मित्रांनो, सम्राट चंद्रगुप्त मौर्य संबधीची एक गॊष्ट आपल्यातील पुष्कळ जणांना ठाउक असेल वा नसेल तरी सांगतो.आर्य चाणक्य सम्राट चंद्रगुप्तांचे गुरुवर्य, आपल्या शिष्याची त्यांनी एकदा चाचणी घ्यावयाचे ठरवले. "माझ्या जवळ जे काही होतं ते मी सर्व तुला शिकवलेलं आहे चंद्रगुप्त, तु यावर समाधानी आहेस का?" असा प्रश्न आर्य चाणक्यांनी विचारला. त्यावर चंद्रगुप्तांचं उत्तर लक्षणीय आहे; "गुरुवर्य तुम्ही जे काही मला शिकवलयं त्याबद्दल मी नक्कीच तुमचा मनस्वी आभारी आहे. एखादी दैवी योजनाच असावी की मला तुमच्या हातातुन घडण्याचं भाग्य मी माझ्या ललाटवर घेऊन आलो. आपण शिकवल्या प्रमाणे मला ठाउक आहे की मनुष्याने आपल्याकडील असलेल्या गोष्टींवर समाधानी असावेच, पण त्याची शिकण्याच्या भुकेबद्दल तो कधीच समाधानी नसावा. त्याला जितकी शिकण्याची संधी मिळेल आयुष्यभर त्याने त्या संधीचं सोन करावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो ज्यांपासुन शिकत गेला त्या गुरुंना तो विसरता कामा नये."
सम्राट चंद्रगुप्तांचे उत्तर ऎकुन आर्य चाणक्य सुखावलेत. त्यांनी चंद्रगुप्तांना आशिर्वाद दिला आणि बोलले "तुझ्या साठी मी आता काय करु?" चंद्रगुप्तांनी मोठ्या समाधानाने उत्तर दिले "गुरुवर्य माझी फार दिवसांची ईच्छा होती, तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची, आज तो क्षण आला आहे असं मला वाटतयं!" आर्य चाणक्य त्यावर उत्तरले, "मला तु मी कल्पनाही करु शकणार अशी गुरुदक्षिणा देऊ शकशील तर हे शिष्या अशी गुरुदक्षिणा घ्यायला मला नक्कीच आवडेल." चंद्रगुप्तांनी आर्य चाणक्यांना दिलेली गुरुदक्षिणा ही एकलव्याने जशी द्रोणाचार्यांना दिली अगदी तशीच मोलाची होती. चंद्रगुप्तांनी आर्य चाणक्यांकडुन काय अवगत केलेली सर्व विद्देची त्यांना नुसती प्रचितीच दाखवली नाही तर आपल्या गुरुंची त्याला चक्रवर्ती सम्राट बणवन्याचं स्वप्नही साकार केली. अशी अनोखी गुरुदक्षिणा आपल्या शिष्याकडुन मिळाल्याने आर्य चाणक्य समाधानाने बोलले," एखाद्या गुरुला चंद्रगुप्ता सारखा शिष्य लाभावा हीच त्याची सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा होयं, दैवी योजना चंद्रगुप्तासाठी नाही तर माझ्यासाठीच असावी, ज्यानुसार त्याचा गुरु होण्याचा भाग्यलाभ मला झाला!"
आपणही मित्रांनो चंद्रगुप्तांप्रमाणे आप-आपल्या गुरुंकडुन विद्यार्जन करत असतोच नाही का? असं म्हणतात शिष्य किती मोठा हे त्याच्या गुरुच्या किर्तीवरुन ठरत असतं. बालावाडीपासुन ते पदवी वा पदवीत्तर शिक्षण घेतांना आपल्याला अनेक शिक्षकांचा सहवास लाभतो, यानेच आपल्या आयुष्याची जडण-घडण होते नाही का? माझ्या C.P.N. मध्येही मला चांगल्या प्राध्यापकांचा सहवास लाभलाय. असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्तीकडुन काहीतरी मनुष्याने शिकावं आणि स्वतःला परिपुर्ण बनवायचा प्रयत्न जरुर करावा.
C.P.N. मध्ये मी अभ्यासाव्यतिरिक्त तो विषय शिकवत असलेल्या शिक्षकांचा एक-एक चांगला गुण स्वतःच्या अंगी बाळगण्याचा प्रयत्न करत गेलो. सुरुवात तर आमच्या प्राचार्यांपासुनच व्हायला हवी नाही का? श्री संजय वाघ सर, जणु C.P.N.चे सरकार, Organic chemistry या विषयाचे महामेरु, प्रचंड बुद्दिमत्ता. Organic chemistry च्या एक एक रिऍक्शन्स एतक्या किचकट पण सरांच्या लेक्चरला नीट लक्ष देउन ऎकलं की exam मध्ये चिंता करायची गरज नसायची. असं सिनियर्स सांगायचे, अन प्रत्यक्षात आम्ही देखील याचा अनुभव घेतला आहे. एखाद्या विषयाचीच किती सखोल माहिती असावी हे शिकावं तर वाघ सरांकडुनच.!
"जब फार्माकोग्नोसी हो आऊट ऑफ कंट्रोल, तो होंठ घुमा, सिटी बजा, सिटी बजा के बोल-पाल इज वेल, पाल इज वेल..!" असंच वर्णन योग्य पडेल आमच्या श्री पाल सरांची महती सांगण्यासाठी. फार्माकोग्नोसीसारखा रटाळ विषय सर इतक्या सोप्या शब्दांत सांगतात की परत फार्माकोग्नोसीची काय बिशाद की मुलांना कंटाळा आणेल. आपलं आयुष्य हसतं खेळतं चिंतामुक्त होऊन जगावं हेच आपल्या प्रत्येक कृतीतुन दरवेळी आम्हाला पाल सर जाणवुन देतात. "वाचाल तर वाचाल" ही गोष्ट आम्ही शिकलोय ती श्री गुडसुरकर सरांना बघुनच.सर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठलं ना कुठलं पुस्तक वाचतच असतात. "नरकातही मी पुस्तकांच्या मदतीने स्वर्ग निर्माण करीन," असाच आनंद सरांच्या श्रीमुखावर एखादं पुस्तक वाचत असतांना दिसतो.
प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्य १००% देऊनच करायचं असं जे आम्ही शिकतो ते श्री बेलसरे सरांकडुनच. सर लेक्चर म्हणा की प्रॅक्टिकल त्यांचा नेहमी मुलांना जास्तीत जास्त चांगलं कसं शिकवता येईल यावर भर असतो. श्री डेरले सर, आम्हाला थर्ड इयरला फार्मास्युटिक्स-3 हा विषय शिकवणार होते. परंतु AICTE च्या डायरेक्टरपदी निवड झाल्याने त्यांच्याकडुन आम्ही तो विषय काही शिकु शकलो नव्हतो. परंतु, सरांकडुन आम्ही एक गोष्ट शिकलो होतो ती रेफरंसिंग कशी करायची अन रेफरंसच मह्त्व काय असतं. पुढे या गोष्टीचा फायदा आमच्या मुलांना एम फार्म करतांना थेसिसच्या वेळी नक्की होईल असं आम्हाला वाटतं.
एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करायला शिकवणं हे धनेश्वर सरांइतकं प्रखरतेनं आमच्या कॉलेजमध्ये दुसर्या कोणत्याच सरांना जमणार नाही. Asking "Why?" is simple but asking "Why not?" is difficult. याची प्रत्येकवेळी सर जाणीव करुन देतात. आम्हाला कधी-कधी वाटायचं की जर सर वकील असते तर आज नक्कीच उज्वल निकम यांच्यासारखे नावारुपास आले असते. आपलं स्वतःचं खाजगी आयुष्य जगतांना आपण समाजाचंही भान ठेवावं आणि आपल्या समाजाच्या सेवेसाठी काहीतरी करावं अशी शिकवण आम्हाला श्री मिलिंद वाघ सरांच्या कृतीतुन मिळते. कारण सरांचा प्रोफेशनल अन सोशियल या दोन्ही फिल्डवर त्यांनी स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचातुन त्यांनी फार्मसीच्याच नव्हे तर इतर विध्यार्थ्यांसाठी जणु चळवळच उभी केली आहे.
श्री पिंगळे सरांची साथ तशी आम्हाला कमीच लाभली, कारण मविप्र संस्थेच्या राजकारणात सरांचा सक्रिय सहभाग होता. माणसं कशी जोडावी ते सरांच्या दांडग्या जनसंपर्कातुन आम्हाला कळायचं. सौ. फरांदे मॅडम, नगरसेविका, नाशिकच्या विद्यमान उपमहापौर अन जोडीला मायक्रोबायोलॉजी शिकवण्यात तरबेज असणार्या फरांदे मॅडम आम्हाला आई-वडीलांचे कष्ट विसरु न देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायच्या. स्वामी तिन्ही जगांचा आई-वडिलांविना भिकारीच असतो ही गोष्ट त्यांनी सेकंड इयरला असतांना त्या आमच्या मनावर बिंबवत असत. श्री अनंतवार सर, आमच्या कॉलेजमध्ये सरांना "Mr. Perfection" म्हणुन ओळखतात. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी, जशी सांगितली अगदी तशीच पुर्ण करुन आणायची असं त्यांनी पहिल्या प्रक्टिकलाला सांगितलं. "कल करे सो आज कर आज करे सो अब" अशी सरांची भुमिका आम्ही वर्षभर अनुभवलेली. अगदी लहान-लहान गोष्टींमधील सरांची सुसुत्रता बघण्य़ा सारखीच, वाख्याणन्याजोगी नव्हे तरे ते शिकण्यासारखं होतं. यामुळेच तर पुढे कॉलेजचं जास्तीत जास्त काम कॉलेजमध्येच पुर्ण करायची सवय लागली, आणि उरलेला वेळ मग बाकीच्या स्पर्धा-परिक्षांची तयारी करण्यात सार्थकी लावता आला.
आता श्री सावकारे सरांबद्दल, सरांचा उल्लेख पुर्वी मॅनेजमेंट गुरु म्हणुन केलेलाच आहे. मुलांमध्ये पॉझिटीव्ह अँटिट्युड डेव्हलप करण्यात सावकारे सरांचा हातखंडा होता. फार्मसीचा अभ्यासक्रम तसा भरपुर..त्यातच आमच्या कॉलेजमधील बरेच मुलं गेट या स्पर्धापरिक्षेसाठी तयारी करत असतात. त्यांचं टेंशन जरा कमी करुन पुन्हा त्यांच्यात नवी उमेद जागवण्यासाठी सर नेहमी प्रयत्नशील असायचे. मुलांना दरवेळी छोटी-छोटी उदाहरणे सांगुन सर मुलांचाचा अभ्यास करायण्याचा जोश वाढवायचे. आमचे सिनिर्यस जसे "जीव तोडुन अभ्यास करा, अन जीव जाईपर्यंत मजा करा" असं सांगायचे, सावकारे सरांचही तसचं फक्त शब्दांमध्ये फरक.! सरांकडुन हा सकारात्मक दृष्टिकोन घेण्यासारखा होता.
जरा आमच्या बेले मॅडम विषयी, आमच्या कॉलेजमधील सगळ्यात विध्यार्थीप्रिय शिक्षिका. बेले मॅडम ह्या आमच्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या असल्याने कॉलेजमधील प्रत्येक गोष्टींची त्यांना जाण होती. विध्यार्थीवर्गाचा त्यामुळे त्यांच्या बरोबर असलेला बॉंड हा सिनियर-ज्युनियर सारखा बहुतेकवेळा वाटे. काळानुसार वागायची शिकवण आम्हाला बेले मॅडमकडुन मिळाली. पारंपारिक अभ्यासक्रमामध्ये गुरफटतांना विध्यार्थी बाहेर चालु असलेल्या चालु घडामोडींशी स्वतःला जुळवुन घेत नाही, जणु अभ्यासक्रमामधील पुस्तकी विश्वातच आमच्या कॉलेजमधली मुलं धन्यता मानतात. ह्याची जाणीव बेले मॅडम नेहमीच आमच्या फिल्ड मध्ये घडत असलेल्या नवीन गॊष्टींची माहिती सांगत करवुन देत असत."काळाला अनुसरुण काळाची गरज ऒळखुन वागलात तर काळ तुम्हाला तुमचा वर्तमान भविष्याला सहायक बनेल, नाहीतर तुम्हाला इतिहास जमा करायचं औषध काळाने करुनच ठेवलयं" ही गोष्ट बेले मॅडम पोरांना वारंवार समजवण्यात प्रयत्नशील असतं.
Honesty is best policy..! असं आम्ही शिकतो ते श्री कावळे सरांकडुनच. कावळे सरांना विध्यार्थ्यांतला प्रामाणिकपणा आवडतो. थर्ड इयरच्या मेडिकेमच्या वार्षिक प्रॅक्टिकलला माझा प्रोडक्ट आलाच नव्हता, मी प्रामाणिकपणे रिकाम्या पॉलिथिनबॅगलाच लेबल लावुन सबमिट केला. पहिले वाटलं की आता आपल्याला मेडिकेमला ए.टी.के.टी लागणार, पण जणु माझ्या प्रामाणिकपणामुळेच मला प्रॅक्टिकलला चांगले मार्क्स मिळाले होते. आपल्या जवळ असलेली माहिती आपल्याला हव्या त्या वेळी सांगता आली पाहिजे अगदी झोपेतदेखील, ही गोष्ट तर शिकावी सौ. कावळे मॅडम यांच्याकडुनच. कारण कावळे मॅडम यांना कोलॉजीच्या सिलॅबसची जणु प्रत्येक गोष्ट तोंडपाठच असं आम्हाला त्या शिकवायला यायच्या त्यावेळी जाणवायचं.
संयम अन शांती या दोन गोष्टी कुणासारख्या असाव्यात तर त्या श्री अहिरे सरांसारख्या असं आमच्या कॉलेजचा प्रत्येक विध्यार्थी सांगेल. "यार भाऊंकडे एखाद्या रिसर्च सायंटिस्टला लाजवेल इतका संयम भरलेला आहे." असंही मुलं सांगायला कमी करणार नाहीत. आपण काय शिकतो, कशासाठी शिकतो हे समजल्याशिवाय घेतलेलं शिक्षण म्हणजे नुसतं पाट्या टाकण्यासारखं आहे ही गोष्ट आम्हाला शिकवली ती सौ. हरक मॅडम यांनीच. "रिझल्ट महत्वाचा नाही, पण तुम्ही प्रॅक्टिकलला किती समजुन घेतल्यावर परफॉर्म करता हे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठीच महत्वाचं आहे." असं त्या आम्हाला सांगत. डुंबरे सरांची, आम्ही फस्ट इयरला असतांनाच शिक्षकरुपात नवी लाईफ सुरु झाली होती. कर्म करत जा फळाची चिंता करु नका असंच त्यांच्याकडे बघुन आम्हाला वाटतं. आणि हो राहुल शिरोळे सर राहिलेच की, त्यांना समराईज न केल्याशिवाय कसं काय चालेल. आयुष्यात माणसाने नेहमी सिंहावलोकन करावं असंच त्यांच्याकडुन आम्ही शिकलोय खरं. गेले २२ वर्ष ज्यांनी या कॉलेजची शिस्त आणि घडी बसवली होती, ज्यांच नाव ऎकता क्षणीच आमचा इंट्रो घेत असलेले सिनियर्स निघुन गेले होते त्या शेटे सरांना कसं विसरावं, कारण आपल्यावर कोणाचा तरी धाक असावा, आपण स्वतःच स्वतःला शिस्त लावावी ही गोष्ट शिकालोय ते शेटे सरांकडुन.
असो, ही होती आम्हा फार्मसीच्या विध्यार्थ्यांना घडवणारी शिक्षकांची मजबुत फळी. आमच्या कॉलेजमध्ये सिनियर्संच्या शब्दांना मान आहे, पण त्या सिनियर्संना घडवणारे हात या सर्व शिक्षकांचेच आहेत. कधी आमच्या कडुन एखादी कृती घडते त्यातुन यांच मन दुखावलंच असेल पण काय करणार सर, आम्ही मातीचेच गोळे, तुम्हीच द्या आकार..!
No comments:
Post a Comment