pharmacy.!" असा उपरोधिक टोला जोडीला असायचाच.
        पुढे कॉलेजला जातांना काही जुने मित्र भेटायचे, त्यांच्यापैकी कित्येकांनी B.Engg ला प्रवेश मिळवला होता. काही जणांनी B.A.M.S., B.D.S. आणि B.Sc.(Physics)ला पसंती दिली होती. B.Pharmacy कडे वळणारा मी एकटाच होतो. Pune university मधलं B.Pharmacy साठी सर्वात योग्य असलेल्या M.V.P.S. COLLEGE OF PHARMACY, NASHIK-02 या कॉलेज मध्ये मला प्रवेश मिळाला होता. पण सामान्य नाशिककर अन मुलांना या कॉलेजची ओळख नव्ह्तीच असं त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवलं होतं. काहींना फक्त K.T.H.M. च्या कॅम्पस मध्ये असल्यामुळे निदान माझं कॉलेज माहित होतं. त्यामुळे कित्येकदा आपला B.Pharmacy कडे येण्य़ाचा निर्णय चुकला तर नाही ना? असं वाटायचं. पण आयुष्यात Learn to earn & earn to learn ही गोष्ट शिकलेली होती, त्यामुळे आता मागे वळुन बघण्यात काही अर्थ नाही असं ठरवतं मग फार्मसी मध्येच काहीतरी करुन दाखवायचं असं ठरवलं.
        लाईफ इन फार्मसी कॉलेज पेक्षा मला लाईफ इन C.P.N. म्हणनं योग्य वाटतं. कारण याच कॉलेज कडुन कित्येक चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आहेत. तल्लख बुद्धिमत्ता असलेले अध्यापकांचा सहवास, "जीव तोडुन अभ्यास करा अन जीव जाईपर्यंत मजा करा" असा दरवेळी सल्ला देणारे सिनियर्स, पंकज चौधरी, नितीश चौधरी, अतुल आवारे, हितेश बडगुजर, शंतनु चंद्रात्रे, अमेय चौरसिया यांच्यासारखे जीवाभावाचे मित्र याच कॉलेज मध्ये मिळाले. याच कॉलेजमध्ये असतांना मला छोटी-मोठी नाटके अन कविता करण्याचा छंद जडला.
    सेकंड ईयरला असतांना गॅदरिंग मध्ये मी अन माझ्या मित्रांनी "प्रेमासाठी वाट्टेल ते!" या नाटकाचं सादरीकरण केलं. नाटकाची पटकथा लेखन, संपादन अन दिग्दर्शन माझं होतं. या नाटकाला त्यावेळी प्रथम पारितोषिक मिळालं अन मला नवी ओळख..! अर्ध्यातासाच्या त्या नाटकाने आयुष्याला नवी कलाटणी दिली. त्या नाटकानंतर माझे सिनियर्स, जुनियर्स यांनी "बॉस पुढच्यावेळी याचा पार्ट-२ झालाच पाहिजे बरं का..!" अशी प्रतिक्रिया देत नकळत तो छंद जोपासण्याला प्रोस्ताहित केलं. मग कळत नकळत सुरुवात झाली ती "लाईफ इन फार्मसी कॉलेज " या पुस्तकाच्या लिखाणाला.
        पुस्तक लिहीणं तसं तर वेळ घेणारं, थोडसं कंटाळवाणं पण गमतीदार कामच होतं. या पुस्तकाची काही पाने मी ब्लॉगच्या रुपात पुर्व-प्रसिद्ध केली ती:- www.swapnilgarud.blogspot.com या संकेतस्थळावर. अन त्या ब्लॉगला येत असलेल्या प्रतिक्रियांचं फलस्वरुप म्हणजे हे पुस्तक..! या पुस्तकाचा प्रामाणिक हेतु फक्त एवढाचं की सर्वसामान्यांचा फार्मसी कडे बघण्याचा कल बदलावा. फार्मसी कॉलेजमध्ये गोळ्या-औषधांच्या अभ्यासक्रमाशिवाय चालतयं तरी काय़ हे सामान्यांना कळावं एवढा साधा अन सरळ आहे. प्रत्येकाला स्वतःच्या फिल्डचा अभिमान असतोच यात काही गैर नाही, पण इतर फिल्डचा तिरसटासारखा विचार करणं हे योग्य नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात कोणतेही शिक्षण, कला किंवा काम हे महत्वाचं आहे याच विचाराचा मी आहे..
        फार्मसी फिल्डमधला मुलगा औषधांचा अभ्यास करतांना असं पुस्तक लिहु शकतो याचं कित्येकांना नवलं वाटेलच यात मुळीच शंका नाही. असं पुस्तक लिहिणारा या फार्मसी फिल्ड मधला मी पहिला विध्यार्थी आहे याचा मला अभिमान आहे. प्रस्तुत पुस्तकातील विचार, अनुभव हे सत्यच आहे कारण, त्यामुळे ते आपल्याला पटतील वा कदाचीत पटणारही नाही, पण फार्मसी कडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेलं हीच आशा करणं एवढचं माझ काम आहे. प्रस्तुत पुस्तकातील घटना व अनुभव हे सत्य असले तरी यांतील पात्रांची नावे पुर्णपणे काल्पनिक आहेत. पात्रांच्या नावाचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही, कोठे आढळल्यास निव्वळ योगायोगच समजावा. पुस्तकातील प्रामाणिक आणि सत्य लिखाणामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास आधीच क्षमस्व.

                                                   तुम्हा सर्वांचा,

                                              स्वप्निल सुरेश गरुड

No comments:

Post a Comment