लाडकी सवत !
माझ्यापेक्षा माझी प्रत्येक कविताच ,
माझ्या प्रेयसीला जास्त आवडायची....
त्यामुळेच की काय ,
माझी कविताच मला माझी लाडकी सवत वाटायची..!
ट्रॅफिक जाम !
गाडी माझी प्रेमाची ,
तिच्या सिग्नल पासून लांब होती !
गाडी सिग्नलजवळ आल्यावर कळ्ल ,
तिथे आधीच ट्रॅफिक जाम होती !
प्रेमकाव्य..!
"प्रेम केलंच पाहीजे.."
हे काही प्रेमकाव्य करण्यासाठी कंम्पल्शन नसतं,
फक्त प्रेमाची जाण असनं,
गड्या, हेच क्वालिफिकेशन गरजेच असतं....!
कवितेवर उपचार.!
प्रेमावरचं फक्त कविता सुचतात हो,
हा माझा नाही तर माझ्या वयाचा दोष आहॆ.!
प्रेयसी तर मुळीच नाही,
फक्त काळच त्यावर उपचार आहे...!
No comments:
Post a Comment